Home /News /technology /

...अन्यथा अडचणी वाढणार; 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा हे काम, परिवहन विभागाची महत्त्वपूर्ण माहिती

...अन्यथा अडचणी वाढणार; 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा हे काम, परिवहन विभागाची महत्त्वपूर्ण माहिती

देशात पसरलेल्या कोरोना व्हायरस दरम्यान केंद्र सरकारने परिवहन नियमांमध्ये 31 डिसेंबरपर्यंत सूट दिली होती. परंतु आता 31 डिसेंबरनंतर अवैध लायसन्स बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे.

  नवी दिल्ली, 23 डिसेंबर : जर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) आणि आरसीची (RC) वैधता संपली असेल, तर ती 31 डिसेंबरआधी रिन्यू करा. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नियमांनुसार, नव्या वर्षात जर तुमच्या वाहनाचे सर्व कागदपत्र वॅलिड अर्थात वैध नसल्यास, 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. देशात पसरलेल्या कोरोना व्हायरस दरम्यान केंद्र सरकारने परिवहन नियमांमध्ये 31 डिसेंबरपर्यंत सूट दिली होती. परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2020 नंतर अवैध ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी आणि फिटनेस प्रमाणपत्रवाल्या वाहनांवर 31 डिसेंबर 2020 पर्यंत कोणतीही कारवाई केली जाणार नाही. परंतु 31 डिसेंबरनंतर अवैध लायसन्स बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे.

  (वाचा - कारच्या सेफ्टी फीचर्समधील Dual Airbag बद्दल सरकार घेणार मोठा निर्णय)

  नव्या मोटर वाहनांनुसार, जर तुम्ही दुचाकी-टू व्हिलर चालवत असाल आणि तुमच्याकडे वॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स नसेल किंवा त्याची वैधता संपली असल्यास तुम्हाला 5 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. कसं कराल रिन्यू - - परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईट parivahan.gov.in वर जा. - येथे 'ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी सेवा' वर क्लिक करावं लागेल. - त्यानंतर 'डीएल सेवा' यावर क्लिक करा. - यात डीएल (DL) नंबरसह काही आवश्यक माहिती भरावी लागेल. - त्यानंतर सर्व गरजेचे कागदपत्र अपलोड करा.

  (वाचा - जितकी गाडी चालवाल, तितकाच प्रीमिअम भरा; ड्रायव्हिंगसाठी नवी INSURANCE POLICY)

  - नंतर एखाद्या जवळच्या RTO कार्यालयात जाऊन स्लॉट बुक करण्यासाठी पेमेंट करावं लागेल. - आरटीओ कार्यालयात बायोमेट्रिक डिटेल्सची तपासणी केली जाईल आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. - त्यानंतर लायसन्स रेन्यू होईल. - याचप्रमाणे आरसीदेखील रिन्यू करता येणार आहे.

  (वाचा - बाईकवरून प्रवास करण्याच्या नियमात बदल; आता हे नियम पाळावेच लागणार)

  देशभरातील कोरोना व्हायरसदरम्यान आरटीओ ऑफिसमध्ये अपॉइंटमेंटसाठी मोठ्या रांगा आहेत. त्यामुळे अपॉइंटमेंट मिळण्यासाठी काही वेळ लागू शकतो.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: While driving

  पुढील बातम्या