मराठी बातम्या /बातम्या /मनी /केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! 'या' सर्वांना मिळणार 30 दिवसांचा बोनस

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! 'या' सर्वांना मिळणार 30 दिवसांचा बोनस

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार दिवाळीच्या दिवशी काही केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Diwali Bonus for Central Government Employees) बोनसची भेट देणार आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार दिवाळीच्या दिवशी काही केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Diwali Bonus for Central Government Employees) बोनसची भेट देणार आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार दिवाळीच्या दिवशी काही केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Diwali Bonus for Central Government Employees) बोनसची भेट देणार आहे.

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर: सणासुदीचा काळ म्हणजे शॉपिंगचा, नवनवीन गोष्टी घरी आणण्याचा. आणखी एका कारणासाठी या फेस्टिव्ह सीझनची वाट पाहिली जाते, ते कारण म्हणजे विविध कंपन्या या काळात बोनस जारी करतात. दरम्यeन केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील बोनस जारी केला जातो. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार दिवाळीच्या दिवशी काही केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Diwali Bonus for Central Government Employees) बोनसची भेट देणार आहे. अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) सांगितले की, निमलष्करी दलांना 30 दिवसांचा दिवाळी बोनस दिला जाईल. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 30 दिवसांच्या पगाराएवढी नॉन-प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (Adhoc Bonus) देण्यास मान्यता देण्यात आली आहे. याचा लाभ केंद्र सरकारच्या ग्रुप-सी आणि ग्रुप-बी मधील त्या सर्व नॉन-राजपत्रित कर्मचाऱ्यांना उपलब्ध होईल, जे कोणत्याही प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस योजनेअंतर्गत समाविष्ट केले जात नाही.

'या' शेअरमुळे गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; अजूनही गुंतवणुकीची संधी

बोनससाठी पूर्ण कराव्या लागतील या अटी

अर्थ मंत्रालयाच्या मते, केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलांच्या पात्र कर्मचाऱ्यांना Adhoc Bonus चा लाभ दिला जाईल. या व्यतिरिक्त, केंद्रशासित प्रदेशातील त्या कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळेल, जे केंद्र सरकारच्या इमोल्युमेंट्सच्या पॅटर्नचे अनुसरण करतात आणि केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही बोनसद्वारे संरक्षित नाहीत. Adhoc Bonus चा लाभ फक्त त्या कर्मचाऱ्यांनाच मिळेल जे 31 मार्च 2021 रोजी सेवेत होते आणि 2020-21 वर्षात किमान सहा महिने सतत सेवेत होते. यामध्ये 6 महिने ते एक वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याच प्रमाणात बोनस दिला जाईल.

काय आहे दिवाळी बोनसचं कॅलक्यूलेशन?

-एका वर्षातील सरासरी इमोल्युमेंट्सला महिन्याच्या दिवसांची सरासरी संख्या 30.4 ने भागण्यात येईल. उदाहरणार्थ 7000 रुपयावर बोनस 7000×30/30.4 = Rs 6907.89 असेल.

-आठवड्यातील 6 दिवसाअंतर्गत ऑफिसमध्ये 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त दरवर्षी कमीत कमी 240 दिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल. यांच्यासाठी या बोनसची रक्कम 1200×30/30.4 = 1184.21 रुपये असेल.

Commodity Market : शेअर बाजारातील कमोडिटी ट्रेडिंग काय आहे?

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी इतरही अनेक घोषणा

सणासुदीच्या काळात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डीए आणि डीआर पुन्हा 3 टक्क्यांनी वाढू शकतो. यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा डीए आणि डीआर मूळ वेतनाच्या 28 टक्क्यांवरून 31 टक्के होईल. डीए आणि डीआरमध्ये वाढ करण्याव्यतिरिक्त, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना इतर काही फायदे देखील मिळतील, ज्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक पेन्शनची मर्यादा 45000 रुपयांवरून 1.25 लाख रुपये करण्यात आली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आणि त्यांना पुरेशी आर्थिक मदत देण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलले होते.

First published:

Tags: Central government, Diwali 2021, Government employees, Money