Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मनी /

IRCTC च्या शेअरमध्ये दुसऱ्या दिवशीही 18 टक्क्यांनी घसरण; आता खरेदी योग्य आहे?

IRCTC च्या शेअरमध्ये दुसऱ्या दिवशीही 18 टक्क्यांनी घसरण; आता खरेदी योग्य आहे?

 IRCTC च्या शेअर्समध्ये मंगळवारी अचानक 15 टक्क्यांची घसरण झाली. आजही या शेअरमध्ये जवळपास 18 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.

IRCTC च्या शेअर्समध्ये मंगळवारी अचानक 15 टक्क्यांची घसरण झाली. आजही या शेअरमध्ये जवळपास 18 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.

IRCTC च्या शेअर्समध्ये मंगळवारी अचानक 15 टक्क्यांची घसरण झाली. आजही या शेअरमध्ये जवळपास 18 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 20 ऑक्टोबर :  IRCTC च्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरत पाहायला मिळत आहे. आयआरसीटीसीचे शेअर्स बुधवारी सुरुवातीच्या ट्रेडमध्ये 18 टक्क्यांनी घसरून 4610 रुपयांवर आले. यात नंतर थोडी सुधारणा झाली पण नंतर पुन्हा शेअर घसरुन 18 टक्क्यांपर्यंत खाली आले.

मंगळवार, 19 ऑक्टोबर रोजी IRCTC च्या शेअर्समध्ये अचानक 15 टक्क्यांची घसरण झाली. मात्र बाजार बंद होता होता त्यात थोडी सुधारणा झाली आणि बीएसईवर 8 टक्क्यावर बंद झाले होते. आयआरसीटीसीच्या शेअर्सने 19 ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या ट्रेडमध्ये 6393 रुपयांच्या ऑलटाईम हाय टच केला होता.

आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये आज म्हणजे बुधवार, 20 ऑक्टोबर रोजी फ्युचर ऑप्शनचा (F&O) ट्रेड होत नाहीय. आयआरसीटीसीला एनएसईच्या फ्युचर ऑप्शनच्या बॅन लिस्टमध्ये टाकण्यात आलं आहे. एनएसईने याबाबत म्हटले की, आयआरसीटीसीच्या शेअर्सना फ्युचर ऑप्शनवर बॅन करण्यात आलं आहे कारण त्यांनी 95% मार्केट वाइड पोझिशन लिमिट (MWPL) पार केली आहे.

खूशखबर! Axis Bank ची धमाकेदार फेस्टिव्ह ऑफर! होम लोनवर 12 EMI ची सूट तर आणखीही काही बेनिफिट्स

गुंतवणूकदारांनी काय करावे?

आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये अचानक घसरण झाल्याने गुंतवणूकदार अडचणीत आहेत. प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजचे रिचर्च हेड अविनाथ गोरक्षाकर यांनी म्हटलं की, गेल्या एका महिन्यात आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली होती आणि आता प्रॉफिट बुकिंगची प्रतीक्षा होती. मात्र इथून पुढे जास्त पडझडीची शक्यत कमी आहे. कारण याचे सर्वाधिक शेअर भारत सरकारकडे आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की आता या शेअरमध्ये गुंतवणूक करावी. पुढील काही ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट कमकुवत राहील. अशा परिस्थितीत आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये आणखी काही घट होऊ शकते. अपेक्षित आहे की आयआरसीटीसीचे शेअर्स 2022 च्या आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीचे निकाल येईपर्यंत मर्यादित श्रेणीत ट्रेड करतील.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! 'या' सर्वांना मिळणार 30 दिवसांचा बोनस

आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये पुढे काय करायचे याविषयी मिंटमधील वृत्तानुसार, चॉईस ब्रोकिंगचे समीत बागडिया म्हणाले की, चार्टवर आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये कमकुवतपणा दिसत आहे आणि गुंतवणूकदारांनी ते आता खरेदी करणे टाळावे. मजबूत रेजिस्टन्स लेव्हल 6000-6100 रुपये आहे तर सपोर्ट लेव्हल 5000-5100 रुपयांमध्ये दिसत आहे.

First published:

Tags: Indian railway, IRCTC, Share market, Stock Markets