मराठी बातम्या /बातम्या /मनी /Budget 2021: बजेटच्या कव्हरेजमध्ये मनीकंट्रोल ठरलं अव्वल

Budget 2021: बजेटच्या कव्हरेजमध्ये मनीकंट्रोल ठरलं अव्वल

Budget 2021: मनीकंट्रोल (moneycontrol.com) या वेबसाईटला लोकांनी सर्वाधिक पसंती दर्शवल्याचं समोर आलं आहे.

Budget 2021: मनीकंट्रोल (moneycontrol.com) या वेबसाईटला लोकांनी सर्वाधिक पसंती दर्शवल्याचं समोर आलं आहे.

Budget 2021: मनीकंट्रोल (moneycontrol.com) या वेबसाईटला लोकांनी सर्वाधिक पसंती दर्शवल्याचं समोर आलं आहे.

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या वर्ष 2021-22 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे अर्थात बजेटचे (Budget 2021) कव्हरेज करण्यात मनीकंट्रोलनं (Moneycontrol) डिजिटल मीडियात अव्वल स्थान पटकावलं आहे. बजेटच्या कव्हरेजसाठी मनीकंट्रोलनं खास डिझाइन केलेल्या मायक्रोसाईटला सर्वाधिक लोकांनी भेट दिली होती. देशभरातील दर्शकांनी अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्था (Economy) सुरळीत होण्यासाठी जाहीर केलेल्या उपाययोजना जाणून घेण्यासाठी मनीकंट्रोलच्या साईटला भेट दिली होती. त्या दिवशी आर्थिक क्षेत्राशी संबधित बातम्या देणाऱ्या या आघाडीच्या वेबसाइटला भेट देणाऱ्यांची संख्या लक्षणीय रीत्या वाढल्याचं दिसून आलं. सर्वसमावेशक, अगदी ताज्या माहितीसाठी लोकांनी याच वेबसाइटला प्राधान्य दिल्याचं स्पष्ट झालं.

मनीकंट्रोलला प्रतिस्पर्धी, इकॉनॉमिक टाइम्स, लाइव्हमिंट आणि फायनान्शियल एक्स्प्रेसच्या तुलनेत अनुक्रमे 21 टक्के    77 टक्के आणि 108 टक्के अधिक  वाचकांनी भेट दिल्याचं सिमिलरवेबनं दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट झालं आहे.  मनीकंट्रोलला आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा प्रायोजकही अधिक संख्येनं मिळाले.

मनीकंट्रोलला मिळालेल्या या उदंड प्रतिसादामुळं वाचकांचा आणि प्रायोजकांचा त्याच्यावरचा विश्वास अधोरेखित झाला असून, केंद्रीय अर्थसंकल्प 2021 च्या सखोल विवेचनालाही त्यामुळं पाठिंबा लाभला. अगदी ताज्या माहितीसाठी वाचकांच्या  मनीकंट्रोलच्या लाईव्ह अपडेटस ब्लॉगवरही(Live Updates Blog) उड्या पडल्या. मनीकंट्रोलची ज्येष्ठ संपादकांची टीम तसंच इन-हाऊस विश्लेषक आणि थिंक-टँकच्या (Think Tank) आर्थिक तज्ज्ञांनी (Financial Experts) वाचकांसाठी अर्थसंकल्प स्पष्ट करणारे सर्व मुद्दे सखोलपणे मांडले. यावर्षीच्या बजेट कव्हरेजचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे स्मार्ट व्हिज्युअल कार्डच्या संचाचे प्रदर्शन. यामुळं वाचकांना अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रावरील उपाययोजनांची अद्ययावत माहिती मिळाली.

मनीकंट्रोलचे कार्यकारी संपादक बिनॉय प्रभाकर म्हणाले, ‘केंद्रीय अर्थसंकल्प हा दर वर्षी भारतातील सर्वात मोठा आर्थिक कार्यक्रम असतो. मनीकंट्रोलची पत्रका, डिझायनर, व्यवस्थापक आणि अभियंत्यांची टीम वाचकांना एक अनोखा अनुभव देण्यास संयुक्तपणे अथक काम करत असते. आमची निरीक्षणं, सखोल विश्लेषण आणि मौल्यवान टिप्पणी किंवा भाष्य यासाठी पूर्वी कधीही भेट दिलेली नसलेल्या असंख्य वाचकांनीही आमच्या वेबसाइटला भेट दिली, याचा मला खूप आनंद आहे.’

मनीकंट्रोलनं सर्वसामान्य करदाते,  गुंतवणूकदार, व्यवसाय लक्षात घेऊन ‘रीबिल्डिंग इंडिया’ ही संकल्पना वापरून अर्थसंकल्प स्पष्ट केला. एक फेब्रुवारीला दिवसभर आणि रात्रीही मनीकंट्रोलने व्हिडिओ आणि पॉडकास्टच्या सहायानं  अर्थसंकल्प समजावून सांगणाऱ्या बातम्या, चर्चा सादर केल्या.

 हे देखील वाचा -  2025 पर्यंत IT क्षेत्रात उपलब्ध करणार 10 लाख नोकऱ्या, या उपमुख्यमंत्र्यांचा विश्वास

 ‘आमच्या वेबसाइटवर वाढलेल्या वाचक संख्येवरून अर्थसंकल्पाचं अचूक, सर्वसमावेशक कव्हरेजसाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांना वाचकांनी प्रतिसाद दिल्याचं स्पष्ट दिसतं, असं मनीकंट्रोलचे कार्यकारी संपादक बिनॉय प्रभाकर यांनी नमूद केलं. भारतातील काही ज्येष्ठ धोरणकर्ते,  बुद्धीमान व्यावसायिक आणि कॉर्पोरेट दिग्गजांनी अर्थसंकल्पाच्या बारीक मुद्द्यांविषयी चर्चा केली आणि अर्थव्यवस्था तसंच व्यवसायांसाठी या उपाययोजनांचा काय अर्थ असेल, हे स्पष्ट केलं.

मनीकंट्रोलनं अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर, अर्थ सचिव अजय भूषण पांडे, अर्थमंत्रालयाच्या व्यय विभागाचे सचिव टी. व्ही. सोमनाथन अशा अर्थसंकल्पातील प्रमुख धुरिणांची मुलाखत घेतली. तसंच देशातील श्रेष्ठ डीलमेकर, कार्पोरेट वकील आणि एझेडबीचे  सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार जिया मोदी,  सिरिल अमरचंद मंगलदासचे व्यवस्थापकीय संचालक सिरिल श्रॉफ यांच्यासह मोतीलाल ओसवाल प्रायव्हेट वेल्थ मॅनेजमेंटचे गुंतवणूक सल्लागार आशिष शंकर, पार्टनर, डेलॉइट हॅकिन्स अँड सेल्स एलएलपीचे भागीदार होमी मिस्त्री आदींनी बजेटचा अर्थ उलगडून सांगितला. केवळ ताजी माहिती पुरवण्यावर भर न देता अर्थसंकल्पातील उपाययोजनांचे सखोल मूल्यांकन करत त्याचं महत्त्व विशद केल्यामुळं मनीकंट्रोलचं अर्थसंकल्पाचं कव्हरेज (Budget Coverage) सर्वांत वेगळं ठरलं.

First published:

Tags: Budget, Budget 2021, Business News, Economy, हंगामी अर्थसंकल्प Finance minister