Home /News /technology /

मोबाईल चोरी झाला असेल तर 'इथं' शोधा, सरकारनेच उचललं पाऊल

मोबाईल चोरी झाला असेल तर 'इथं' शोधा, सरकारनेच उचललं पाऊल

तुमचा मोबाईल चोरीला गेला असेल तर तो शोधण्यासाठी सरकारनेच पाऊल उचललं आहे. मोबाईल शोधून देण्यासाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आलं आहे.

    सध्या सर्व कामे चुटकीसरशी मोबाईलवरून करणं शक्य झालं आहे. मोबाईलला इंटरनेटची जोड मिळाल्यानं त्याचा मिनी कॉम्प्युटर झाला आहे. बाजारात स्वस्तातल्या फोनपासून महागड्या स्मार्टफोनची रेलचेल बघायला मिळते. यातच महागडे फोन चोरीला जाण्याचे प्रमाणही वाढलं आहे. मोबाईल चोरीला गेल्यानंतर त्यातल्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असते. आता मोबाईल चोरी रोखण्यासाठी आणि माहिती सुरक्षित राहण्यासाठी सरकारने पाऊल उचललं आहे. तुमचा मोबाईल चोरी झाली तरी त्याचा वापर इतर कोणी करू शकणार नाही. त्यामुळे चोरीचे प्रमाण कमी होईल. मोबईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तो शोधणं कठिण असतं. मोबाईल हरवल्यानंतर एखाद्या सदगृहस्थाच्या हाती लागला तर तो परत मिळेल. पण जर अट्टल चोरट्यांनी मोबाईल लंपास केला असेल तर त्यातील माहिती चोरीला जाण्याची आणि तो रिसेट करून नवीन सिम कार्ड वापरून विकण्याची शक्यता असते. असे प्रकार होऊ नयेत यासाठी सरकारने CEIR सुरू केले आहे. CIER म्हणजे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी सिस्टीम. या सिस्टीममुळे तुमचा हरवलेला मोबाईल ट्रॅक करता येतो. तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर आयएमईआय नंबर रजिस्टर करून तो ट्रॅक करणं शक्य होतं. फक्त मोबाईल ट्रॅक करता येतो एवढंच नाही तर सिमकार्डही ब्लॉक करू शकता. मोबाईल चोरणाऱ्याने दुसरं सिमकार्ड त्यामध्ये घातलं तर त्याची माहिती पोलिसांना आणि तुम्हाला समजते. त्यामुळे मोबाईल परत देणं किंवा त्याचा वापर न करता तसाच टाकून देणं हाच पर्याय त्यांच्याकडे उरतो. सरकारने CEIR चे संकेतस्थळ सुरू केलं आहे. या वेबसाईटवर तुम्हाला याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. तुमचा मोबाईल ब्लॉक करण्याआधी तुम्हाला तो चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करावी लागेल. त्याची एक कॉपी तुमच्याकडे असेल तरच तुम्ही मोबाईल ब्लॉक करून त्याचा शोध घेऊ शकता. संकेत स्थळावर तुमचा मोबाईलचा आयएमईआय नंबर कसा काढायचा इथंपासून ते मोबाईल चोरीला गेल्यास काय करायचं याची सर्व माहिती दिली आहे. आयएमईआय नंबर चेक करण्यासाठी तुम्ही मोबाईलवरून *#06# हा नंबर डायल करा. क्लिक करा : CEIR संकेतस्थळ CEIR च्या संकेतस्थळावर मोबाईल चोरीला गेल्यास तो ब्लॉक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्यानंतर मोबाईल सापडला की तो अनब्लॉक करता येणार आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला मोबाईलच्या डिटेल्स मिळतील. वाचा : इंटरनेट नसेल तेव्हाही वापरा YouTube, Gmail आणि Google Map वाचा : Whatsapp Uninstall किंवा चॅट क्लिअर केल्यानंतर Backup कसा घ्यायचा?
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Mobile

    पुढील बातम्या