Home /News /money /

BUdget 2022 : बजेटच्या तारखेपासून ते अर्थापर्यंत; बजेटबद्दल लोकांनी गुगलवर सर्च केल्या ‘या’ पाच गोष्टी

BUdget 2022 : बजेटच्या तारखेपासून ते अर्थापर्यंत; बजेटबद्दल लोकांनी गुगलवर सर्च केल्या ‘या’ पाच गोष्टी

budget 2022 हा हॅशटॅग गेल्या चार ते पाच दिवसांपासून ट्रेंड होतोय. लोक बजेटबद्दल मोठ्या प्रमाणात गुगलवरदेखील (google) सर्च करत आहेत. तर, बजेटबदद्ल गुगलवर नेमकं काय सर्च केलं जातंय, ते पाहूयात.

मुंबई, 31 जानेवारी : मंगळवारी 1 फेब्रुवारी 22 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) देशाचा अर्थसंकल्प म्हणजेच बजेट (budget) सादर करणार आहेत. यंदाच्या बजेटमध्ये कोणत्या नवीन घोषणा होऊ शकतात तसेच कोणत्या क्षेत्रासाठी किती निधी मंजूर करण्यात येईल, याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे. अशातच budget 2022 हा हॅशटॅग गेल्या चार ते पाच दिवसांपासून ट्रेंड होतोय. लोक बजेटबद्दल मोठ्या प्रमाणात गुगलवरदेखील (google) सर्च करत आहेत. तर, बजेटबदद्ल गुगलवर नेमकं काय सर्च केलं जातंय, ते पाहूयात. 1. बजेट म्हणजे काय? बजेट म्हणजे काय किंवा बजेटचा अर्थ काय, हे गेल्या काही दिवसांत गुगलवर सर्वाधिक सर्च केलं गेलंय. बजेट हा शब्द फ्रेंच शब्द bougette पासून आला आहे, ज्याचा अर्थ आहे- छोटी बॅग (small bag). सरकार दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मार्चदरम्यान होणाऱ्या खर्चाचा हिशेब तयार करते, तसंच पुढच्या वर्षीच्या तरतुदी आणि हा हिशेब संसदेत मांडला जातो त्याला बजेट म्हणजेच केंद्रीय अर्थसंकल्प म्हणतात. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय. 2. बजेटचे प्रकार? लोकांनी गुगलवरही किती प्रकारचे बजेट (types of budget) आहेत, हे देखील सर्च केलं. साधारणपणे बजेटचे तीन प्रकार असतात, बॅलन्स्ड बजेट (Balanced budget) , सरप्लस बजेट (Surplus budget ) आणि डेफिसिट बजेट (Deficit budget). संतुलित अर्थसंकल्पात उत्पन्न आणि खर्चाची रक्कम समान असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सरप्लस बजेटमध्ये सरकारचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असतं. डेफिसिट बजेट म्हणजेच तुटीच्या अर्थसंकल्पात सरकारचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्त असतो. Saving आणि Current Account मध्ये नेमका फरक काय? तुम्ही कोणतं खातं निवडावं? 3. अर्थसंकल्पीय अधिवेशन या वेळी सरकार 31 जानेवारी 2022 पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू करणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind ) 31 जानेवारी 22 ला म्हणजेच आज संयुक्तपणे दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. याबाबतही सर्च झाला. 4. बजेट डेट 2022 यंदाचं बजेट कधी सादर होणार, त्याची तारीख काय आहे, हेदेखील लोकांनी गुगलवर सर्च केलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता संसदेत आपला चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तर आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) बजेटच्या एक दिवस आधी 31 जानेवारी ला मांडण्यात येईल. 5. बजेटकडून अपेक्षा देशात सध्या कोरोनाच्या (corona) ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे (omicron variant) तिसरी लाट सुरू आहे. त्यामुळे लोकांना सरकारकडून दिलासादायक बजेटची अपेक्षा आहे. स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50,000 रुपयांवरून 1 लाख रुपयांपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. कोरोनाच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांना अतिरिक्त कर सवलत देण्याचीही सूचना करण्यात आली आहे. अर्थसंकल्पाआधी ग्लोबल संकेत चांगले; SGX NIFTY 160 अंक वधारला, NIKKEI देखील मजबूत स्थितीत दरम्यान, पुढच्या महिन्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (assembly election) होणार आहेत. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या आणि लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणाऱ्या राज्यात निवडणुका आहेत. त्यामुळे नक्कीच इथल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी यंदाच्या बजेटमध्ये महत्वपूर्ण घोषणा केल्या जाऊ शकतात, असं म्हटलं जातंय. आज आर्थिक सर्वेक्षण मांडण्यात येणार असून उद्या अर्थमंत्री बजेट सादर करतील, त्यामुळे सर्वांचं लक्ष सध्या बजेटकडे लागलंय.
First published:

Tags: Budget, Nirmala Sitharaman, Union budget

पुढील बातम्या