मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Supriya Lifescience IPO: तुम्हाला मिळाले का या कंपनीचे शेअर्स? जाणून घ्या GMP

Supriya Lifescience IPO: तुम्हाला मिळाले का या कंपनीचे शेअर्स? जाणून घ्या GMP

सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेडच्या आयपीओची अलॉटमेंटची (Supriya Lifescience IPO Allotmemt) घोषणा करण्यात आली आहे. म्हणजे आता सुप्रिया लाइफसायन्सचे शेअर्स मिळाले आहेत की नाही हे तुम्ही तपासू शकता.

सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेडच्या आयपीओची अलॉटमेंटची (Supriya Lifescience IPO Allotmemt) घोषणा करण्यात आली आहे. म्हणजे आता सुप्रिया लाइफसायन्सचे शेअर्स मिळाले आहेत की नाही हे तुम्ही तपासू शकता.

सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेडच्या आयपीओची अलॉटमेंटची (Supriya Lifescience IPO Allotmemt) घोषणा करण्यात आली आहे. म्हणजे आता सुप्रिया लाइफसायन्सचे शेअर्स मिळाले आहेत की नाही हे तुम्ही तपासू शकता.

  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 24 डिसेंबर: सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेडच्या आयपीओची अलॉटमेंटची (Supriya Lifescience IPO Allotmemt) घोषणा करण्यात आली आहे. म्हणजे आता सुप्रिया लाइफसायन्सचे शेअर्स मिळाले आहेत की नाही हे तुम्ही तपासू शकता. या आयपीओचे लिस्टिंग 28 डिसेंबर 2021 रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले की, अलॉटमेंटची घोषणा झाल्यानंतर ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हा वाढीचा ट्रेंड याचे संकेत देत आहे की, जेव्हा जेव्हा हा स्टॉक लिस्ट होईल तेव्हा गुंतवणूकदारांना भरपूर नफा मिळेल. बाजार तज्ज्ञांच्या मते, सुप्रिया लाइफसायन्सच्या इश्यूचा ग्रे मार्केट प्रीमियम आज 112 रुपये आहे. कंपनीचे अनलिस्टेड शेअर्स ग्रे मार्केटमध्ये इश्यू किमतीच्या 47% प्रीमियमने ट्रेडिंग करत आहेत. हे वाचा-कामाची बातमी! गेल्या 3 वर्षांपासून हे 10 शेअर्स देतातेय 50%हून अधिक रिटर्न या इश्यूच्या शेवटच्या दिवशी हा आयपीओ 71.51 पटींनी सब्सक्राइब झाला आहे. कंपनीच्या शेअर्सची इश्यू प्राइस 265-274 रुपये आहे. ज्यांना हा शेअर मिळेल, त्यांच्या डिमॅट खात्यात 27 डिसेंबरपर्यंत शेअर्स दिसायला सुरुवात होईल. जर तुम्हाला शेअर्स मिळाले नाहीत तर तुमच्या खात्यातील पैसे 27 डिसेंबरपर्यंत परत केले जातील. तुम्ही देखील या आयपीओमध्ये गुंतवणूक केली असेल तर रजिस्ट्रारची वेबसाइट लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड किंवा बीएसईच्या वेबसाइट bseindia.com द्वारे शेअर्सची अलॉटमेंट तपासू शकता. BSE WEBSITE bseindia.com च्या माध्यमातून अशाप्रकारे तपासा अलॉटमेंट -सर्वात आधी  https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx या लिंकला भेट द्या -यानंतर इक्विटीवर सिलेक्ट करा आणि ड्रॉपडाउन करा -त्यानंतर Issue Name (Supriya Lifescience IPO)  निवडा हे वाचा-टॅक्स वाचवण्यासाठी गृहकर्ज एक चांगला पर्याय! वर्षाला होऊ शकते दीड लाखांची बचत -याठिकाणी अ‍ॅप्लिकेशन क्रमांक आणि PAN प्रविष्ट करा -यानंतर तुम्हाला I am not a robot वर क्लिक करुन व्हेरिफाय करावे लागेल -यानंतर सर्च बटनवर क्लिक करा -सर्व तपशील भरल्यानंतर अ‍ॅप्लिकेशन स्टेटस मिळेल रजिस्ट्रारच्या वेबसाइटवरुन तपासा अलॉटमेंट -सर्वात आधी तुम्हाला या https://linkintime.co.in/MIPO/Ipoallotment.html लिंकवर भेट द्यावी लागेल -यानंतर ड्रॉपडाउन करून आयपीओचं नाव सिलेक्ट करा -यानंतर DP ID किंवा Client ID किंवा PAN प्रविष्ट करा -तुमच्याकडे अ‍ॅप्लिकेशन क्रमांक असेल तर तो टाइप करा हे वाचा-कामाची बातमी! गेल्या 3 वर्षांपासून हे 10 शेअर्स देतातेय 50%हून अधिक रिटर्न -यानंतर Captcha सबमिट करा -याठिकाणी तुम्हाला अलॉटमेंटची संपूर्ण माहिती मिळेल -तुम्हाला शेअर मिळाला नसेल तर दोन दिवसात रिफंड मिळून जाईल
First published:

Tags: Money, Share market

पुढील बातम्या