ज्या लोकांमध्ये हिंमत असेल आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी असेल त्यांना बिकट परिस्थिती देखील हरवू शकत नाही. असे लोक कोणत्याही परिस्थितीतून यशस्वी होतात. याचेच एक जिवंत उदाहरण म्हणजे स्टार्टअप रुबंस एक्सेसरीजची फाउंडर चीनू काला ही आहे. वयाच्या 15 व्या वर्षीच त्यांना घर सोडावं लागलं. त्या रेल्वे स्टेशनवर झोपल्या. त्यांनी घरोघरी जाऊन चाकू विकले. एवढेच नाही तर या कठीण काळातही हिंमत हारली नाही. याचा परिणाम म्हणजे आज त्या 40 कोटी रुपये वार्षिक टर्नओव्हर असणाऱ्या कंपनीच्या मालकिन आहे. चीन आजही दिवसाचे 15 तास काम करतात. भारतीय ज्वेलरी मार्केटमध्ये आपल्या ब्रँडची 25 टक्के भागिदारी असावी असे त्यांचे स्वप्न आहे.
चिनू काला या नुकत्याच त्यांच्या पतीसोबत शार्क टँक इंडियामध्ये दिसल्या. चिनूच्या संघर्षाची कहाणी ऐकून जज देखील प्रभावित झाले. चिनू यांना त्यांच्या स्टार्टअपसाठी शार्ककडून दीड कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. शार्क्सच्या नमिता थापरने चिनूचे कौतुक करत म्हटले की, 'आम्ही मास्टर्सकडून कौशल्ये शिकलो आहोत, तुम्ही ते परिस्थितीतून शिकलात." महिलेने संकटात शोधली संधी! कोरोनात नोकरी गेल्याने सुरु केला कुरकुऱ्याचा उद्योग, आता...
चिनू यांनी वयाच्या 15 वर्षीच सोडले होते घर : चिनू कालाने सांगितले की, घरातील वातावरण तिच्यासाठी खूप वाईट होते. याला कंटाळून त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षीच तिने घर सोडलं. काही रात्री तिने स्टेशनवर काढल्या. घरातून बाहेर पडल्यावर त्याच्याकडे फक्त 300 रुपये आणि काही कपडे होते. मग त्यांना एका ठिकाणी राहायला जागा मिळाली. घरोघरी चाकू विकण्याचे काम मिळाले. त्या दिवसाला फक्त 20 रुपये कमवू शकत होत्या. हे काम खूप अवघड होते. 100 दरवाजे ठोठावल्यावर माल फक्त 2-3 ठिकाणी विकला जायचा. यानंतर चिनू यांनी सायंकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत जॉब केला. रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस म्हणून त्यांनी काम केलं. कोणतंही काम छोटं नसतं असं म्हणत त्या पुढे जात राहिल्या. तुमच्या डेबिट कार्डवरही 'हे' चिन्ह आहे का? लगेच करा चेक आणि व्हा सावध
मिसेज इंडिया स्पर्धेने पालटले नशीब : चिनू काला यांच लग्न 2004 मध्ये अमित कालासोबत झालं. दोन वर्षांनंतर त्यांनी मिसेस इंडिया स्पर्धेत भाग घेतला. त्यांनी मिसेस इंडियाची शेवटचा राउंडही गाठला. त्यानंतर त्यांच्यासाठी आयुष्य सोपे झाले. कारण आता त्या मॉडल बनल्या होत्या. फॅशन इंडस्ट्रीत त्यांची चांगलीच ओळख झाली होती. पण, त्यांनी कधीही मॉडेलिंगला आपले करिअर मानले नाही. फॅशन ज्वेलरीच्या बाबतीत काहीतरी करण्याचा विचार त्या नेहमीच करत होत्या.
2014 मध्ये लाँच केले, Rubens Accessories: चिनू काला यांनी काम करून जे काही पैसे वाचवले, ते त्यांनी व्यवसाय उभारण्यासाठी लावले. चिनू यांनी बंगळुरूमधील एका मॉलमध्ये फक्त 6*6 जागेत आपला स्टॉल सुरू केला होता. काही वेळातच त्याची विक्री वाढू लागली. दोन वर्षांत त्याची विक्री 56 लाखांपर्यंत वाढली. कोरोनाच्या काळात चिनू यांनी तिचे दागिने ऑनलाइन विकायला सुरुवात केली. यामुळे त्याचा ब्रँड खूप प्रसिद्ध झाला. आज रुबेन्स अॅक्सेसरीजची वार्षिक उलाढाल 40 कोटींच्या पुढे गेली आहे.