मुंबई, 31 जानेवारी : मागील दोन आठवड्यांपासून शेअर बाजारात (Share Market) घसरण सुरु आहे. त्यामुळे गुंतवणूकदारही (Investors) दबावाखाली आहे. अर्थसंकल्पाआधी शेअर बाजाराची स्थिती कशी असे याकडे सर्वाचं लक्ष आहे. या सर्वासाठी एक आनंदाची बातमी आहे. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी जागतिक संकेत (Global Signs) चांगले दिसत आहेत. SGX NIFTY मध्ये 150 हून अधिक अंकांची वाढ होत आहे. NIKKEI मध्ये मजबूत दिसते. इतर आशियाई बाजार मात्र आज बंद आहेत. अमेरिकेच्या बाजारात (American Market) शुक्रवारी जोरदार उसळी पाहायला मिळाली. DOW 565 अंकांनी वर आहे तर NASDAQ 3 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. शुक्रवारी अमेरिकेचे बाजार तेजीसह बंद झाले. यूएस फ्युचर्स मार्केटमध्ये घसरण दिसून आली होती. यावर्षी फेड 5 वेळा व्याजदर वाढवू शकते. फेड मार्चमध्ये 0.5 टक्क्यांनी दर वाढवू शकते. दरम्यान ब्रेंटची किंमत 91 डॉलरच्या वर गेली आहे. Saving आणि Current Account मध्ये नेमका फरक काय? तुम्ही कोणतं खातं निवडावं? याशिवाय युक्रेनच्या मुद्द्यावरून देखील तणाव वाढला आहे. रशियाने युक्रेन सीमेवर सैन्याची संख्या वाढवली आहे. BoE आणि ECB या आठवड्यात व्याजदरांबाबत निर्णय घेतील. यूएस बेरोजगारी दर डेटा या आठवड्यात बाहेर येईल. या आठवड्यात GM, Alphabet, Meta, Amazon चे निकाल येतील. Saving आणि Current Account मध्ये नेमका फरक काय? तुम्ही कोणतं खातं निवडावं? दरम्यान, आज आशियाई बाजारात वाढीसह व्यवहार होताना दिसत आहे. SGX NIFTY 163.00 अंकांची वाढ दाखवत आहे. त्याच वेळी, Nikkei 0.99 टक्क्यांच्या वाढीसह 26,981.89 च्या आसपास दिसत आहे. स्ट्रेट टाइम्स 0.67 टक्के वाढ दिसत आहे. तैवानचा बाजार आज बंद आहे, तर हँग सेंग 0.85 टक्क्यांनी वाढून 23,751.25 च्या पातळीवर दिसत आहे. त्याच वेळी, कोस्पी देखील आज बंद आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.