मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra : गुंतवणुकीसाठी आजचा दिवस कसा? तुमचं आर्थिकदृष्ट्या राशिभविष्य

Money Mantra : गुंतवणुकीसाठी आजचा दिवस कसा? तुमचं आर्थिकदृष्ट्या राशिभविष्य

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (22 सप्टेंबर 2022) राशिभविष्य. मेष (Aries) : करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस खास असेल. एखाद्या स्पेशल डीलला अंतिम रूप मिळेल. त्यातून आर्थिक लाभ होईल. घरी पाहुणे आल्यामुळे विनाकारण खर्च वाढेल. प्रियकर-प्रेयसीमधला भावनिक बंध मजबूत असेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. लकी नंबर : 5 लकी कलर : Cream उपाय : गायीला हिरवा चारा किंवा पालक खाऊ घाला. वृषभ (Taurus) : आज नव्या योजनांकडे लक्ष दिलं जाईल. त्या योजना भविष्यात फायद्याच्या ठरतील. आज तुम्हाला कायदेशीर वादात यश मिळेल. वैवाहिक नातेसंबंध आनंदी असतील. लकी नंबर : 8 लकी कलर : Violet उपाय : दुर्गामातेच्या मंदिरात तुपाचा दिवा लावा. मिथुन (Gemini) : महत्त्वाकांक्षी व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला आहे. बिझनेससाठी केलेला प्रवास फायद्याचा होईल. नोकरदार व्यक्ती आपल्या कष्टांनी वरिष्ठांचं समाधान करतील. आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला असेल. लकी नंबर : 8 लकी कलर : Green उपाय : गरीब व्यक्तीला पांढऱ्या वस्तू दान करा. कर्क (Cancer) : आज कामाच्या ठिकाणी ऑफिसरशी किंवा बिझनेस क्षेत्रात बिझनेसमनशी बेबनाव होऊ शकतो. तुमच्या कार्यकौशल्याने तुम्ही शत्रूवर विजय प्राप्त कराल. आज तुम्ही नवा बिझनेस सुरू करण्याचा विचार कराल. लकी नंबर : White लकी कलर : 3 उपाय : पक्ष्यांना धान्य खाऊ घाला. सिंह (Leo) : नव्या नोकरीच्या संधी आणि नवी बिझनेस डील्स समोर येऊ शकतील. समस्यांशी दोन हात करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्हाला नवी ऑफरही मिळू शकेल. शहाणपणाने काम सुरू करा. लवकरच तुमचं काम पूर्ण होईल. दैनंदिन कामं पूर्ण करण्यात कोणताही अडथळा येणार नाही. लकी नंबर : 8 लकी कलर : Blue उपाय : काळ्या कुत्र्याला काही गोड खाऊ घाला. कन्या (Virgo) : सुरू असलेले प्रोजेक्ट्स आणि कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. कोणत्याही प्रकारचा वाद किंवा संघर्ष टाळा. गुंतवणूक पुढे ढकलणं चांगलं राहील. प्रॉपर्टीसंदर्भातलं डील फायनल करण्यापूर्वी सर्व कागदपत्रं काळजीपूर्वक वाचा. अन्यथा तोटा होऊ शकतो. लकी नंबर : 8 लकी कलर : Grey उपाय : शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या व्यक्तीची सेवा करा. तूळ (Libra) : आजचा दिवस संमिश्र असेल. कोणतंही मोठं काम सुरू करण्यापूर्वी त्या क्षेत्रातल्या संबंधित व्यक्तींचं मत घ्या. जोडीदारांना बिझनेसमध्ये मदत मिळेल. कामकरी वर्गाची प्रगती होऊ शकेल. अतिरिक्त उत्पन्न मिळेल. लकी नंबर : 3 लकी कलर : Light Green उपाय : मुंग्यांना पीठ आणि साखरेचं मिश्रण खाऊ घाला. वृश्चिक (Scorpio) : बिझनेसमधल्या काही नव्या प्लॅन्सवर काम सुरू होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींना नव्या संधी मिळतील. आज तुम्ही विचार केलेलं कोणतंही काम पूर्ण होईल. तुम्ही महत्त्वाच्या व्यक्तींना भेटू शकाल. लकी नंबर : 2 लकी कलर : Blue उपाय : पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. धनू (Sagittarius) : आजचा दिवस संमिश्र आहे. चालू असलेल्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा. तुमच्या क्षेत्रात प्रभाव तयार करण्यासाठी संधी मिळतील. विरोध झाला तरी जिद्दीने केलेलं काम सिद्ध होईल. तुमच्या आत्मविश्वासाची पातळीही बऱ्यापैकी वाढेल. प्रोफेशनल फिल्डमध्ये तुम्ही तुमचे वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचं लक्ष वेधून घ्याल. लकी नंबर : 10 लकी कलर : White उपाय : लाल गायीला गूळ खाऊ घाला. मकर (Capricorn) : आज तुमचा सरकारतर्फे सत्कार होण्याची शक्यता आहे. कोणतीही व्यक्ती, बँक किंवा संस्थेकडून तुम्ही कर्ज घेऊ इच्छित असलात, तर घेऊ नका. आज घेतलेल्या कर्जाची परतफेड मुश्कील होईल. जुन्या मित्रांना सपोर्ट मिळेल आणि चांगल्या मित्रांची संख्या वाढेल. लकी नंबर : 10 लकी कलर : Golden उपाय : सरस्वती देवीला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करा. कुंभ (Aquarius) : आज खूप बिझी असाल. खूप धावपळ करताना सावधगिरी बाळगा. तुमच्या निर्णयक्षमतेचा आज तुम्हाला लाभ मिळेल. प्रलंबित कामं आज पूर्ण होऊ शकतील. एखाद्या कामात गुंतवणूक करायची असली, तर ती उघडपणे करा. त्याचा भविष्यात पूर्ण लाभ मिळेल. आर्थिक समस्या सोडवल्या जातील. लकी नंबर : 3 लकी कलर : Sky Blue उपाय : रामाच्या मंदिरात ध्वज अर्पण करा. मीन (Pisces) : बिझनेस पार्टनर किंवा जवळच्या सहकाऱ्याच्या बाबतीत काही समस्या उद्भवतील. बिझनेसशी संबंधित ट्रिप्समधून अपेक्षित परिणाम साध्य होणार नाहीत. कामाच्या नव्या ठिकाणी जॉइन होण्यासाठी किंवा नवे प्रोजेक्ट्स/व्हेंचर्स सुरू करण्यासाठी आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. रूटीन कामांतून पैसे मिळवता येतील. कर्ज घेण्यासाठी तुम्ही तुमची मानसिकता तयार कराल. लकी नंबर : 1 लकी कलर : Yellow उपाय : श्री हनुमान मंदिरात तुपाचा दिवा लावा.
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya

पुढील बातम्या