SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 452 पदांसाठी भरती, वाचा कधीपर्यंत करू शकता ऑनलाइन अर्ज

SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 452 पदांसाठी भरती, वाचा कधीपर्यंत करू शकता ऑनलाइन अर्ज

तुम्ही देखील बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. SBI मध्ये 452 पदांवर नोकरभरती होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 डिसेंबर: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) वेगवेगळ्या पदांवरच्या 452 रिक्त जागांवर (Vacancy) भरती (Recruitment) करण्याची ऑनलाइन अधिसूचना (Online Notification) प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.co.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर 11 जानेवारी 2021पर्यंत अर्ज करू शकतात.

एकूण रिक्त जागांपैकी 16 जागा स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (इंजिनीअर - फायर) (SCO) या पदासाठी आहेत. डेप्युटी मॅनेजर (इंटर्नल ऑडिट) या पदासाठी 28, स्पेशालिस्ट ऑफिसर (नेटवर्क स्पेशालिस्ट) या पदासाठी 32, स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (सिक्युरिटी अॅनालिस्ट) या पदासाठी 100, स्पेशालिस्ट केडर ऑफिसर या पदासाठी 236, स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (मॅनेजर - क्रेडिट प्रोसीजर्स) या पदासाठी 2, तर स्पेशालिस्ट क्रेडिट ऑफिसर (मार्केटिंग) या पदासाठी 38 जागा बँकेला भरायच्या आहेत. स्क्रोलमध्ये याबाबत वृत्त देण्यात आलं आहे.

काही पदांसाठीची भरती उमेदवारांनी अर्ज सादर केल्यानंतर त्यातून निवडलेल्या उमेदवारांच्या (Shortlisted Candidates) थेट मुलाखतीद्वारे (Direct Interview) होणार आहे. अन्य पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन चाचणी (Online Test) होणार असून, ती फेब्रुवारी 2021मध्ये होण्याची शक्यता आहे.

(हे वाचा-ख्रिसमसलाच या कंपनीच्या 1800 कर्मचाऱ्यांना झटका,बंद होणार महाराष्ट्रातील प्लँट)

तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात, त्या पदासाठीचे पात्रता निकष (Eligibility Criteria) तुम्ही पूर्ण करत आहात, याची काळजी उमेदवारांनी घेतली पाहिजे. त्यांना योग्य त्या पद्धतीने आपली संबंधित सर्व कागदपत्रे अर्ज करताना अपलोड करावी लागणार आहेत. तसं न केल्यास त्यांचा अर्ज ग्राह्य न धरता बाद केला जाईल, असं टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीत नमुद करण्यात आलं आहे.

(हे वाचा-Bank Holidays: 3 दिवस बंद राहणार बँका,खोळंबा टाळण्यासाठी पूर्ण करून घ्या कामं)

11 जानेवारी 2021पर्यंत अर्जासोबत शुल्कही ऑनलाइन पद्धतीने जमा केल्यावरच नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांना sbi.co.in या वेबसाइटच्या होमपेजवरच्या 'करिअर्स' या टॅबवर जावं लागणार आहे. त्या पेजवर 'लेटेस्ट अनाउन्समेंट' या विभागात रिक्त पदांच्या भरतीची माहिती देण्यात आली असून, तेथे 'अप्लाय ऑनलाइन' यावर क्लिक करायचं आहे.

अर्ज केलेले उमेदवार पात्रतेच्या निकषात बसत असतील तरच आणि त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच भरती अंतिम समजण्यात येईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 22, 2020, 4:50 PM IST

ताज्या बातम्या