नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर: जर तुम्हीही या दिवाळीत तुमचे स्वतःचे घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. खाजगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने (Axis Bank Home Loan Offer) मंगळवारी जाहीर केले की ती निवडक होम लोन उत्पादनांवर आणि अनेक ऑनलाइन खरेदीवर 12 EMI ची सूट बँकेकडून दिली जाईल. याशिवाय, बँक कोणत्याही प्रोसेसिंग फीसशिवाय (Zero Processing Fee) दुचाकींवर ग्राहकांना ऑन-रोड फायनान्सची सुविधा देत आहे.
बँकेने आपल्या फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत ही घोषणा केली आहे. बँकेने या सर्व घोषणा आपल्या 'दिल से ओपन सेलिब्रेशन्स: क्यूंकी दिवाली रोज-रोज़ नहीं आती' या योजनेच्या लाँचवेळी केल्या आहेत. जाणून घ्या 12 EMI ची सूट देण्याशिवाय बँक कोणत्या ऑफर्स देत आहे...
व्यावसायिक व्यक्तीला मिळतील या सुविधा: व्यवसाय मालकांसाठी बँक मुदत कर्ज, इक्विपमेंट लोन आणि व्यावसायिक वाहन फायनान्स यावर अनेक फायदे देण्यात येणार आहेत.
वाचा-केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! 'या' सर्वांना मिळणार 30 दिवसांचा बोनस
डेबिट, क्रेडिट कार्डवर सवलत: इतर किरकोळ कर्ज उत्पादने आणि अॅक्सिस बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डाद्वारे केलेल्या खरेदीवर सूट दिली जात आहे.
खरेदीवर 20 टक्के सूट: ग्राहकांना 50 शहरांमधील 2500 स्थानिक विक्रेत्यांकडून खरेदीवर 20 टक्के सूट मिळेल. बँक ग्राहकांना या स्टोअरमधून खरेदीवर 20 टक्के सूट देखील मिळेल.
वाचा-इंधन दरवाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला, आज पुन्हा वाढले Petrol-Diesel भाव
खरेदी आणि कर्ज उत्पादनांवर मोठी डील्स आणि सवलत: अॅक्सिस बँकेचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह आणि हेड रिटेल लेंडिंग, सुमित बाली म्हणाले की, या सणासुदीच्या काळात त्यांनी नामांकित ब्रँड्सशी करार केला आहे. यासह, त्यानी स्थानिक किरकोळ विक्रेत्यांशी भागीदारी केली आहे, ज्या अंतर्गत अनेक पर्याय दिले जातील. ते पुढे म्हणाले की सध्याच्या सणांच्या दरम्यान, ते त्यांच्या ग्राहकांना खरेदी आणि कर्ज उत्पादनांवर मोठी डील्स आणि सवलत देत आहेत.
सणासुदीच्या काळात उपलब्ध ऑफर: सणासुदीच्या काळात देशातील जवळपास सर्व खासगी आणि सरकारी बँकांनी ग्राहकांना ऑफर दिल्या आहेत. या अंतर्गत ग्राहकांच्या कर्जाचा व्याजदर कमी करण्यात आला आहे, त्यानंतर प्रक्रिया शुल्कही माफ करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.