मो. सरफराज आलम, सहरसा : कोरोना काळात अनेक लोकांवर संकट ओढावले. लाखो लोक बेरोजगार झाले. बेरोजगारीच्या या लाटेत अनेक लोकांनी हिंमत हारली. मात्र या संकटाच्या काळातून काही लोक हे मजबूत झाले. या लोकांनी आपल्या कौशल्याला आपले बळ बनवले. ज्या लोकांनी आपल्या कौशल्याचा योग्य वापर केला आज ते केवळ चांगले कमावत नाहीत, तर इतर लोकांना रोजगारही देत आहेत.
सहरसा जिल्ह्यातील पटुवाह येथील रहिवासी असलेल्या संतोष तिवारीची कथाही अशीच आहे. तो अनेक वर्षांपासून हरियाणाच्या फरिदाबादमध्ये वर्षानुवर्षे मसाल्याच्या कारखान्यात काम करत होता. कोरोनाच्या काळात अचानक त्याची नोकरी गेली आणि तो बेरोजगार झालो. घरी आल्यावर त्याने सरकारकडून कर्ज काढून मसाला बनवण्याचे यंत्र आणले आणि आज तो स्वतःचा देव ब्रँडचा मसाला बाजारात सप्लाय करतोय.
वयाच्या 15 वर्षी सोडलं घर, घरोघरो जाऊन विकले चाकू; आज कमावते कोट्यवधी रुपये!
संतोषने सांगितले की, त्याने मुख्यमंत्री उद्यमी योजनेतून 7 लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि देव ब्रँड मसाल्याचा उद्योग सुरू केला. आज तो हळद, तिखट, धने पावडर, गरम मसाला पावडर, चिकन पावडर, मटण पावडर बनवून वेगवेगळ्या जिल्ह्यांत पुरवतात. व्यवसाय वाढवल्यानंतर त्याने 6 तरुणांना कामावरही घेतले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला, पण हळूहळू परिस्थिती बदलत गेल्याचे तो सांगतो. आता लोकांना आमचे उत्पादन आवडू लागले आहे
उधारीवर घेतलेला लॅपटॉप विकून सुरु केला स्टार्टअप, आज हा तरुण करतोय लाखोंची कमाई!
संतोषच्या म्हणण्यानुसार आता त्याचे काम वाढत आहे. त्याने सांगितले की, ते चांगल्या दर्जाचे मसाले बनवतात आणि बाजारात पुरवतात. आतापर्यंत कोणतीही तक्रार आलेली नाही. यासोबतच त्यांनी सांगितले की, लोकांना त्यांच्या मसाल्यांची शुद्धता आवडते. यासाठी आम्ही समस्तीपूरसह विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून खडा मसाला खरेदी करतो आणि नंतर त्यांची पूर्णपणे साफसफाई करून मशिनमधून मसाले तयार करून बाजारात पुरवतो. आगामी काळात हा व्यवसाय आणखी वाढवणार असल्याचे संतोषने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News