Home /News /money /

LIC IPO मध्ये गुंतवायचे आहेत पैसे? त्यापूर्वी वाचा ही महत्त्वाची माहिती

LIC IPO मध्ये गुंतवायचे आहेत पैसे? त्यापूर्वी वाचा ही महत्त्वाची माहिती

शेअर मार्केटमधील रिटेल इन्व्हेस्टर्स एलआयसीच्या (LIC IPO Latest Update) आयपीओची आतुरतेने वाट पाहत आहेत. एलआयसीचा आयपीओ मार्चमध्ये येईल असा अंदाज आहे. तुम्ही देखील या आयपीओमध्ये गुंतवणूक करणार आहात तर त्यापूर्वी याविषयी सर्वकाही माहित करून घ्या

पुढे वाचा ...
मुंबई, 08 फेब्रुवारी: शेअर मार्केटमधील (Share Market Latest News) रिटेल इन्व्हेस्टर्स एलआयसीच्या (LIC IPO Latest Update) आयपीओची आतुरतेने वाट पाहत आहेत. एलआयसीचा आयपीओ मार्चमध्ये येईल असा अंदाज आहे. या आठवड्यात सरकार यासंदर्भात SEBI कडे ड्राफ्ट पेपर्स पाठवणार आहे. या IPO मध्ये LIC पॉलिसी धारकांसाठी गुंतवणुकीची चांगली संधी देखील आहे. या IPO मधील 10 टक्के रक्कम त्यांच्यासाठी राखीव असेल. त्यामुळे त्यांना शेअर्स मिळण्याची शक्यता वाढेल. याशिवाय प्रति शेअर किमतीतही त्याला काही सूट मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या एलआयसीची मालकी सरकारकडे आहे. ही देशातील सर्वांत मोठी जीवन विमा कंपनी आहे. सरकारला या कंपनीतील हिस्सेदारी विकून सुमारे 90,000 कोटी रुपये उभे करायचे आहेत. यामुळे सरकारला चालू आर्थिक वर्षातील निर्गुंतवणुकीचे लक्ष्य गाठण्यास मदत होईल. आयपीओनंतरही एलआयसीवर सरकारची मालकी कायम राहणार आहे. कायद्यानुसार एलआयसीमध्ये सरकारची हिस्सेदारी 51 टक्क्यांपेक्षा कमी असू शकत नाही. याशिवाय, सरकार 5 वर्षांमध्ये LIC मधील 25 टक्क्यांहून अधिक स्टेक विकू शकत नाही. हे वाचा-सरकार New Labour Codeमध्ये बदल करण्याच्या तयारीत,पाहा तुमच्यावर काय परिणाम होणार देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC चा मार्केट शेअर 64.1 टक्के आहे. क्रिसिलच्या अहवालानुसार ही देशातील सर्वांत मोठी जीवन विमा कंपनी आहे. त्याचा इक्विटीवरील रिटर्न सर्वाधिक 82 टक्के आहेत. जीवन विमा प्रीमियम्सच्या बाबतीत ही जगातील तिसरी सर्वांत मोठी विमा कंपनी आहे. मार्केट शेअरबद्दल (Market shares) बोलायचं झाल्यास जगातील इतर कोणतीही विमा कंपनी नाही ज्याचा हिस्सा 64 टक्के आहे. रिटर्नच्या बाबतीत जगात पहिला क्रमांक CRISIL अहवालात असं नमूद केलं आहे की LIC च्या इक्विटीवरील 82 टक्के रिटर्न हा जगातील इतर मोठ्या विमा कंपन्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे. चिनी विमा कंपनी पिंगचा इक्विटीवर रिटर्न 19.5 टक्के आहे, तर अविवाचा 14.8 टक्के आहे. चायना लाइफ इन्शुरन्सचा (Life insurance) इक्विटीवर 11.9 टक्के रिटर्न आहे. उत्तम नफा आणि वाढ 2021-22 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एलआयसीचा (LIC) टॅक्सनंतरचा नफा 1,437 कोटी रुपये होता. वर्षभरापूर्वी याच कालावधीत त्यांचा नफा 6.14 कोटी रुपये होता. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, एलआयसीच्या न्यू बिझनेस प्रीमियमची ग्रोथ 554.1 टक्के होती. 522 अब्ज डॉलर्सच्या एकूण मालमत्तेसह ही जगातील सहावी सर्वांत मोठी विमा कंपनी आहे. हे वाचा-Share Market Update : Sensex मध्ये 187 तर Nifty मध्ये 53 अंकांची वाढ देशातील सर्वांत मोठी लिस्टेड कंपनी लंडनस्थित ब्रँड फायनान्सच्या मते, एलआयसीचे बाजारमूल्य यावर्षी 43 लाख कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. पुढील पाच वर्षांत म्हणजे 2027 पर्यंत ते 58.9 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. अशाप्रकारे, ती पुढील अनेक वर्षे देशातील सर्वांत मोठी कंपनी राहू शकते. सध्या देशातील सर्वांत मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्यांकन 16 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. TCS याबाबत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांचं मूल्यांकन 14 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
First published:

Tags: Investment, LIC, Savings and investments

पुढील बातम्या