मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कामाची बातमी! गेल्या 3 वर्षांपासून हे 10 शेअर्स देतातेय 50%हून अधिक रिटर्न; ही आहे यादी!

कामाची बातमी! गेल्या 3 वर्षांपासून हे 10 शेअर्स देतातेय 50%हून अधिक रिटर्न; ही आहे यादी!

नवीन वर्षात शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर ही यादी नक्की पाहा, होईल फायदा!

नवीन वर्षात शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर ही यादी नक्की पाहा, होईल फायदा!

नवीन वर्षात शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर ही यादी नक्की पाहा, होईल फायदा!

नवी दिल्ली, 24 डिसेंबर : शेअर बाजारात गुंतवणूक करताना कोणीही असेच शेअर्स शोधत असतो, जे कायम चांगला परतावा (Stocks with high returns) देतील. पण कायम किंमत वाढत राहणारे शेअर्स हे तसे दुर्मिळच असतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा 10 शेअर्सबद्दल (Top 10 Shares) सांगणार आहोत, जे गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांहून अधिक परतावा (Stocks giving more than 50% returns) देत आहेत.

मनीकंट्रोलने या 10 स्टॉक्सची यादी (Money Control top 10 stocks) प्रसिद्ध केली आहे. यात केवळ अशा शेअर्सचा सहभाग आहे, ज्यांची मार्केट कॅप पाच हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. विशेष म्हणजे, मनीकंट्रोलने केलेल्या SWOT विश्लेषणानुसार; या शेअर्सच्या किंमती येत्या काही दिवसांमध्ये याच गतीने आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हे आहेत गुंतवणुकीसाठी योग्य असे टॉप 10 स्टॉक्स :

अदानी टोटल गॅस : 2019 साली या शेअरमध्ये (Adani Total Gas) 61 टक्के वाढ दिसून आली होती. तर 2020 मध्ये यात 130 टक्के वाढ दिसून आली. यावर्षी तर अदानी गॅसच्या शेअरमध्ये तब्बल 355 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

एसआरएफ : 2019 सालापासून पाहायचे झाल्यास, एसआरएफमध्ये (SRF) प्रत्येक वर्षी अनुक्रमे 72, 62 आणि 95 टक्के वाढ दिसून आली आहे. 2020 मध्ये याची वाढ 2019 च्या तुलनेत कमी असली, तरी 2021 मध्ये कंपनीने चांगलेच कमबॅक केले आहे.

गुजरात गॅस : कोरोनाचा गुजरात गॅसला (Gujarat Gas) तसा मोठा फटका बसला होता. 2019 मध्ये 77 टक्के वाढ दाखवल्यानंतर 2020 मध्ये या शेअर्समध्ये 59 आणि 2021 मध्ये 66 टक्के वाढ दिसून आली आहे. अर्थात, कंपनी आता हळूहळू मोठे रिटर्न्स देत आहे.

डिक्सन टेक्नॉलॉजीस इंडिया : 2019 सालामध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये 85 टक्के वाढ दिसून आली होती. त्यानंतर पुढील वर्षी थेट 253 टक्के वाढ दिसून आली. 2021 या कॅलेंडर इयरमध्ये देखील कंपनीची (Dixon Technologies India) ग्रोथ 100 टक्क्यांहून अधिक राहिली आहे.

दीपक नायट्रेट : 2019 या कॅलेंडर इयरमध्ये अवघ्या 69 टक्क्यांची ग्रोथ दाखवणाऱ्या या शेअरमध्ये (Deepak Nitrite) 2020 मध्ये तब्बल 153 टक्क्यांची वाढ दिसून आली. त्यानंतर 2021 मध्ये देखील या शेअरमध्ये 142 टक्क्यांची ग्रोथ दिसून आली आहे.

जे.के.सिमेंट : 2019 आणि 2020 या दोन्ही वर्षांमध्ये जे.के. सिमेंटच्या (JK Cement) शेअर्समध्ये 64 टक्क्यांची वाढ दिसली होती. त्यानंतर 2021 या कॅलेंडर इयरमध्ये यात 79 टक्क्यांची वाढ झाली आहे.

हे ही वाचा-शेअर बाजारात जोरदार रॅली; सेन्सेक्स 611 अंकांनी तर निफ्टीत 184 अंकांची वाढ

एपीएल अपोलो ट्यूब्ज : 2019 साली अपोलो ट्यूब्जच्या (APL Apollo Tubes) शेअर्समध्ये 62 टक्के वाढ दिसून आली होती. त्यानंतर 2020 मध्ये 136 टक्के, आणि 2021 मध्ये 138 टक्क्यांची ग्रोथ झाली आहे.

टॅन्ला प्लॅटफॉर्म्स : कंपनीने 2019 मध्ये 131 टक्के ग्रोथ दर्शवली होती. त्यानंतर 2020 साली तब्बल 867 टक्के ग्रोथ दाखवून या कंपनीने (Tanla Platforms) सर्वांनाच धक्का दिला होता. 2021 मध्ये कंपनीची ग्रोथ 168 टक्के राहिली आहे.

एचएलई ग्लास्कोट : 2019 पासून या कंपनीचा आलेख चढता राहिला आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये कंपनीच्या (HLE Glascoat) शेअर्समध्ये अनुक्रमे 142, 224 आणि 277 टक्के वाढ दिसून आली आहे.

अपोलो ट्रायकोट ट्यूब्ज : अपोलोच्या ट्रायकोट ट्यूब्ज कंपनीच्या (Apollo Tricoat Tubes) शेअर्समध्येही चांगली वाढ दिसून येते आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये अनुक्रमे 123, 188 आणि 112 टक्के ग्रोथ दिसली आहे. एकूणच, चांगल्या परताव्यासाठी पुढे ग्रोथ होण्याची शक्यता असणाऱ्या कंपन्या तुम्ही शोधत असाल, तर ही यादी नक्कीच तुमच्या फायद्याची आहे.

First published:

Tags: Share market