सण-उत्सवात लोकांनी दागिने, गॅजेट्स, भेटवस्तू, उपकरणे यावर मनसोक्त पैसे खर्च केले. आता त्यांचे बजेट कोलमडले आहे. परिणामी, ते आता या खर्चाचे व्यवस्थापन करण्याचे मार्ग शोधत आहेत, जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती पुन्हा रुळावर येऊ शकेल. अशा परिस्थितीत काही मार्ग आहेत, जे तुमची गाडी रुळावर आणतील. (फोटो- न्यूज18)
पर्सनल लोन घेऊन तुम्ही तुमच्या खर्चाचा भार कमी करू शकता. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास, तुम्हाला अगदी स्वस्त दरात प्री-अप्रूव्ड पर्सनल लोन मिळेल, जे तुमच्या जवळपास सर्व अल्पकालीन आर्थिक गरजा पूर्ण करू शकतात. आजच्या काळात यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन अनेक कागदपत्रे पूर्ण करण्याचीही गरज नाही. (फोटो- न्यूज18)
लोकांनी क्रेडिट कार्डचा अतिवापर टाळावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्वरीत पेमेंट करून तुम्ही कर्जापासून मुक्त होऊ शकता. मात्र, बरेचदा असे दिसून येते की लोक क्रेडिट कार्डवरून मोठी पेमेंट करून कर्जाच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते तुम्ही क्रेडिट कार्डऐवजी पर्सनल लोनला प्राधान्य द्यावे. (फोटो- न्यूज18)