मराठी बातम्या /बातम्या /मनी /

थिएटर की OTT, सर्वात जास्त पैसे निर्मात्याला कुठून मिळतात?

थिएटर की OTT, सर्वात जास्त पैसे निर्मात्याला कुठून मिळतात?

थिएटर की ओटीटी

थिएटर की ओटीटी

थिएटर की OTT, कधी प्रश्न पडलाय की निर्मात्याला कोणत्या माध्यमातून पैसा जास्त मिळतो?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : कोरोनामुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. अगदी लोकांच्या पेमेंट करण्याच्या पद्धतीपासून ते सणवार साजरे करण्यापर्यंत अनेक बदल आले आहेत. कोरोना काळात थिएटर बंद असल्यामुळे लोक OTT कडे वळले. आता लोकांना OTT ची एवढी सवय झालीय की अजूनही काही लोक थिएटरला जाणं पसंत करत नाहीत.

काही सिनेमे हे फक्त OTT वर प्रदर्शित केले जातात. तर काही सिनेमे हे आधी थिएटर आणि नंतर OTT वर येतात. पण कधी विचार केलाय का की निर्मात्याला नक्की कोणत्या माध्यमातून जास्त नफा मिळत असेल? असं का केलं जातं यामागचं कारण आज आपण समजून घेऊया.

CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार डायरेक्ट-टू-डिजिटल चित्रपट प्रदर्शित करणे हे कोरोना व्हायरस महामारीचे उत्पादन आहे, ज्यामुळे चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या सामग्रीतून पैसे कमविण्याचा अतिरिक्त पर्याय मिळाला आहे. कोरोना निर्बंध हटवल्यानंतर अनेक चित्रपट आजही थेट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत, पण प्रश्न असा आहे की ओव्हर द टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करणे हा चित्रपटगृहांपेक्षा अधिक फायदेशीर सौदा आहे का?

याबाबत निर्मात्यांची वेगवेगळी मते आहेत. ओटीटीवरचा नफा मर्यादित आहे, असं काहींचं म्हणणं आहे, तर काहींचं मत आहे की, छोट्या सिनेमांसाठी ही एक सुरक्षित स्पर्धा आहे. गेल्या दोन वर्षांत ओटीटीने निर्मात्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी उत्पादक खर्चाच्या ८०-१०० टक्के जास्त पैसे दिले आहेत.

Demonization : जुन्या नोटा बाहेर काढा, बंद झालेल्या 500-1000 जुन्या नोटा पुन्हा बदलता येणार?

चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाल्यामुळे आणि कोरोनाचा धोका कमी झाल्याने आता पुन्हा थिएटर सुरू झाले. त्यानंतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने प्रीमियममध्ये 30-40 टक्क्यांनी कपात केली आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मने प्रीमियम का कमी केलं?

गेल्या 2 वर्षात चित्रपटाशी संबंधित कंटेंटची कमतरता होती आणि ओटीटी अशा वेळी सब्सक्रिप्शन वाढवण्यासाठी तयार कंटेंट शोधत होता. कोविडच्या काळात स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकसंख्या उच्च स्तरावर होती. त्यामुळे ओटीटीने निर्मात्यांना जे मागितले ते दिले पण आता ओटीटी ही खरेदीदारांची बाजारपेठ बनली आहे ज्यामुळे प्रीमियम सध्या देण्यात आलेल्या प्रीमियमच्या निम्म्यापर्यंत कमी करण्यात आला आहे.

दुसरीकडे थिएटरमधील सिनेमात काही चांगला कंटेट मिळत नाही अशी ग्राहकांची ओरड चालली आहे. तर तुलनेनं OTT आर्थिक दृष्ट्याही परवडणारं असून चांगला कंटेट मिळत असल्याने ग्राहक OTT पाहाणं पसंत करत आहेत. अलीकडे आमिर खानचा लाल सिंग चढ्ढा, अक्षयचं रक्षाबंधन, विजय देवेराकोंडाचा लिगर आणि इतर अनेक स्टार्सचे सिनेमे काही खास परफॉर्म करू शकले नाहीत.

सणासुदीमुळे आर्थिक बजेट बिघडलं? काळजी नको, गाडी रुळावर आणण्याचा हा आहे प्रभावी मार्ग

छोट्या चित्रपटांसाठी ओटीटी कसा फायदेशीर?

काही मोठी नावं वगळली तर बहुतांश निर्मात्यांकडे आपला सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी माध्यमाचा पर्याय फारसा नसतो. चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी अतिरिक्त खर्च लागतो, ज्याला पब्लिसिटी अँड अॅडव्हर्टायझिंग खर्च म्हणतात.

छोट्या आणि मध्यम बजेटच्या सिनेमांसाठी हा खर्च जवळपास ५-६ कोटी रुपये आहे. त्यामुळे सिनेमा कितीही चांगला असला, तरी स्वबळावर चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करण्याची बँडविड्थ स्वतंत्र निर्मात्यांकडे नाही.

असे निर्मातेहीस्क्रीन्स मिळवण्यासाठी धडपडत असतात आणि अनेकदा त्यांच्या सिनेमांचं थिएटरमधल्या खराब शेड्यूलिंगचा फटका त्यांना सहन करावा लागतो.याच कारणामुळे अनेक छोट्या आणि मध्यम बजेटच्या चित्रपटांचे निर्माते थिएटर्स पुन्हा सुरू होऊनही थेट ओटीटीकडे वळत आहेत.

सावधान! तुमच्याकडेही आहेत का अशी नाणी अन् नोटा? मग घ्या 'या' गोष्टींची काळजी

सध्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सना मार्केटिंगवर ३-४ कोटी रुपये खर्च करायचे नसल्याने अनेक छोटे चित्रपटही ओटीटीला सामोरे जाण्यास अपयशी ठरले आहेत. तर, ओटीटी ऑपरेटर्स बहुतेक वेळा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट खरेदी करत आहेत.

कोणत्या माध्यमातून मिळतो जास्त फायदा?

बॉक्स ऑफिसच्या तुलनेत डायरेक्ट-टू-ओटीटी रिलीज फारसा फायदेशीर ठरत नाही. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून पैसे कमवण्याचे दोन मार्ग आहेत, ज्यात कमिशन आणि अॅक्विझिशन पद्धतीचा समावेश आहे. दोन्हीमध्ये नफ्याचं मार्जिन वेगवेगळं आहे.

स्वत:हून चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर विकला तर तो अॅक्विझिशन प्रकारात मोडतो, तर पूर्व-मंजूर प्रकल्पांच्या बाबतीत तो कमिशन तत्त्वावर काम करतो.

थेट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटासाठी निर्मात्यांना बहुधा एकदा पैसे दिले जातात, तर बॉक्स ऑफिसच्या बाबतीत कमाईला मर्यादा नसते. मात्र, या काळात जोखीमही जास्त असते. पण जर एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असेल तर ओटीटी आणि सॅटेलाइट प्लॅटफॉर्मवर त्याचे मूल्य आणखी वाढतं.

First published:

Tags: Business, Business News, OTT, Start business