जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 3 रुपयांचा शेअर पोहोचला 180 रुपयांवर! केवळ 2 वर्षात 1 लाखाचे झाले 59 लाख; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

3 रुपयांचा शेअर पोहोचला 180 रुपयांवर! केवळ 2 वर्षात 1 लाखाचे झाले 59 लाख; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

3 रुपयांचा शेअर पोहोचला 180 रुपयांवर! केवळ 2 वर्षात 1 लाखाचे झाले 59 लाख; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

दीर्घ कालावधीसाठी स्टॉकमध्ये गुंतवणूक (Stock Return) केल्यास मोठा परतावा मिळू शकतो. पण असे काही शेअर्स आहेत, ज्यांनी अतिशय कमी वेळात आपल्या शेअर होल्डर्सला बंपर रिटर्स दिले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवलं आहे. दीर्घ कालावधीसाठी स्टॉकमध्ये गुंतवणूक (Stock Return) केल्यास मोठा परतावा मिळू शकतो. पण असे काही शेअर्स आहेत, ज्यांनी अतिशय कमी वेळात आपल्या शेअर होल्डर्सला बंपर रिटर्स दिले आहेत. टाटा ग्रुपची कंपनी टेलिसर्विसेज लिमिटेड या TTML हे याचं उदाहरण आहे. या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये (Multibagger Penny Stock) मागील 2 वर्षात 5800 टक्के वाढ झाली आहे. मागील 6 महिन्यात TTML चे शेअर जवळपास 43 रुपयांवरुन 180.80 रुपयांवर पोहोचले आहे. यावेळी जवळपास 320 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. त्याचप्रमाणे मागील एका वर्षात हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक जवळपास 20 रुपयांवरुन 180.80 पर्यंत पोहोचला होता. या काळात शेअरमध्ये 820 टक्क्यांची वाढ झाली.

हे वाचा -  LIC IPO मध्ये गुंतवायचे आहेत पैसे? त्यापूर्वी वाचा ही महत्त्वाची माहिती

2 वर्षात 5800 टक्क्यांची वाढ - या मल्टीबॅगर पेनी स्टॉकची किंमत 3.05 रुपयांवरुन 8 फेब्रुवारी 2022 रोजी 180.80 रुपयांवर पोहोचली. यादरम्यान 5800 टक्क्यांची वाढ झाली. 1 लाखाचे झाले 59 लाख - एखाद्या गुंतवणुकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर त्याचे 1 लाख रुपयांचे 59 लाख रुपये बनले असते.

हे वाचा -  Multibagger Share : ‘या’ टेक्सटाईल शेअरमुळे गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट

TTML, टाटा टेलिसर्विसेजची सब्सिडियरी कंपनी आहे. ही कंपनी आपल्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. कंपनीच्या ग्राहकांच्या लिस्टमध्ये अनेक मोठी नावं सामिल आहेत. मार्केट एक्सपर्ट्सनुसार, मागील महिन्यात कंपनीने स्मार्ट इंटरनेट बेस्ड सर्विस कंपन्यांसाठी सुरू केली आहे. याला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. यात कंपन्यांना फास्ट इंटरनेटसह क्लाउड बेस्ड सिक्योरिटी सर्विसेज आणि ऑप्टोमाइज्ड कंट्रोल मिळतो आहे. याची खास बाब म्हणजे क्लाउड आधारित सिक्योरिटी आहे, ज्यात डेटा सुरक्षित ठेवला जाऊ शकतो. यात सर्व प्रकारच्या सायबर फ्रॉडपासून सुरक्षेची सुविधा इन-बिल्ट देण्यात आली आहे. तसंच फास्ट इंटरनेट सुविधाही दिली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात