Home /News /money /

Multibagger Share : 'या' टेक्सटाईल शेअरमुळे गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, ब्रोकरेज फर्मची BUY रेटिंग

Multibagger Share : 'या' टेक्सटाईल शेअरमुळे गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, ब्रोकरेज फर्मची BUY रेटिंग

Lagnam Spintex ही भारतातील उच्च दर्जाची कापूस धाग्याची आघाडीची उत्पादक आहे. कंपनीने आपले काम वाढवण्यासाठी आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मोठी रक्कम खर्च करण्याची घोषणा केली आहे.

    मुंबई, 8 फेब्रुवारी : 2021 मध्ये अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना (Investors) चांगला नफा दिला. अनेक शेअर्सनी तर भागधारकाचे पैसे दुप्पट केले होते. त्या शेअर्समध्ये Lagnam Spintex स्टॉकचाही समावेश आहे. या शेअरने मल्टीबॅगर शेअर (Multibagger Share) क्लबमध्ये थोडासा उशीरा प्रवेश केला असला तरी आता सुमारे अडीच महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. NSE वर 30 नोव्हेंबर रोजी शेअर 47.20 रुपयांवर बंद झाला. सोमवार 7 फेब्रुवारी रोजी त्याचा दर 94.30 रुपये होता. बाजार विश्लेषक अजूनही लॅग्नम स्पिनटेक्स शेअरवर बुलिश आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक फंडामेंटल आणि टेक्निकल दोन्ही दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह दिसतो. चॉईस ब्रोकिंगचे सुमित बगाडिया यांनी खरेदीची शिफारस केली आहे. शॉर्ट टर्मसाठी, त्यांनी 110 ते 115 रुपयांचे टार्गेट दिले आहे. या कॉटन यार्न कंपनीने नुकतीच विस्ताराची योजना जाहीर केल्याचे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. यासाठी 218 कोटी रुपये खर्च होणार आहेत. याशिवाय कंपनीने 300 कोटींच्या लाइन ग्रोथचीही घोषणा केली होती. स्टॉक विश्लेषकांचे म्हणणे आहे की या स्टॉकने नुकतेच 90 रुपयांचे ब्रेकआउट दिले आहे आणि तो 115 रुपयांच्या पातळीवरही पोहोचू शकतो. Adani Wilmar चे शेअर साधारण लिस्टिंगनंतर मजबूत स्थितीत, गुंतवणूकदारांना आता काय करावं? शेअर्स तीन अंकांपर्यंत पोहोचू शकतो लाइव्ह मिंटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, आयआयएफएल सिक्युरिटीजचे (IIFL Securities) उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणतात की, हा टेक्सटाईल स्टॉक सध्या तेजीत आहे. त्याने नुकताच 90 रुपयांचा रजिस्टन्स पार केला आहे. कंपनीने अलीकडेच 300 कोटी टॉपलाइन ग्रोथ जाहीर केल्यामुळे शेअर आणखी वाढेल. याशिवाय कंपनीने विस्तारासाठी 218 कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा केली आहे. हा शेअर लवकरच तीन अंकी पोहोचू शकतो, असे अनुज गुप्ता यांचे म्हणणे आहे. चॉईस ब्रोकिंगकडून खरेदीचा सल्ला चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगाडिया देखील म्हणतात की गुंतवणूकदारांनी हा मल्टीबॅगर स्टॉक खरेदी करावा. चार्ट पॅटर्ननुसार हा शेअर सकारात्मक दिसतो. हा शेअर सध्याच्या किमतीवर शॉर्ट टर्मसाठी खरेदी करता येईल. बगाडिया यांनी त्याची टार्गेट प्राईज 110 ते 115 पर्यंत दिली आहे. यावर 88 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा, असे त्यांचे म्हणणे आहे. PF Account वर 1 एप्रिलपासून कर भरावा लागणार, तुमच्यावर काय परिणाम होईल? वाचा सविस्तर Lagnam Spintex ही भारतातील उच्च दर्जाची कापूस धाग्याची आघाडीची उत्पादक आहे. कंपनीने आपले काम वाढवण्यासाठी आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मोठी रक्कम खर्च करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की नवीन यंत्रसामग्रीमुळे, पुढील दोन आर्थिक वर्षांत त्यांची उत्पादन क्षमता दुप्पट होईल. कंपनीचे म्हणणे आहे की सध्या ती दररोज 35 टन उत्पादन करते. जे वाढून 70 टन होईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या