इथं आई-वडीलच आपल्या लेकीला वेश्या व्यवसाय करायला सांगतात!

इथं आई-वडीलच आपल्या लेकीला वेश्या व्यवसाय करायला सांगतात!

धक्कादायक बाब म्हणजे, नुसते आई-बापच नाहीतर त्या मुलीचे जवळचे नातलगही मुलीसाठी ग्राहक शोधत असतात.

  • Share this:

मुंबई, 03 जानेवारी : आपला मुलगा-मुलगी मोठे होऊन इंजिनिअर, डॉक्टर, सरकारी अधिकारी व्हावं असं प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं. त्यासाठी अनेक जण रक्ताचं पाणी करून आपल्या पोटच्या गोळ्याचा देखभाल करतात. पण, देशात असा एक समाज जिथे आई-वडीलच आपल्या लेकीला वेश्या व्यवसायात ढकलून देतात. याबद्दल त्यांना कोणताच पश्चापही नसतो. उलट आई-वडील मुलींसाठी सेक्स पार्टनर शोधून देतात. पण ही लोकं असं का करतात? आपल्याच पोटच्या गोळाला या काळ्या दुनियेत ढकलून देतात?

मध्यप्रदेशमधील मालवाच्या नीमच, मंदसौर आणि रतलाम  जिल्ह्यात अशी अनेक गावं आहे जिथे मुली आपल्या आई-वडिलांसमोर सेक्स करतात. या गावात सेक्स करण्यासाठी एका प्रकारे समाज परंपरेप्रमाणे मान्यता मिळाली आहे. आपल्या मुलीने दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवण्याबद्दल या आई-वडिलांची कोणतीची हरकत नसते. उलट, मुली देहविक्री करून खूश होतात, त्यातच या आई-बापांना जास्त आनंद असतो.

ही गोष्ट तुमच्या आमच्यासाठी संतापजनक असली तरी इथं  मुली वेश्या व्यवसाय करण्याची 200 वर्षांपासूनची परंपरा आहे. खरंतर या गावातील राहणाऱ्या बांछडा समाजात मुलींची देहविक्री करणे हे या कुटुंबाकडे जगण्याचं एकमेव साधन आहे. झोपड्यात राहणाऱ्या बांछडा समाजात प्रथे परंपरेनुसार, घरात जन्माला आलेल्या मुलीला वेश्य व्यवसाय करणे हे तिच्या पाचीला पुजलेलं असतं.

मालवामध्ये जवळपास 70 हुन अधिक गावामध्ये देहविक्रीचा खुलेआम धंदा चालतो. या ठिकाणी 250 वेश्या व्यवसाय करणाऱ्या वस्त्या आहे.  जिथे सर्रासपणे अनेक कुटुंबातील सदस्य हे मुलीचा व्यवहार करतात.

या समाजातील मुलींच्या देहविक्रीसाठी स्वत: आई-वडील हे ग्राहक शोधत असतात. या मुलींसोबत जेव्हा कुणी व्यक्ती तयार होतो तेव्हा त्यांच्या कुटुंबाला जास्त आनंद होतो. 'कज्जो आयो' असं म्हणून ते त्या व्यक्तीचं स्वागत करता. 'कज्जो आयो' म्हणजे ग्राहक आला. त्यानंतर या मुली त्या व्यक्तीसोबत घराशेजारी आपल्या नातेवाईकांसमोर सेक्स करतात. धक्कादायक बाब म्हणजे, नुसते आई-बापच नाहीतर त्या मुलीचे जवळचे नातलगही मुलीसाठी ग्राहक शोधत असतात.  ज्या कुटुंबाला पहिला ग्राहक मिळतो, त्या घरातील मुलीचं किंमत ही सर्वात जास्त ठरते.

एकीकडे मुलगी ही लक्ष्मी समजली जाते तर कुठे मुली या आपल्यावर ओझं आहे, असा समज काही लोकांचा असतो. परंतु, बांछडा समाजामध्ये मुलगी जन्माला आल्यावर जल्लोष साजरा केला जातो.  मुलीच्या जन्माच्या वेळी सण-उत्सवाप्रमाणे आनंद व्यक्त केला जातो. कारण, हीच मुलगी मोठी झाल्यावर त्या कुटुंबाचे कमाईचे साधन होणार असते. या समाजामध्ये जर कुठल्या मुलाने लग्न करण्याचे ठरवले तर त्याला हुंडा म्हणून 15 लाख रूपये द्यावे लागतात. त्यामुळे या समाजातील अनेक तरूण हे अविवाहितच राहतात.

गांजासाठी बदनाम असलेल्या अंचलमध्ये दिवसापेक्षा रात्र जास्त मोठी असते.  रतलाम, नीमच आणि मंदसौरपासून जाणाऱ्या हायवेवर बांछडा समाजातील मुली खुलेआम देहविक्री करतात. या मुली महामार्गाने जाणाऱ्या प्रवाशांना बोलावता आणि आपल्या शरीराचा सौदा करतात. या मुली जेवढी कमाई करतात त्याचा हिस्सा कुटुंबामध्ये वाटून देतात.

बांछडा समाज हा कुठून आणि कसा आला याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. असं सांगितलं जातं की, 150 वर्षांपूर्वी जेव्हा इंग्रज नीमचमध्ये तैनात होते. तेव्हा आपल्या सैनिकांची वासनापूर्ती करण्यासाठी या समाजाला इथं आणलं होतं. त्यानंतर नीमच नंतर रतलाम आणि मंदसौर भागात या समाजाने आपल्या वस्त्या वाढवल्या.

Published by: sachin Salve
First published: January 3, 2020, 10:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या