मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Stock Market : PNB, टर्बाइन सोबत या स्टॉक्सवर फोकस, गुंतवणूक फायद्याची ठरेल?

Stock Market : PNB, टर्बाइन सोबत या स्टॉक्सवर फोकस, गुंतवणूक फायद्याची ठरेल?

 महत्त्वपूर्ण स्टॉककडे आज लक्ष असेल. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करण्याबाबत विचार करू शकता.

महत्त्वपूर्ण स्टॉककडे आज लक्ष असेल. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करण्याबाबत विचार करू शकता.

महत्त्वपूर्ण स्टॉककडे आज लक्ष असेल. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करण्याबाबत विचार करू शकता.

मुंबई : फेडच्या बैठकीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बदल होऊ शकतात. आशिया मार्केटमध्ये सरकारच्या निर्णयाचे पडसाद आज पाहायला मिळू शकतात. काही कंपन्या शेअर बाजार बंद झाल्यानंतर निर्णय घेतात त्याचे परिणामही दुसऱ्या दिवशी बाजार उघडताना पाहायला मिळतात. स्टॉकवर याचा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होत असतो. आज महत्त्वपूर्ण स्टॉककडे लक्ष असेल. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करण्याबाबत विचार करू शकता. Triveni Turbine ADIA, आदित्य बिर्ला, सन लाइफ, एसबीआई एमएफ, नोमुराने त्रिवेणी टर्बाइनमध्ये ७.६७ टक्के भागीदारी घेतली आहे. त्यामुळे सध्या या शेअरकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. IDBI Bank बँकेने Ageas Federal Life Insurance Company मधील आपला संपूर्ण हिस्सा Ageas Insurance International NV ला विकला. आता एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्स कंपनीमध्ये बँकेची कोणतीही भागीदारी नाही. त्यामुळे आता कंपनीचे शेअर घसरणार की वधारणार याकडे लक्ष राहील. हे वाचा-Zerodha कंपनीचं शेअर बाजारातील साम्राज्य कसं वाढलं? वाचा यशामागचं रहस्य Punjab National Bank, Ashoka Buildcon या दोन्ही स्टॉककडे लक्ष असेल. हे दोन्ही स्टॉक पिक ऑफ द डे ठरणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. US फेडरल रिझर्व्हने मोठा झटका दिला आहे. सलग तिसऱ्यांदा ०.७५ टक्के व्याजदर वाढवला आहे. त्यामुळे याचा परिणाम आशियातील मार्केटवर कसा होणार हे आज पाहावं लागणार आहे. आशिया मार्केटवर दबाव असणार आहे. Heritage Foods- कंपनीने सांगितले की, राईट इश्यूच्या आधारे इक्विटी शेअर्स जारी करून निधी उभारण्याचा विचार करण्यासाठी संचालक मंडळाची 30 सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. त्यामुळे याकडेही लक्ष आहे. या बैठकीत होणाऱ्या निर्णयाचा परिणाम शेअर बाजारावर होणार आहे. हे वाचा-Money Mantra : गुंतवणुकीसाठी आजचा दिवस कसा? तुमचं आर्थिकदृष्ट्या राशिभविष्य Kirloskar Oil Engines - कंपनीने सांगितले की, बोर्ड सदस्यांनी अनुराग भगानिया यांची 22 सप्टेंबरपासून कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती केली. याशिवाय, कंपनीने La-Gajjar Machineriesमध्ये 24% भागीदारी घेतली आहे.
First published:

Tags: Liquor stock, Money, Share market, Stock exchanges, Stock Markets

पुढील बातम्या