मराठी बातम्या /बातम्या /मनी /

चहा प्या आणि कपही खाऊन टाका, कोल्हापूरात इंजिनिअर त्रिकुटाची भन्नाट शक्कल

चहा प्या आणि कपही खाऊन टाका, कोल्हापूरात इंजिनिअर त्रिकुटाची भन्नाट शक्कल

कोल्हापूरच्या तीन इंजिनिअर तरुणांनी लढवलेली खाण्यायोग्य चहाच्या कप्सची शक्कल कचरा कमी करण्यास नक्कीच हातभार लावणारी आहे.

कोल्हापूरच्या तीन इंजिनिअर तरुणांनी लढवलेली खाण्यायोग्य चहाच्या कप्सची शक्कल कचरा कमी करण्यास नक्कीच हातभार लावणारी आहे.

कोल्हापूरच्या तीन इंजिनिअर तरुणांनी लढवलेली खाण्यायोग्य चहाच्या कप्सची शक्कल कचरा कमी करण्यास नक्कीच हातभार लावणारी आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

कोल्हापूर, 11 फेब्रुवारी: देशभरात कचऱ्याची समस्या वाढू लागली आहे. एवढ्या लोकसंख्येच्या देशात ही समस्या मोठं रुप धारण करू लागली आहे. दरम्यान कचरा कमी करण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा जरी उचलला तरी मोठी मदत होऊ शकते. दरम्यान कोल्हापूरच्या तीन इंजिनिअर तरुणांनी लढवलेली खाण्यायोग्य चहाच्या कप्सची शक्कल कचरा कमी करण्यास नक्कीच हातभार लावणारी आहे. दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर या तरुण इंजिनिअर्सनी खाता येणाऱ्या बिस्किट कपचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कॅफे, चहाची टपरी, कॉफीची दुकानं याठिकाणी होणारा कप्सचा कचरा कमी होण्यास मदत होत आहे. प्लॅस्टिक आणि कागदी कप्ससाठी हे बिस्किट कप किंवा एडिबल कटलरी कप्स एक उत्तम पर्याय ठरत आहेत. लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.

दिग्विजय यांच्या डोक्यामध्ये ही सुपिक कल्पना आली होती आणि ती त्यांनी अभ्यासपूर्वक अंमलात देखील आणली. हैदराबाद आणि गुजरातमध्ये मिळणारे त्यांनी खाण्यायोग्य चमचे आणि कप्स मागवले. दीड वर्ष त्याबाबतीत अभ्यास केला आणि कोल्हापूरातही हा उपक्रम करता येईल असा त्यांनी निश्चय केला. सामान्यांच्या खिशाला परवडेल असे कप्स तयार करण्याचे त्यांनी ठरवले.

(हे वाचा-गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून वडिलांच्या किराणा दुकान चालवलं, आता कमावतोय करोडो)

हैदराबादमधून त्यांनी हे मशिन बनवून घेतले आहे. लॉकडाऊन काळात त्यांनी या कल्पनेला विशेष वेळ दिला. जानेवारीपासून त्यांनी इतर दोन मित्रांच्या मदतीने या खाण्यायोग्य कप्सची निर्मिती सुरू केली. शहरातील विविध कॅन्टीन, रेस्टॉरंट, कॅफे याठिकाणी त्यांचे कप्स पुरवले जात आगेत. सध्या कप्सबाबतीत सुरू असणारा त्यांचा व्यवसाय वृद्धींगत करण्याचा त्यांचा विचार आहे. कालांतराने बाउल्स आणि प्लेट्स देखील बनवण्याचा या त्रिकुटाचा मानस आहे. इतर काही मित्र आणि काही राजकीय मंडळींची त्यांना यामध्ये मदत केली आहे.

(हे वाचा-Budget 2021: बजेटच्या कव्हरेजमध्ये मनीकंट्रोल ठरलं अव्वल)

खाण्यायोग्य कप्स बनवण्याचे मशिन इतरही कुणाला बनवता यावे याकरताही आराखडा तयार करण्याचे दिग्विजय यांच्या डोक्यात आहे. याबाबत त्यांचा विचार सुरू आहे. त्यांनी याबाबत आराखडा तयार करून पुढील चार महिन्यात हे मशिन बाजारात आणण्याचा त्यांचा मानस आहे.

First published:

Tags: Kolhapur, Tea