मराठी बातम्या /बातम्या /मनी /

टॅक्स वाचवण्यासाठी गृहकर्ज एक चांगला पर्याय! वर्षाला होऊ शकते दीड लाखांची बचत

टॅक्स वाचवण्यासाठी गृहकर्ज एक चांगला पर्याय! वर्षाला होऊ शकते दीड लाखांची बचत

आरबीआयने काही दिवसांपूर्वीच आपल्या रेपो रेटमध्ये बदल केल्याचं जाहीर केलं होते. त्यानंतर आता बँकांनी

आरबीआयने काही दिवसांपूर्वीच आपल्या रेपो रेटमध्ये बदल केल्याचं जाहीर केलं होते. त्यानंतर आता बँकांनी

गृहकर्ज घेऊनही तुम्ही टॅक्समध्ये बचत (Home loan to save tax) करू शकता. विश्वास बसत नाही ना बसत? मात्र, हे खरं आहे. जाणून घेऊया कशा प्रकारे होम लोन तुम्हाला टॅक्स सेव्हिंगमध्ये मदत करते.

मुंबई, 24 डिसेंबर : आपण बऱ्याच वेळा करातून बरीच रक्कम (Save Tax) कशी वाचवता येईल याचा विचार करत असतो. यासाठी ईपीएफ आणि पीपीएफमध्ये गुंतवणूक, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम, युलिप गुंतवणूक, शाळांच्या फीवरील कर सवलत, आयुर्विमा प्रीमियममुळे मिळणारी कर सवलत अशा बऱ्याच मार्गांचा (Tax saving tips) वापर आपण करतो. मात्र, जर आम्ही सांगितलं, की गृहकर्ज घेऊनही तुम्ही टॅक्समध्ये बचत (Home loan to save tax) करू शकता, तर? विश्वास नाही ना बसत? मात्र, हे खरं आहे. जाणून घेऊया कशा प्रकारे होम लोन तुम्हाला टॅक्स सेव्हिंगमध्ये मदत करते.

इन्कम टॅक्स अधिनियम, 1961च्या कलम 80C अंतर्गत दर वर्षी तुम्ही दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या मूळ रकमेच्या परतफेडीवर कर वाचवू शकता. अर्थात, यासाठी तुमचा वार्षिक व्याज खर्च (Annual interest Outgo) किती आहे हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. जर तुम्ही 30 टक्के प्राप्तीकर ब्रॅकेटमध्ये येता आणि तुमचा वार्षिक व्याज खर्च दोन लाख रुपये किंवा त्याहून जास्त आहे, तर तुम्ही सेक्शन 24 B नुसार एका आर्थिक वर्षात करामध्ये सुमारे 60 हजार रुपये वाचवू शकता.

जास्त पैसे वाचवण्यासाठी दीर्घकालीन कर्ज घ्या

जर केवळ टॅक्स बचत हेच तुमचं उद्दिष्ट असेल, तर त्यासाठी तुम्हाला दीर्घकालीन परतफेड करणारे कर्ज (Long term loan) घेण्याची गरज आहे. हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. जर तुम्ही 30 टक्के टॅक्स ब्रॅकेटमध्ये येता आणि 7 टक्के वार्षिक व्याजदरावर 15 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे; तर 15 वर्षांमध्ये तुम्ही एकूण 5.54 लाख रुपयांची टॅक्स बचत करू शकता. तसंच, तुम्ही जर याच व्याजदरात 30 वर्षांच्या कालावधीसाठी 50 लाख रुपये कर्ज घेतले आहे, तर तुम्ही करामध्ये एकूण 13.93 लाख रुपयांची बचत करू शकता.

नवीन वर्षात सुरू करा व्यवसाय; कमी गुंतवणूक आणि जास्त नफा; सरकारही देतं अनुदान

बचतीसाठी व्याज आणि मुदतीचा ताळमेळ आवश्यक

अर्थात, याचा अर्थ असाही नाही की जेवढी जास्त मुदत तेवढी जास्त बचत. कारण जेवढी मुदत जास्त असेल, तेवढे व्याजही तुम्ही अधिक देणार आहात. 30 लाख रुपयांच्या कर्जावर तुम्ही एकूण 18.53 लाख रुपये व्याज देणार आहात. तर 50 लाख रुपयांच्या कर्जावर तुम्ही तब्बल 52 लाख रुपये व्याज द्याल. म्हणजेच जेवढे पैसे तुम्ही करामध्ये वाचवाल त्याच्या कितीतरी पट पैसे तुम्ही व्याजामध्ये गमवाल.

पण दुसरीकडे, कमी कालावधी (Short term loan) आणि जास्त व्याजदर ठेऊनही तुम्हाला फायदा होणार नाही. कारण, मूळ रक्कम कमी झाल्यामुळे दर महिन्याला व्याजाची रक्कमही कमी होत जाते. त्यामुळे सुरुवातीची काही वर्षे होऊन गेल्यानंतर वार्षिक व्याज पेमेंट कमी होत जाते. अर्थात, तुम्ही कलम 24B अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर बचत करू शकता. मात्र, जर तुम्ही 2 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम वार्षिक व्याज म्हणून देत असाल, तर त्यात तुम्हाला करातून सूट मिळत नाही. म्हणजेच, जास्त व्याजदर असणारे दीर्घकालीन गृहकर्ज हे फायद्याचे नाही, तर तोट्याचे ठरू शकते. यासाठीच करामध्ये बचत हवी असेल, तर व्याजदर आणि परतफेडीचा कालावधी याचा योग्य ताळमेळ राखणे गरजेचे आहे.

Gold-Silver Price Today: चांदी झाली स्वस्त; सोन्याची काय स्थिती आहे?

जर तुम्ही अफोर्डेबल कॅटेगरीमधून (Affordable category) घर खरेदी केले असेल, तर सेक्शन 80EEA अंतर्गत तुम्हाला 1.5 लाख रुपयांचे अतिरिक्त डिडक्शन मिळते. याची मुदत 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासोबतच जर पती-पत्नी दोघेही कर भरत असतील, तर जॉईंट होम लोन घेणं कधीही फायद्याचं ठरतं. अशा प्रकारे कलम 80C अंतर्गत वर्षाला प्रत्येकी दीड लाख रुपये, तसेच कलम 24B अंतर्गत व्याजावरील प्रत्येकी दोन लाख रुपये, आणि 80EEA अंतर्गत दीड लाख रुपये म्हणजे एकूण साडे आठ लाख रुपयांची बचत तुम्ही करू शकता. दोघेही कमावते असल्यामुळे कमी कालावधीत जास्त रकमेचे कर्ज घेतले जाऊ शकते. त्यावर मोठ्या प्रमाणात टॅक्स बचतही करता येते. पण यासाठी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे त्या प्रॉपर्टीची मालकी पती व पत्नी दोघांच्या नावे असायला हवी.

दरम्यान, तुम्ही एकटेच कर्ज फेडत असाल, तरीही तुम्ही जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंतची बचत करू शकता. यात सेक्शन 24B अंतर्गत दोन लाख रुपये, सेक्शन 80C अंतर्गत दीड लाख रुपये आणि सेक्शन 80EEA अंतर्गत दीड लाख रुपयांच्या बचतीचा समावेश आहे. अर्थात, त्यासाठी लागणाऱ्या सर्व अटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील.

First published:

Tags: Home Loan, Savings and investments