मराठी बातम्या /बातम्या /मनी /उधारीवर घेतलेला लॅपटॉप विकून सुरु केला स्टार्टअप, आज हा तरुण करतोय लाखोंची कमाई!

उधारीवर घेतलेला लॅपटॉप विकून सुरु केला स्टार्टअप, आज हा तरुण करतोय लाखोंची कमाई!

प्रेम कुमार यांची सक्सेस स्टोरी

प्रेम कुमार यांची सक्सेस स्टोरी

पाटण्यातील प्रेमकुमार हे मुंबईला फिरण्याच्या उद्देशाने गेले होते. खिशात एक रुपयाही नव्हता म्हणून ते नोकरी शोधू लागले. काही ठिकाणी नोकरीसाठी पैशांचीही मागणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी स्वतःचा स्टार्टअप सुरू केला आणि आज ते यशस्वी झाले आहेत.

पुढे वाचा ...
  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई / पाटणा, 14 मार्च : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लोक प्रेमाने मायानगरी म्हणतात. इथे कोणाचे नशीब कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. फक्त स्वतःवर विश्वास असायला हवा. उदाहरणार्थ, त्रिशूल चित्रपटात अमिताभ बच्चन साहनी सेठसोबत व्यवहार करताना म्हणतात की. मी पाच लाखांचा सौदा करायला आलो आहे आणि माझ्या खिशात एक पैसाही नाही. पाटणाच्या प्रेम कुमारच्या बाबतीतही असंच झालं. प्रेमच्या खिशात एक पैसाही नव्हता, पण त्यांना स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा होता. मात्र त्यांना स्वतःवर विश्वास होता म्हणून आज ते लाखोंचा व्यवसाय करत आहेत आणि इतरांना रोजगार देताय.

महिलेने संकटात शोधली संधी! कोरोनात नोकरी गेल्याने सुरु केला कुरकुऱ्याचा उद्योग, आता...

पाटण्यातील प्रेम कुमार सांगतात की, ते मुंबई शहर पाहण्याच्या उत्कंठेने आले होते. त्यावेळी मुंबई शहरात आपलंही असं अस्तित्व असेल, असं त्यांना वाटलंही नव्हतं. 2018 सालची गोष्ट आहे. खिशात एक रुपयाही नव्हता म्हणून ते नोकरी शोधू लागले. दिवस उलटून गेले, पण प्रेम यांना नोकरी मिळाली नाही. काही ठिकाणी नोकरीसाठी पैशांचीही मागणी करण्यात आली. काही काळानंतर त्यांना वाटले की आपण स्वतःचा एक स्टार्टअप सुरू करावा, परंतु व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नव्हते.

वयाच्या 15 वर्षी सोडलं घर, घरोघरो जाऊन विकले चाकू; आज कमावते कोट्यवधी रुपये!

लॅपटॉप विकून स्टार्टअप सुरु केला

प्रेम यांनी सांगितले की, त्यांनी पाटण्याहून नुकताच लॅपटॉप आणला होता. तो देखील कर्जावर होता. एक दिवस त्यांनी तो लॅपटॉप OLX आणि Facebook वर विक्रीसाठी ठेवला. सोशल मीडियावरून लॅपटॉपसाठी भरपूर चौकशी होत असल्याचे त्यांनी पाहिले. मग इथूनच प्रेम यांचे स्टार्टअप सुरु झाले. लॅपटॉप विकून मिळालेल्या पैशातून त्यांनी लॅपटॉप आणले. या लॅपटॉपची त्यांनी ऑनलाइन विक्री सुरू केली. हळूहळू प्रेम यांचा हा धंदा सुरू झाला. आज मुंबईत त्यांचे स्वतःचे घर आहे आणि तिथे राहण्याचे स्वप्नही पूर्ण झाले आहे. प्रेम आता त्यांच्या कुटुंबासह मायानगरीत आनंदाने राहतात. प्रेमच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पाच वर्षांत हे स्थान मिळवले आहे. तसेच सर्व खर्च वजा केल्यावर त्याला वर्षाला 10 लाख रुपये मिळतात.

50 हजार रुपयांत सुरु होईल बिझनेस, मार्केटमध्ये आहे जबरदस्त डिमांड!

First published:
top videos

    Tags: Local18