मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Zerodha कंपनीचं शेअर बाजारातील साम्राज्य कसं वाढलं? वाचा यशामागचं रहस्य

Zerodha कंपनीचं शेअर बाजारातील साम्राज्य कसं वाढलं? वाचा यशामागचं रहस्य

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी चांगला ब्रोकर (Broker) मिळणं गरजेचं असतं. आता ब्रोकिंगशी संबंधित अनेक अ‍ॅप्स बाजारात उपलब्ध आहेत.

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी चांगला ब्रोकर (Broker) मिळणं गरजेचं असतं. आता ब्रोकिंगशी संबंधित अनेक अ‍ॅप्स बाजारात उपलब्ध आहेत.

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी चांगला ब्रोकर (Broker) मिळणं गरजेचं असतं. आता ब्रोकिंगशी संबंधित अनेक अ‍ॅप्स बाजारात उपलब्ध आहेत.

मुंबई : शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करणं जोखमीचं असलं, तरी अलीकडच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचा कल त्याकडे वाढत आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी चांगला ब्रोकर (Broker) मिळणं गरजेचं असतं. आता ब्रोकिंगशी संबंधित अनेक अ‍ॅप्स बाजारात उपलब्ध आहेत. अनेक जण या अ‍ॅप्सचा वापर करून शेअर बाजारात आर्थिक व्यवहार करत असतात. सध्या अशीच एक ब्रोकरेज कंपनी जोरदार चर्चेत आहे. ही कंपनी ग्राहकसंख्येच्या अनुषंगाने देशात सर्वांत मोठी ठरली आहे. झिरोधा (Zerodha) असं या कंपनीचं नाव असून, कंपनीचे मालक नितीन कामत (Nitin Kamat) यांनी या यशामागचं रहस्य सांगितलं आहे. ग्राहकसंख्येनुसार देशातली सर्वांत मोठी ब्रोकरेज कंपनी असलेल्या `झिरोधा`चे मालक नितीन कामत यांनी कंपनीला एवढं यश मिळेल याचा विचारही केला नव्हता. 2016 मध्ये झिरोधाचे 70 हजार ग्राहक (Customer) होते. 2022 मध्ये ही संख्या वाढून एक कोटींवर पोहोचली आहे. वेगळ्या पद्धतीनं व्यवसाय करून स्टार्टअपला युनिकॉर्न बनवण्याच्या बाबतीत नितीन कामत यांची झिरोधा कंपनी 'पोस्टर चाइल्ड' ठरली आहे. 90च्या दशकाच्या अखेरीस नितीन यांनी त्यांच्या आईच्या ऑफलाइन ट्रेड अकाउंटपासून शेअर बाजारात सुरुवात केली. शेअर बाजारात व्यवहार सुरू झाल्याने त्यांची व्यवसायाची समज चांगली होत गेली. नितीन कामत यांनी 2010 पर्यंत झिरोधा लॉंच केली नव्हती. शेअर बाजारात ट्रेडिंगची सुरुवात त्यांनी एक दशकापूर्वीच केली होती. मारवाडी वातावरणात वाढलेले नितीन कामत, ज्यांना शेअर बाजारात हात आजमावायचा होता, अशा व्यक्तींमध्ये राहत होते. 2005 मध्ये आपला सल्लागार व्यवसाय (Consulting business) सुरू करण्यापूर्वी नितीन एका कॉल सेंटरमध्ये काम करत होते. त्यानंतर त्यांनी याहू मेसेंजर आणि ऑर्कुटवर शेअर बाजाराविषयी सखोल माहिती देण्यासाठी ग्रुप तयार केले. यानंतर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (National Stock Exchange) फ्री ट्रेडिंग प्लॅटफॉर्म सुरू केला. झिरोधाची सुरुवात त्यातूनच होत गेली. व्यवसायाच्या सुरुवातीच्या सहा वर्षांतचं कंपनीचे 70 हजार ग्राहक झाले. त्यानंतर चार वर्षांत वीस लाख ग्राहक झिरोधाशी जोडले गेले. गेल्या काही वर्षांत झिरोधाने चांगलं यश मिळवलं आहे. 2022 मध्ये झिरोधाची ग्राहकसंख्या एक कोटीपेक्षा अधिक झाली आहे. `2010मध्ये झिरोधा कंपनी सुरू करण्यामागे दोन समस्या सोडवणे, हा मुख्य उद्देश होता. आम्हाला ट्रेडिंगचा (Trading) खर्च कमी करायचा होता. यासोबतच शेअर्स खरेदी-विक्रीच्या व्यवसायात पारदर्शकता आणायची होती. पैशांशी संबंधित असलेल्या व्यवसायात या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. या दोन्ही समस्यांवर तोडगा काढल्याने झिरोधा हे देशातल्या नागरिकांचं सर्वाधिक पसंतीचं ब्रोकरेज हाउस बनलं,` असं नितीन कामत यांनी सांगितलं. झिरोधा आपल्या ग्राहकांना उत्तम अनुभव देऊन त्यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी झाली आहे. यामुळे माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून कंपनीला मोठं करण्यात झिरोधाच्या ग्राहकांनी मोठं योगदान दिलं आहे. कामत म्हणाले, `झिरोधाचे आज एक कोटीपेक्षा जास्त ग्राहक आहेत. ही देशातली सर्वांत मोठी ब्रोकरेज कंपनी आहे. विशेष म्हणजे आम्ही आतापर्यंत जाहिरातीसाठी एक रुपयादेखील खर्च केलेला नाही. झिरोधाचे ग्राहक कंपनीची जाहिरात करतात आणि त्यातून नवे ग्राहक कंपनीसोबत जोडले जातात. या व्यवसायात कोणत्याच गोष्टी अवघड नाहीत. आम्हाला फंड मिळाला नसता तर आम्ही यशाचं हे शिखर गाठू शकलो नसतो.`
First published:

Tags: Money

पुढील बातम्या