मराठी बातम्या /बातम्या /मनी /

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची FPO योजना, मिळेल 15 लाखांपर्यंतचं कर्ज; असा करा अर्ज

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची FPO योजना, मिळेल 15 लाखांपर्यंतचं कर्ज; असा करा अर्ज

 केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार (PM Narendra Modi) सातत्याने शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याला कर्ज, बी-बियाणं, खतं कमी किंमतीत उपलब्ध करून देऊन सरकार मदतही करत आहे.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार (PM Narendra Modi) सातत्याने शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याला कर्ज, बी-बियाणं, खतं कमी किंमतीत उपलब्ध करून देऊन सरकार मदतही करत आहे.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार (PM Narendra Modi) सातत्याने शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याला कर्ज, बी-बियाणं, खतं कमी किंमतीत उपलब्ध करून देऊन सरकार मदतही करत आहे.

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर:  शेतकरी हा देशाचा पालनकर्ता आहे अशी वाक्यं आपण अनेकदा ऐकली असतील तसा तो आहेच पण समाजातला सर्वांत त्रस्त घटक कुणी असेल तर तोही शेतकरीच आहे. या शेतकऱ्याला त्याच्या उत्पन्नाचा चांगला आर्थिक फायदा मिळावा यासाठी अनेक संस्था काम करतात. मुळात सरकार विविध योजनाही राबवतात.  पण प्रत्यक्षात छोट्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती काही सुधारलेली दिसत नाही. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार (PM Narendra Modi) सातत्याने शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याला कर्ज, बी-बियाणं, खतं कमी किंमतीत उपलब्ध करून देऊन सरकार मदतही करत आहे. पण आता आणखी एक आनंदाची बातमी सरकारने दिली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एखादा गट स्थापन (Group of farmers) केला आणि शेतीआधारित उत्पादन तयार करण्याची तयारी दाखवली तर केंद्र सरकार(Central Government) या गटाला 15 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देणार आहे. जाणून घेऊया या कर्ज योजनेबाबत अधिक माहिती.

कसं काय मिळेल 15 लाखांचं कर्ज?

सरकारने पंतप्रधान शेतकरी एफपीओ योजना (PM Kisan FPO Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती आधारित व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. जर 11 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एखादा गट तयार केला किंवा कंपनी स्थापन (Farmers Producers Organization) केली तर त्या कंपनीला कृषी आधारित उत्पादन करण्याच्या व्यवसायासाठी केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी एफपीओ योजनेअंतर्गत 15 लाख रुपयांचं कर्ज उपलब्ध करून देणार आहे. या कर्जातून शेतकरी शेतीसंबंधी उपकरणं, खतं, बी-बियाणं तसंच नव्या व्यवसायाला लागणारी उपकरणंही (Equipment for Business) खरेदी करू शकतील.

हेही वाचा- SBI Alert! कोट्यवधी ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना, उद्यापासून 3 दिवस या वेळेत करता येणार नाहीत महत्त्वाचे बँक व्यवहार

असा करा अर्ज

पंतप्रधान शेतकरी एफपीओ योजनेतून कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना थोडीशी वाट पहावी लागणार आहे. सरकारने अजून या योजनेची नोंदणी प्रक्रिया (Registration Process) सुरूच केलेली नाही. माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार सरकार लवकरच पंतप्रधान शेतकरी एफपीओ योजनेसंबंधी एक परिपत्रक (Notification) प्रसिद्ध करेल. त्यानंतर या योजनेतून कर्ज घेण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होईल त्यावेळी शेतकरी अर्ज करू शकतील.

हेही वाचा-  RBIने बदलला बँक व्यवहारासंबंधित महत्त्वाचा नियम, 2 लाखांऐवजी पाठवता येणार 5 लाख

केंद्र सरकारने सहकार हे मंत्रालय सुरू केलं आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या मंत्रालयाचे मंत्री आहेत. साखर उद्योगात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व इतर राज्यांत सहकार क्षेत्राने लक्षणीय कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं राहणीमानही उंचावलं आहे. कदाचित त्याचाच एक भाग म्हणून सहकारी तत्त्वावर शेतीसंलग्न उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार असावा असं सध्या उपलब्ध माहितीतून दिसून येतंय. अर्थात, ही योजना सुरू झाल्यावरच त्याबाबत बोलणं योग्य ठरेल.

First published:

Tags: Modi government