मुंबई, 4 जानेवारी : डिजिटल पेमेंटच्या (Digtial Payment)जमान्यात वेगवेगळे पेमेंट गेट वे वापरताना पुरेशी काळजी घेतली नाही, तर केवढं मोठं नुकसान होतं हे ठाण्यातल्या एका व्यक्तीच्या उदाहरणावरून पुन्हा एकदा उमजेल. या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याची जाणीवच या व्यक्तीला उशीरा झाली. ठाणे पोलिसांनी राजेंद्र शर्मा नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
ठाण्यात पातलीपाडा भागात राहणाऱ्या एका व्यक्तीला आपलं काही फर्निचर विकायचं होतं. त्यासाठी त्यानं FACEBOOK वर त्यासंदर्भात पोस्ट केली. 21 डिसेंबरला पोस्ट झालेली ही फेसबुक अॅड पाहून राजेंद्र शर्मा नावाच्या माणसाने त्याच्याशी संपर्क केला. आपण फर्निचर विकत घ्यायला तयार आहोत आणि त्यासाठीचं पेमेंट Google Pay आणि Paytm च्या माध्यमातून देतो असं राजेंद्रने सांगितलं.
ठाण्यातल्या तक्रारदार व्यक्तीने आपला फोन नंबर आणि इतर डिटेल्स राजेंद्रला दिले. पण आपल्या पेटीएम अकाउंटवर पैसे येण्याऐवजी त्यातून पैसे गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आपली फसवणूक झाली नाही ना, असं वाटून त्यानं परत राजेंद्रशी संपर्क केला.
हेही वाचा - मोबाईल चोरी झाला असेल तर 'इथं' शोधा, सरकारनेच उचललं पाऊल
तेव्हा राजेंद्रने चुकून ट्रान्झॅक्शन झालं, असं सांगून दुसरा अकाउंट नंबर मागितला. पण दरम्यान या व्यक्तीच्या खात्यावरून 1 लाखाच्या आसपास रक्कम गायब झालेली होती. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्या व्यक्तीच्या लक्षात आलं. त्याने राजेंद्रविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी राजेंद्र शर्माविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू असल्याचं ठाणे पोलिसांनी सांगितलं.
---------------------
अन्य बातम्या
इंटरनेट नसेल तेव्हाही वापरा YouTube, Gmail आणि Google Map
इथं आई-वडीलच आपल्या लेकीला वेश्या व्यवसाय करायला सांगतात!
मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या महिलेवर अनुराधा पौडवाल यांची पहिली प्रतिक्रिया