मराठी बातम्या /बातम्या /मनी /

मोठी बातमी! 68 वर्षानंतर Air India ची 'घरवापसी', आता Ratan Tata असणार नवे मालक; सरकारडून शिक्कामोर्तब

मोठी बातमी! 68 वर्षानंतर Air India ची 'घरवापसी', आता Ratan Tata असणार नवे मालक; सरकारडून शिक्कामोर्तब

Air India Disinvestment: एअर इंडियामधील निर्गुंतवणुकीबाबत आणि कंपनीच्या खासगीकरणाबाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

Air India Disinvestment: एअर इंडियामधील निर्गुंतवणुकीबाबत आणि कंपनीच्या खासगीकरणाबाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

Air India Disinvestment: एअर इंडियामधील निर्गुंतवणुकीबाबत आणि कंपनीच्या खासगीकरणाबाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर: सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियामधील निर्गुंतवणुकीबाबत (Air India Disinvestment) आणि कंपनीच्या खासगीकरणाबाबत (Air India Privatization) अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. अखेरीस या विमान कंपनीची विक्री करण्यात सरकारला यश आलं आहे. Air India अनेक वर्षानंतर नवीन मालक मिळाला आहे. सरकारने एअर इंडियासाठी लावण्यात आलेली बोली कोण जिंकलं आहे याची घोषणा केली आहे. आता  टाटा ग्रुप एअर इंडियाची धुरा सांभाळणार आहे.

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग- डीआयपीएएम (Department of Investment and Public Asset Management- DIPAM) ने पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. डीआयपीएएम सचिव आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव यांनी एअर इंडियाच्या बोलीसंदर्भात पत्रकार परिषद घेतली.

DIPAM चे सचिव तुहिन कांत पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा सन्सने राष्ट्रीय विमानवाहक एअर इंडिया घेण्याची बोली जिंकली. टाटा सन्सची Talace Pvt Ltd ने 18,000 कोटी रुपयांची विजयी बोली लावली आहे. हा व्यवहार डिसेंबर 2021 च्या अखेरीस पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

एअर इंडिया स्पेसिफिक अल्टरनेटिव्ह मेकॅनिझम (एआयएसएएम) पॅनलने एअर इंडियाच्या आर्थिक बोलीवर निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक महत्त्वाचे मंत्री आणि अधिकारी या पॅनलमध्ये समाविष्ट आहेत. डीआयपीएएमचे सचिव तुहिन कांत पांडे म्हणाले की, अनेक वेळा बोलीसाठी अर्ज मागवण्यात आले होते, पण शेवटी सप्टेंबरमध्ये दोन बिडर्सची नावे निश्चित करण्यात आली. एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जाईल. या घटनांचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही.

शेतकऱ्यांसाठी Good News! केंद्र सरकारची नवी योजना, मिळेल 15 लाखांपर्यंतचं कर्ज

टाटा समूह (Tata Group won Air India Final Bid) आणि स्पाइसजेटचे अजय सिंह (Spicejet Ajay Singh) यांनी एअर इंडियासाठी बोली लावली होती. अलीकडेच ब्लूमबर्गने अहवालात म्हटले होते की पॅनलने एअर इंडियासाठी टाटा ग्रुपची निवड केली आहे. डिसेंबरपर्यंत टाटा समूहाला एअर इंडियाचा मालकी हक्क मिळू शकतो. जेआरडी टाटा यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली. आता 68 वर्षांनंतर टाटा समूहाने सर्वाधिक बोली लावून एअर इंडिया परत खरेदी केली आहे.

Air India पुन्हा एकदा टाटा समुहाकडे परतल्यानंतर टाटा समुहाचे चेअरमन रतन टाटा यांनी ट्वीट करत या निर्णायाचे स्वागत केले आहे. त्यांनी Welcome back, Air India असं ट्वीट केलं आहे.

सरकार का विकतेय एअर इंडिया?

2007 साली सरकारने एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलिनीकरण केले होते. या इंधनाचे वाढते दर, खासगी विमान कंपन्यांकडून असणारी तगडी स्पर्धा हे या मर्जरमागील कारण असल्याचे सरकारने म्हटले होते. दरम्यान 2000 ते 2006 या काळात एअर इंडियाला मिळणारा नफा कमीच झाला होता. मात्र मर्जरनंतर आणखी परिस्थिती बिकट झाली. कंपनीच्या डोक्यावरील कर्ज वाढत गेले. 31 मार्च 2019 पर्यंत कंपनीच्या डोक्यावर  60 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज होतं.

दीर्घकाळापासून सुरू आहे प्रक्रिया

गेल्या काही वर्षांपासून एअर इंडियातील निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू आहे. अखेरीस 2021 मध्ये त्याला पूर्णविराम मिळत आहे. यापूर्वी 2018 मध्ये देखील सरकारने एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची तयारी केली होती. त्यावेळी सरकारने एअर इंडियामधील 76 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी कंपन्यांकडून एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) मागवण्यात आले. त्यावेळी EOIच्या सबमिशनची शेवटची तारीख 31 मार्च 2018 होती. परंतु निर्धारित तारखेपर्यंत एकाही कंपनीने सरकारकडे ईओआय सादर केले नव्हते.

SBI Alert! उद्यापासून 3 दिवस या वेळेत करता येणार नाहीत महत्त्वाचे बँक व्यवहार

यानंतर, प्रक्रिया जानेवारी 2020 मध्ये नव्याने सुरू करण्यात आली. यावेळी 76 टक्क्यांऐवजी 100 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय सरकारने घेतला. कंपन्यांना 17 मार्च 2020 पर्यंत एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट सबमिट करण्यास सांगितले गेले होते, परंतु कोरोनामुळे विमान उद्योगाला मोठा फटका बसला, यामुळे तारीख अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती. शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 ठेवण्यात आली होती.

1932 मध्ये टाटांनी सुरू केली होती एअर इंडिया

एअर इंडियाची सुरुवात टाटा समूहाने 1932 मध्ये केली होती. टाटा समूहाचे जेआरडी टाटा (JRD TATA Air India) हे त्याचे संस्थापक होते. त्यावेळी या कंपनीचे नावा टाटा एअरलाइन्स होते. जेआरडी स्वतः पायलट होते. तेव्हा या कंपनीचे ना टाटा एअर सर्विस असे होते. 1938 पर्यंत कंपनीने देशांतर्गत उड्डाणे सुरू केली होती.

1946 मध्ये या विमान कंपनीचे नाव एअर इंडिया करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर ती एक सरकारी कंपनी बनली. स्वातंत्र्यानंतर 1953 साली सरकारने या कंपनीतील 49% हिस्सा विकत घेतला. 2000 सालापर्यंत ही कंपनी फायद्यामध्ये होती.

First published:

Tags: Air india, Ratan tata, Tata group