मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सावधान! तुमच्याकडेही आहेत का अशी नाणी अन् नोटा? मग घ्या 'या' गोष्टींची काळजी

सावधान! तुमच्याकडेही आहेत का अशी नाणी अन् नोटा? मग घ्या 'या' गोष्टींची काळजी

सावधान! तुमच्याकडेही आहेत का अशी नाणी अन् नोटा? मग घ्या 'या' गोष्टींची काळजी,

सावधान! तुमच्याकडेही आहेत का अशी नाणी अन् नोटा? मग घ्या 'या' गोष्टींची काळजी,

RBI Guidelines : तुमच्याकडे जुनी नाणी किंवा नोटा असल्यास तुम्ही त्यांचा व्यवहार करू शकत नाही. आणि एकदा बँकेत जमा केल्यावर बँकेतून ते पुन्हा काढता येणार नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 26 नोव्हेंबर: जर तुम्ही 1 रुपया आणि 50 पैशांची नाणी किंवा नोट तुमच्याकडे ठेवल्या असतील आणि ती नाणी बँकेत जमा करायची असतील, तर तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय बँकेत सहज जमा करू शकता. पण एकदा तुम्ही जुनी नाणी जमा केल्यानंतर बँका तीच नाणी परत देणार नाहीत, त्याऐवजी तुम्हाला नवीन नाणी किंवा नोटा दिल्या जातील. कारण आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जुनी नाणी चलनात नाहीत. त्यामुळं तुम्ही जुन्या नाण्यांची देवाणघेवाण करू शकत नाही आणि एकदा बँकेत जमा केल्यावर बँकेतून ती पुन्हा काढता येणार नाही. कारण बँकेकडून जुनी नाणी किंवा नोट पुन्हा जारी केली जाणार नाही. ही नाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून संबंधित बँकांमधून काढली जातील.

तुमच्याकडे 1 रुपया आणि 50 पैशांची विशिष्ट प्रकारची नाणी असतील तर ती बँकेत जमा केल्यानंतर ती पुन्हा जारी केली जाणार नाहीत. आरबीआयच्या निर्देशांनुसार, बँकेला काही जमा नाणी पुन्हा जारी करण्याची परवानगी नाही. ही नाणी कायदेशीररीत्या वैध आहेत, परंतु ही नाणी आता चलनातून बाहेर काढली जात आहेत, कारण ही नाणी आता 1990 आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीस वापरली जात होती. मात्र आता ती चलनातून बाहेर काढली आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार ही नाणी पुन्हा जारी करण्यासाठी नाहीत.

आरबीआयनं बँकांना दिला इशारा -

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) ग्राहकांकडून नाणी न स्वीकारणाऱ्या बँकांना ताकीद दिली आहे की, नाणी बदलण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना बँका नाकारू शकत नाहीत, त्यांना ही नाणी स्वीकारावी लागतील. बाजारपेठेतील सर्व प्रकारची नाणी कायदेशीरदृष्ट्या वैध आहेत आणि त्याबद्दल शंका नसावी. बाजारात चालू असलेल्या विविध प्रकारच्या नाण्यांबाबत, आरबीआयनं स्पष्ट केलं की, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर वेळोवेळी वेगवेगळ्या डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह नाणी जारी केली जातात.

हेही वाचा: SEBIकडून म्युच्युअल फंड्स नियमांमध्ये मोठे बदल, गुंतवणूकदारांवर होणार परिणाम

देशातील काही भागातील व्यापारी आणि दुकानदार विशिष्ट प्रकारची नाणी स्वीकारण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी आरबीआयला प्राप्त झाल्या आहेत. या अफवा असून सर्व प्रकारच्या नाण्यांना पूर्ण वैधता मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

अशा प्रकारची फसवणूक तुमच्यासोबतही होऊ शकते-

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) लोकांना जुन्या नोटा आणि नाण्यांच्या खरेदी/विक्रीच्या संदर्भात बाजारात आणि ऑनलाइन मिळणाऱ्या ऑफरबद्दल सावध केलं आहे. काही लोक रिझर्व्ह बँकेच्या नावाचा आणि लोगोचा गैरवापर करत असल्याची अधिकृत माहिती आरबीआयनं दिली आहे. यासोबतच ते ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि मार्केटद्वारे जुन्या नोटा आणि नाण्यांच्या खरेदी-विक्रीशी संबंधित व्यवहारांवर जनतेकडून शुल्क, कमिशन आणि कराची मागणी करत आहेत.

या गोष्टींची विशेष काळजी घ्या-

रिझर्व्ह बँकेचा लोगो (RBI लोगो) पाहून कोणाच्याही शब्दात अडकू नये, असा चुकीचा वापर होत असल्याचं आरबीआयचं म्हणणं आहे. रिझर्व्ह बँक तुमच्याकडून कोणतंही कमिशन, शुल्क किंवा कर आकारत नाही. असे प्रस्ताव देणाऱ्यांनी सावध राहावं, असा इशारा दिला. अनेकजण ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जुन्या नोटा आणि नाण्यांचा फसवणूक व्यवसाय करत आहेत आणि जुन्या नाण्या आणि नोटांच्या बदल्यात मोठी रक्कम मागत आहेत, ज्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Money, Rbi, Rbi latest news