Home /News /money /

Taxpayers 9 दिवसांत भरा ITR; जाणून घ्या Income Tax Return फाइल करण्याबाबत

Taxpayers 9 दिवसांत भरा ITR; जाणून घ्या Income Tax Return फाइल करण्याबाबत

इन्कम टॅक्स कायद्यानुसार, प्रत्येक करदात्याला ITR भरणं अनिवार्य आहे. तो ऑफलाईन, ऑनलाईन किंवा सॉफ्टवेअरच्या मदतीने भरता येऊ शकतो. ऑफलाईन प्रकारात सगळ्या प्रकारचे ITR फॉर्म भरता येतात. ऑनलाईन प्रकारात मात्र केवळ फॉर्म 1 आणि फॉर्म 4 हेच भरता येतात. करदाते सॉफ्टवेअरच्या मदतीने सर्व प्रकारचे ITR फॉर्म्स भरू शकतात.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 23 डिसेंबर : कोरोना संकटामुळे केंद्र सरकारने यंदा इन्कम टॅक्स रिटर्न फाइल (Income Tax Return Filing) करण्याची मुदत अनेकदा वाढवली होती. आता मात्र या मुदतीचे शेवटचे 9 दिवस शिल्लक राहिले आहेत. 31 डिसेंबर 2020 पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न्स फाइल करावाच लागणार आहे. सरकारने ITR फाइल करण्याची प्रक्रिया इतकी सोपी केली आहे, की करदाता (Taxpayer) घरी बसूनही ते भरू शकतो. त्यासाठी काही डॉक्युमेंट्स (Documents) आपल्यासोबत तयार ठेवावे लागतात. इन्कम टॅक्स कायद्यानुसार, प्रत्येक करदात्याला ITR भरणं अनिवार्य आहे. तो ऑफलाईन (Offline), ऑनलाईन (Online) किंवा सॉफ्टवेअरच्या (Software) मदतीने भरता येऊ शकतो. ऑफलाईन प्रकारात सगळ्या प्रकारचे ITR फॉर्म भरता येतात. ऑनलाईन प्रकारात मात्र केवळ फॉर्म 1 आणि फॉर्म 4 हेच भरता येतात. करदाते सॉफ्टवेअरच्या मदतीने सर्व प्रकारचे ITR फॉर्म्स भरू शकतात. आपल्याला लागू असलेला ITR फॉर्म जावा किंवा एक्सेल फॉरमॅटमध्ये डाउनलोड करून तो ऑफलाईन भरता येतो. XML तयार करून ती ई-फायलिंग पोर्टलवर (E-filing portal) लॉगिन करून अपलोड करता येते. या माध्यमातून सर्व प्रकारचे ITR फॉर्म भरता येतात. ऑनलाइन रिटर्न भरायचे असल्यास ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करून ITR तयार करून सबमिट करता येतो. करदात्यांना ITR ऑफलाईन पद्धतीने भरायचा असेल, तर आधी www.incometaxindiaefiling.gov.in या ई-फायलिंग पोर्टलवर जावं. त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न सॉफ्टवेअरवर क्लिक करून मेनूमध्ये जाऊन डाउनलोडवर क्लिक करावं. आपलं असेसमेंट ईयर निवडावं आणि आपल्याला लागू असलेला ITR डाउनलोड करावा. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी असेसमेंट इयर 2020-2021 हे असेल. त्यानंतर ITR फॉर्म भरावा. करदाता प्री फिल्ड XML देखील डाउनलोड करू शकतो. त्यात अनेक प्रकारची माहिती आधीच भरलेली असेल. त्यासाठी ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करून माय अकाउंट मेनूवरून डाउनलोड प्री-फिल्ड एक्सएमएल (Pre filled XML) या पर्यायावर क्लिक करावं लागेल.

  (वाचा - ...अन्यथा अडचणी वाढणार;31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा हे काम,परिवहन विभागाची माहिती)

  माहिती व्हॅलिडेट कशी कराल? ITR फॉर्ममध्ये भरलेली सगळी माहिती व्हॅलिडेट (Validate) करा आणि टॅक्स कॅल्क्युलेट करा. त्यानंतर XML तयार करून सेव्ह करा. ई-फायलिंग पोर्टलला लॉगिन करून ई-फाइल मेनूतून इन्कम टॅक्स रिटर्न हा पर्याय निवडा. त्यात तुमचा पर्मनंट अकाउंट नंबर (PAN) आधीच भरलेला असेल. असेसमेंट ईयर, ITR फॉर्म नंबर, फायलिंग टाइम (ओरिजिनल की रिवाइज्ड) आणि सबमिशन मोड या गोष्टी निवडून XML अपलोड करावी. ITR व्हेरिफाय करण्यासाठी डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट, आधार ओटीपी, माय अकाउंटमधील जनरेट ईव्हीसी हा पर्याय यांपैकी कोणताही एक पर्याय निवडावा. करदात्याला ITR नंतर प्रमाणित करायचा असेल, तर रिमाइंडरचा पर्याय दिलेला आहे. ITR ऑनलाईन व्हेरिफाय करायचा नसेल, तर बेंगळुरूच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला ITR-5ची स्वाक्षरी केलेली कॉपी पाठवू शकता. हा पर्याय निवडल्यावर अटॅच करा डिजिटल सिग्नेचर व्हेरिफाय करायचं आहे की नाही, यांपैकी एक पर्याय निवडल्यावर कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करा. आपली ITR XML फाइल अटॅच करा आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करा. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेटचा (Digital Signature Certificate) पर्याय तुम्ही निवडला असेल, तर डिजिटल सिग्नेचर अटॅच करा. आधार ओटीपी पर्याय निवडला असेल, तर मोबाइलवर आलेला ओटीपी भरा. ईव्हीसी हा पर्याय निवडला असेल, तर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ईव्हीसी भरा. ई-व्हेरिफाय लॅटर हा पर्याय निवडला असेल, तर ITR सबमिट झाला आहे, मात्र व्हेरिफाय झालेला नाही. ई-व्हेरिफाय करायचं नाही, असा पर्याय निवडला असेल, तर नंतर ITR वर स्वाक्षरी करून बेंगळुरू पाठवून द्या. त्याआधी ITR Submit या पर्यायावर क्लिक करावं लागेल.

  (वाचा - 9 दिवसांमध्ये ITR नाही फाइल केला तर 10000 रुपये दंड, वाचा सविस्तर)

  फॉर्म-1 आणि फॉर्म-4 ऑनलाईन करदात्याला ऑनलाइन पद्धतीने ITR फाइल करायचा असेल, तर केवळ फॉर्म-1 आणि फॉर्म-4 या प्रकारचे फॉर्मच भरता येतील. म्हणजेच वेतनातून मिळणारं उत्पन्न किंवा अन्य स्रोत किंवा हाउस प्रॉपर्टीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा स्रोत असलेल्यांनाच ऑनलाइन फॉर्म भरता येईल. त्यासाठी www.incometaxindiaefiling.gov.in या इन्कम टॅक्सच्या ई-फायलिंग पोर्टलवर जावं लागेल. ई-फायलिंगसाठी लॉगिन करून ई-फाइल मेनूतून इन्कम टॅक्स रिटर्न या पर्यायावर क्लिक करावं. त्यामध्ये तुमचा PAN आधीच भरलेला असेल. असेसमेंट इयर, ITR फॉर्म नंबर, फायलिंग टाइप आणि सबमिशन मोड निवडा. ITR फॉर्ममधले आपल्याला लागू असलेले आणि बंधनकारक असलेले फिल्ड्स भरा. फॉर्म भरताना वारंवार सेव्ह ड्राफ्ट या पर्यायावर क्लिक करत राहा.

  (वाचा - SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 452 पदांसाठी भरती, वाचा कधीपर्यंत करू शकता अर्ज)

  ऑनलाइन फायलिंगसाठी डिजिटल सिग्नेचर आवश्यक ITR ऑनलाईन फाइल करताना टॅक्स पेड अँड व्हेरिफिकेशन या टॅबमध्ये व्हेरिफिकेशन हा पर्याय निवडावा. त्यासाठी करदात्याकडे व्हॅलिड आधार किंवा प्रीव्हॅलिडेटेड डीमॅट अकाउंट किंवा डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट असावं लागेल. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट तुमच्या पॅन कार्डसोबत ई-फायलिंगसाठी रजिस्टर्ड असलं पाहिजे. त्यामध्ये करदात्याला ITR व्हेरिफाय करण्यासाठी 120 दिवसांचा अवधीही मिळतो. करदाता हवं तर हा पर्याय निवडू शकतो. कोणाला ते नको असेल, तर ती व्यक्ती ITR व्हेरिफाय करून पोस्टाने इन्कम टॅक्सच्या बेंगळुरू ऑफिसला पाठवू शकते. कोणाला लगेचच व्हेरिफिकेशन करायचं असेल, तर प्रीव्ह्यू अँड सबमिट या पर्यायावर क्लिक करावं लागेल. सॉफ्टवेअरच्या मदतीने ITR भरणं आहे सर्वांत सोपं ITR भरण्याचा शेवटचा पर्याय आहे सॉफ्टवेअरद्वारे भरणं. या प्रकारातून सर्व प्रकारचे ITR फाइल करता येतात. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ITR भरणं सर्वांत सोपं आहे. यात वारंवार एकच माहिती भरावी लागत नाही. एकदा तयार केलेल्या मास्टर डाटामधून सॉफ्टवेअर आवश्यक तो डाटा घेते. कंपॅरिझन, रिकॉन्सिलेशन आणि एरर रेक्टिफिकेशन या सुविधा सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून ग्राहकांना मिळतात. रिटर्न फाइल करण्याच्या आधी युजर सॉफ्टवेअरच्या मदतीने आधीच भरलेला फॉर्म मिळवू शकतात आणि चुका सुधारू शकतात. वेळेत ITR फाइल करण्याचे फायदे  शेवटच्या दिवसाआधी ITR फाइल करण्याचे अनेक फायदे आहेत. काही चूक झाली असेल, तर वेळेआधी फॉर्म भरलेला असल्यास ती सुधारण्याची संधी मिळते. ITRमध्ये चूक झाल्यास इन्कम टॅक्स विभागाकडून दंड आकारला जाऊ शकतो किंवा नोटीस बजावली जाऊ शकते. लवकर ITR फाइल केला असेल, तर करदात्यांना इन्कम टॅक्स रिफंड लवकर मिळतो. रिटर्न फाइल करण्याआधी फॉर्म 16, रेंटल अॅग्रीमेंट्स, प्रॉपर्टी टॅक्स रिसिट्स, होम लोनची इंटरेस्ट सर्टिफिकेट्स, बँक स्टेटमेंट, बँक लोनची इंटरेस्ट सर्टिफिकेट्स, कॅपिटल गेन स्टेटमेंट, टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट्स आदी कागदपत्रं तयार ठेवावीत.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Income tax

  पुढील बातम्या