मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Share Market Update : अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्समध्ये 900 अंकाची वाढ, निफ्टी 17600 वर

Share Market Update : अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्समध्ये 900 अंकाची वाढ, निफ्टी 17600 वर

सेन्सेक्स 848.40 अंकांच्या किंवा 1.46 टक्क्यांच्या वाढीसह 58,862.57 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 237.00 अंकांच्या किंवा 1.37 टक्क्यांच्या वाढीसह 17,576.85 वर बंद झाला.

सेन्सेक्स 848.40 अंकांच्या किंवा 1.46 टक्क्यांच्या वाढीसह 58,862.57 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 237.00 अंकांच्या किंवा 1.37 टक्क्यांच्या वाढीसह 17,576.85 वर बंद झाला.

सेन्सेक्स 848.40 अंकांच्या किंवा 1.46 टक्क्यांच्या वाढीसह 58,862.57 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 237.00 अंकांच्या किंवा 1.37 टक्क्यांच्या वाढीसह 17,576.85 वर बंद झाला.

    मुंबई, 1 फेब्रुवारी : अर्थसंकल्पाच्या (Budget 2022) दिवशी आज बाजार मोठ्या तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 848.40 अंकांच्या किंवा 1.46 टक्क्यांच्या वाढीसह 58,862.57 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 237.00 अंकांच्या किंवा 1.37 टक्क्यांच्या वाढीसह 17,576.85 वर बंद झाला. आजच्या व्यवहारात मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. बीएसईचा मिड कॅप 1.21 टक्क्यांच्या वाढीसह 24,909.77 वर बंद झाला. स्मॉलकॅप निर्देशांक 1.02 टक्क्यांच्या वाढीसह 29,525.83 वर बंद झाला. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Auto, Oil & Gas वगळता बीएसईच्या सर्व सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. Metal , Realty, Pharma शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली. कन्झुमर ड्युरेबल्स, FMCG शेअर्सही वधारले. Budget 2022 : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त? आणि काय महाग? वाचा सविस्तर... टॉप गेनर्स शेअर >> टाटा स्टील (Tata Steel) - 1,167.35 रुपये (7.54 टक्के) >> सन फार्मा (Sun Pharma)- 891.75 रुपये ( 6.86 टक्के) >> इंडसइंड बँक (IndusInd Bank) - 922.30 रुपये (5.76 टक्के) >> श्री सिमेंट (Shree Cements) - 25,489.65 रुपये (5.04 टक्के) >> हिडाल्को (Hindalco) - 511.00 रुपये (4.49 टक्के) टॉप लूजर्स शेअर >> बीपीसीएल (BPCL)- 378.85 रुपये (4.58 टक्के) >> इंडियन ऑईन कॉर्रोपरेशन (IOC)- 121.75 रुपये (2.76 टक्के) >> टाटा मोटर्स (Tata Motors) - 504.30 रुपये (2.60 टक्के) >> महिंद्रा (M&M)- 869.70 रुपये (1.82 टक्के) >> एसबीआय लाईफ इन्शुरन्स (SBI Life Insura) - 1,214.95 रुपये (1.48 टक्के) Budget 2022 : सर्वसामान्यांना दिलासा, घर बांधण्याचा खर्च कमी होणार, काय आहे कारण? ITC शेअर वधारले आयटीसीच्या (ITC) शेअरमध्ये आज चांगली तेजी दिसून आली. अर्थमंत्र्यांनी आज सादर केलेल्या 2022 च्या अर्थसंकल्पात सिगारेट आणि तंबाखू उत्पादनांवर कोणताही कर जाहीर केलेला नाही. ज्याचा आज आयटीसीच्या शेअर्सवर सकारात्मक परिणाम झाला. सध्या, आयटीसीचा शेअर 6.75 रुपये किंवा सुमारे 3 टक्क्यांच्या वाढीसह 226.95 रुपयांच्या आसपास दिसत आहे. ITC च्या उत्पन्नात सिगारेट आणि तंबाखूचा वाटा 40 टक्क्यांहून अधिक आहे. पेटीएमचा शेअरही तेजीत निर्मला सीतारामन यांनी भारतात डिजिटल पेमेंट प्रणालीचा जलद अवलंब करण्याची आपली वचनबद्धता सुरू ठेवण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच पेटीएमचा शेअर (Paytm Sahre) वधारला. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर, One97 Communications च्या शेअरची किंमत 5 टक्क्यांहून अधिक वाढली आणि या शेअरची किंमत प्रति शेअर 971.40 रुपयांवर पोहोचली.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Budget, Money, Share market

    पुढील बातम्या