मुंबई, 08 ऑक्टोबर: एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसंदर्भात (Disinvestment in Air India) आज महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. देशातील सरकारी विमान कंपनी एअर इंडिया (TATA Sons won Air India Final Bid) आता टाटा समूहाची झाली आहे. टाटा सन्सने सरकारी विमान कंपनी एअर इंडिया विकत घेण्याची बोली जिंकली आहे. टाटा सन्सच्या Talace Pvt Ltd ने 18,000 कोटी रुपयांची विजयी बोली लावली. हा व्यवहार डिसेंबर 2021 च्या अखेरीस पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान आता टाटाकडे एअर इंडियाची मालकी आल्यानंतर टाटा समूहापुढील आव्हानं देखील वाढली आहेत. टाटा समूहापुढे आता असणाऱ्या आव्हानांची यादी मोठी आहे. यामध्ये कंपनीतील कर्मचारी, त्यांची ज्येष्ठता, विविध योजना, कंपनीकडून देण्यात येणाऱ्या सुविधा, आयटी इंजिनीअरिंग, फ्लीट इंटिग्रेशन इ. या समस्या तर आहेतच. पण त्याचबरोबर एक मोठी समस्या आधीच टाटा समूहासमोर आहे- ती म्हणजे चारही एअरलाइन्सचे शेड्यूल सांभाळणे. चार विमानसेवा हाताळण्याचे आव्हान Air India ची बोली जिंकल्यानंतर टाटा समूहाला एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा आणि एअर एशिया इंडिया हे चार ब्रँड हाताळावे लागणार आहेत. एअर इंडिया आणि विस्तारा फूल सर्व्हिस कॅरिअर आहेत. तर एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर एशिया इंडिया कमी किमतीच्या वाहक आहेत. टाटा समूहाने 2013 मध्ये AirAsia Bhd च्या भागीदारीत AirAsia India ची स्थापना केली होती. त्याच वर्षी त्यांनी सिंगापूर Airlines च्या भागीदारीत विस्ताराची स्थापना केली होती. त्यामुळे या चाहरी ब्रँडचे शेड्यूलिंग हे टाटा सन्ससमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे. मोठी बातमी! 68 वर्षानंतर Air India ची ‘घरवापसी’, आता Ratan Tata असणार नवे मालक कोरोना व्हायरस पँडेमिकनंतर हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर विमान कंपन्यांनी नवीन गंतव्याची ठिकाणं, सेक्टर्स लाँच केली, शिवाय आधीपासून असणाऱ्या ठिकाणांवर नॉन-स्टॉप फ्लाइट सेवाही सुरू केली आहेत. OAG च्या एका विश्लेषणानुसार, टाटा समूहाकडून- एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा आणि एअरएशिया इंडिया या चार एअरलाइन्सद्वारे 150 देशांतर्गत (150 Domestic Routes) मार्गांवर विमानसेवा कार्यरत आहे. एअर इंडियाकडून सर्वाधिक 121 फ्लाइट्स संचालित केल्या जातात. AirAsia India कडून 46, विस्ताराकडून 42 तर सर्वात कमी Air India Express कडून 13 फ्लाइट्सचे संचालन होते. गेल्या दोन महिन्यांत एअर इंडिया आणि विस्तारा या दोन पूर्ण-सेवा वाहक मार्केटमध्ये नवीन उच्चांकावर पोहोचले आहेत. कमी किंमत ऑफर करण्यासह या विमानसेवांनी त्यांची क्षमता देखील या काळात कमी केली आहे. तरी देखील या विमानसेवांनी मार्केटमध्ये नवीन उच्चांक गाठला आहे. याचा अर्थ असा होतो की मर्यादित विमानभाडे असल्याने लोकं अधिकाधिक प्रमाणात फूल-सर्व्हिस कॅरिअरकडे वळले आहेत. दरम्यान ज्या सहा मार्गांवर (बेंगळुरू-गुवाहाटी, बेंगळुरू-चंदीगड, मुंबई-चंदीगड, कोलकाता-पुणे, दिल्ली-चंदीगड आणि बागडोगरा-दिब्रूगड) विस्ताराची विमानं धावतात तिथे एअर इंडियाची देखील उपस्थिती आहे. परिणामी याचे एकत्रितपणे शेड्यूलिंग करणे महत्त्वाचे आव्हान असेल. शेतकऱ्यांसाठी Good News! केंद्र सरकारची नवी योजना, मिळेल 15 लाखांपर्यंतचं कर्ज स्पष्टपणे, आव्हाने अनेक आहेत. पण जर टाटा समूहाला जर एका गोष्टीपासून सुरुवात करायची असेल तर ते वेळापत्रकाचे एकत्रीकरण करणे होय. तसंच एअरलाइन्सची संयुक्त क्षमता इंडिगोवर कशी वरचढ ठरू शकते किंवा किमान त्या दिशेने कशी जाऊ शकते यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.