Home /News /technology /

इंटरनेट नसेल तेव्हाही वापरा YouTube, Gmail आणि Google Map

इंटरनेट नसेल तेव्हाही वापरा YouTube, Gmail आणि Google Map

इंटरनेट कनेक्शन नसेल तेव्हाही तुम्हाला युट्यूब व्हिडिओ पाहता येतात. तसंच गुगल मॅप आणि जीमेल अॅक्सेस करता येतो.

    इंटरनेटवर अनेक सोशल मीडिया साईटवरून मनोरंज होते. माहितीची देवाण घेवाण केली जाते. हेच इंटरनेट कनेक्शन बंद झालं की बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला की काय असंच अनेकांना वाटतं. मात्र काही अॅप अशी आहेत ज्यांचा वापर इंटरनेट नसेल तेव्हाही करता येतो. यामध्ये युट्यूब व्हिडिओ पाहता येतात, जीमेल अॅक्सेस करता येतो. तसेच गुगल मॅपही पाहता येतो. जीमेल - गुगलने जीमेलमध्ये एक नवीन फीचर अॅड केलं आहे. यामध्ये इंटरनेटशिवाय मेल अॅक्सेस करता येतात. जीमेल लॉगइन केल्यानंतर त्याच्या सेंटिंगमध्ये ऑफलाइन ऑप्शन सिलेक्ट करा. तुम्ही क्रोम ब्राउझर वापरत असाल तर हा ऑप्शन दिसेल. जर त्यात ऑफलाइन एक्स्टेंशन इन्स्टॉल नसेल तर ते इन्स्टॉल करून ऑफलाइन मोड अॅक्टिव्हेट करता येते. ऑफलाइन टॅबमध्ये इनेबल ऑफलाइन ई-मेल पर्यायावर क्लिक केल्यानंतर कोणते ई-मेल ऑफलाइन ठेवायचे ते सिलेक्ट करावे लागेल. त्यानंतर तुम्ही त्याचा वापर करू शकता. गुगल मॅप - इंटरनेटशिवाय तुम्हाला गुगल मॅप वापरता येतो. त्यासाठी इंटनेट असताना गुगल मॅप साइन करा. जिथं जायचं आहे ते ठिकाण शोधा आणि त्याचा ऑफलाइन मॅप डाऊनलोड कराल. तो डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला इंटरनेट नसताना किंवा नेटवर्क कमी असेल तेव्हा वापर करता येईल. इंटरनेट ऑन असताना ज्या पद्धतीने मॅप वापरता येतो तसाच तो नेट ऑफ असेल तेव्हाही वापरता येतो. यूट्यूब - ऑनलाइन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वाधिक युट्यूबचा वापर केला जातो. यावरील व्हिडिओ ऑफलाइन सेव्ह करता येतात. यानंतर इंटरनेट नसेल तेव्हाही तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. इंटरनेट सुरू असताना युट्यूबवर तुम्हाला हवा असलेला व्हिडिओ ओपन करा. त्यानंतर व्हिडिओच्या ऑफलाइन या पर्यायावर क्लिक करा. इथं तुम्हाला व्हिडिओ क्वालिटीसुद्धा सिलेक्ट करता येते. त्यानंतर व्हिडिओ ऑफलाइन पाहता येतो.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Gmail, Google map, Youtube

    पुढील बातम्या