Home /News /money /

9 दिवसांमध्ये ITR नाही फाइल केला तर 10000 रुपये दंड, मिळणार नाही अनेक करसवलतींचा फायदा

9 दिवसांमध्ये ITR नाही फाइल केला तर 10000 रुपये दंड, मिळणार नाही अनेक करसवलतींचा फायदा

आयटीआर फाइल (ITR Filing) करण्यास उशीर झाल्यास करदात्याला दंड तर भरावा लागेलच पण त्याचबरोबर अनेक प्रकारच्या कर सवलती मिळणार नाहीत.

    नवी दिल्ली, 22 डिसेंबर: केंद्र सरकारने कोरोना काळात (Coronavirus Crisis) करदात्यांना दिलासा देण्यासाठी इनकम टॅक्स रिटर्न (ITR) फाइल करण्याची डेडलाइन वाढवली आहे. या नवीन डेडलाइनचे आता केवळ 9  दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे करदात्यांनी लवकरात लवकर ITR फाइल करणं आवश्यक आहे, जेणेकरून कोणतीही चुक झाल्यास ती सुधारता येईल. जर करदात्यांनी आयटीआर भरण्यास उशीर केला तर त्यांना अनेक फायदे मिळणार नाहीत. उशिरा आयटीआर भरल्यामुळे आयकरामध्ये सवलत (Income Tax Exemptions) मिळत नाही तर दुसरीकडे करदात्यांना दंड देखील भरावा लागतो. करदात्यांनी आयटीआर उशिरा भरला तर त्यांचं केवळ नुकसानच होईल. आयकर कायदा (Income Tax Act) कलम 234A अंतर्गत करदात्यांना 1 टक्के साधारण दराने दरमहा व्याज (Simple Interest)द्यावं लागेल. केंद्र सरकारने आयटीआर फाइल करण्यास विलंब केल्यास शुल्क आकारण्याचीही व्यवस्था केली आहे. (हे वाचा-KDMC ची भन्नाट शक्कल! या योजनेतून शहर तर स्वच्छ होईलच पण गरीबांचं पोटही भरेल) आर्थिक वर्ष 2018-2019 पासून ही व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. याचा अर्थ कोणताही करदाता डेडलाइन नंतर अर्थात 31 डिसेंबर नंतर आयटीआर फाइल करत असेल तर त्याला दंड भरावा लागेल. ही रक्कम 10000 रुपयांपर्यंत आकारली जाऊ शकते. दरम्यान करदात्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त नाही आहे तर लेट फीजच्या स्वरुपात 1000 रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला जाणार नाही. नाही मिळणार टॅक्स  Exemption-Deduction आयटीआर फाइल करण्यास उशीर झाल्यास करदात्याला दंड तर भरावा लागेलच पण त्याचबरोबर अनेक प्रकारच्या कर सवलती मिळणार नाहीत. यामध्ये आयकर कायदा कलम 10-A आणि 10-B अंतर्गत मिळणारी सूट तुम्हाला मिळणार नाही. तर कलम 80IA, 80IAB, 80IC, 80ID आणि 80IE अंतर्गत मिळणारी सूटही नाही मिळणार. इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्यास उशीर झाला तर आयकर कायदा कलम 80IAC, 80IBA, 80JJA, 80JJAA, 80LA, 80P, 80PA, 80QQB आणि 80RRB अंतर्गत मिळणारा टॅक्स डिडक्शनचा लाभही घेता येणार नाही.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Income tax, Money

    पुढील बातम्या