मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Saving आणि Current Account मध्ये नेमका फरक काय? तुम्ही कोणतं खातं निवडावं?

Saving आणि Current Account मध्ये नेमका फरक काय? तुम्ही कोणतं खातं निवडावं?

बचत खाते (Saving Account) सामान्य लोकांसाठी केले आहे तर चालू खाते (Current Account) व्यापार्‍यांसाठी केले आहे. बचत खात्यात व्याज उपलब्ध आहे, चालू खात्यात कोणतेही व्याज उपलब्ध नाही.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 30 जानेवारी : तुमच्याकडे बँकेचं अकाऊंट असेल, मात्र तुम्हाला आठवतंय का बँकेत खाते उघडताना तुम्हाला खाते उघडण्याचा फॉर्म दिला जातो. या फॉर्ममध्ये, तुमच्याकडून माहिती घेतली जाते की तुम्हाला बचत खाते (Saving Account) की चालू खाते (Current Account) उघडायचे आहे. परंतु हे अगदी सामान्य आहे की बहुतेक लोक फक्त बचत खाते उघडतात. याशिवाय, जेव्हाही आपण एटीएममधून पैसे काढतो, त्यादरम्यान आपल्याला स्क्रीनवर खाते निवडण्याचा पर्याय देखील मिळतो. तुमचे खाते बचत आहे की चालू आहे हे आम्हाला सांगावे लागेल. अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न पडतो की, करंट आणि सेव्हिंग अकाउंटमध्ये फरक काय? (Difference Between Current and Saving Account) बहुतेक लोकांना या दोन खात्यांमधील फरक माहित नाही. तर बचत आणि चालू बँक खाते यांच्यातील फरक अगदी सोप्या भाषेत आज समजून घेऊयात. याद्वारे तुम्ही तुमच्या गरजेनुसार बँक खाते निवडू शकता. Retirement Planning : निवृत्तीनंतर पैशांची कमतरता भासणार नाही, असं करा आर्थिक नियोजन बचत खाते म्हणजे काय? (What is Saving Account?) बचत खाते सर्वसामान्यांसाठी खूप फायदेशीर आहे. या खात्याद्वारे तुम्हाला पैसे वाचवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या खात्यात तुम्ही थोडे थोडे पैसे वाचवू शकता. जमा केलेल्या पैशावर तुम्हाला व्याजही मिळते. तुम्ही एकट्याने किंवा संयुक्तपणे खाते उघडू शकता. खात्यावर 4 ते 6 टक्के व्याजदर असतो. या बँका स्वतः निर्णय घेतात. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) व्याजदरात काहीशी सूट मिळते. चालू खाते म्हणजे काय? (What is current Account?) चालू खाते बहुतेकदा व्यावसायिकांसाठी उघडले जाते. या खात्यात जास्तीत जास्त व्यवहार सुरू असतात. हे खाते नियमित व्यवहारांसाठी चांगले मानले जाते. खातेदार बहुतेक व्यावसायिक संस्था, फर्म इत्यादींचे असतात. या खात्यावर कोणतेही व्याज मिळत नाही. Tax Planning : टॅक्सची चिंता कमी करा; 'या' दहा पर्यायांद्वारे करा टॅक्स बचत बचत आणि चालू खात्यात हा फरक आहे बचत खाते सामान्य लोकांसाठी केले आहे तर चालू खाते व्यापार्‍यांसाठी केले आहे. बचत खात्यात व्याज उपलब्ध आहे, चालू खात्यात कोणतेही व्याज उपलब्ध नाही. तुम्ही बचत खात्यात मर्यादेपर्यंत व्यवहार करू शकता, तर चालू खात्यात कोणतीही व्यवहार मर्यादा नाही. तुम्हाला हवे तितके व्यवहार तुम्ही करू शकता.
First published:

Tags: Bank, Money

पुढील बातम्या