मुंबई 16 ऑगस्ट: देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्यानं सरकारनं ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi ka Amrut Mahotsav) हा उपक्रम सुरू केला आहे. या स्वातंत्र्याच्या महोत्सवात सहभागी होण्यासाठी देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेनं (State Bank of India) विविध कर्जांसह(Loans) ठेवींवर (Deposits) एक खास ऑफर जाहीर केली आहे. याशिवाय स्टेट बँकेनं अनेक खास योजनाही जाहीर केल्या आहेत. ही विशेष ऑफर 14 सप्टेंबर 2021पर्यंत सुरू राहणार आहे.
स्टेट बँकेनं गृह कर्ज, वाहन कर्ज, सोने तारणकर्ज, वैयक्तिक कर्ज तसंच कोरोना योद्ध्यांसाठी व्याजदरात सवलत दिली आहे. गृह कर्जासह वाहन कर्जावरही प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ केलं आहे. तसंच ठेवींवरही अधिक व्याजदर दिला आहे. बँकेनं वाहन कर्जावर 90 टक्के ऑन रोड फायनान्सिंगची सुविधा जाहीर केली आहे. त्यामुळं घर आणि वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही अगदी उत्तम संधी आहे. बँकेच्या योनो अॅपच्या सहाय्याने कर्जासाठी अर्ज करणाऱ्या लोकांना व्याजदरात पाव टक्का (0.25 टक्के) अधिक सवलत मिळणार आहे. यामुळे योनो अॅपवरून वाहन कर्ज घेणाऱ्या लोकांना 7.5 टक्के दराने अर्ज मिळेल. टीव्ही 9 हिंदीने हे वृत्त दिलं आहे.
आता कर्मचाऱ्यांना वर्षाला मिळणार 300 रजा? मोदी सरकारकडून या नियमांत बदल होण्याची शक्यता
सोने तारण कर्ज योजना : स्टेट बँकेनं सोने तारण कर्ज (Gold Loan) घेणाऱ्या ग्राहकांना व्याजदरात 0.75 टक्के म्हणजेच पाउण टक्के सवलत दिली आहे. योनो अॅपवरून (YONO app) या कर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना प्रक्रिया शुल्क माफ करण्यात आलं आहे.
वैयक्तिक आणि पेन्शनवरील कर्जावर सवलत : वैयक्तिक आणि पेन्शनवर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी बँकेनं विशेष ऑफर दिली आहे. कोणत्याही माध्यमातून वैयक्तिक (Personal loan) किंवा पेन्शनवर कर्ज (Loan on Pension) घेणाऱ्या ग्राहकांना प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आलं आहे.
भाडेकरुकडून तुमची फसवणूक तर होत नाही ना? घरबसल्या असं तपासा
कोरोना योद्ध्यांना विशेष सवलत : सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात अखंड कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांसाठी (Corona Warriors) बँकेनं कर्जाच्या व्याजदरात खास सवलत दिली आहे. बँकेनं आरोग्य कर्मचारी आणि आघाडीचे कर्मचारी यांना कर्जाच्या व्याजदरात अर्धा टक्का सूट दिली आहे. लवकरच वाहन आणि सोनेतारण कर्जावरही ही सवलत लागू होईल, असंही बँकेनं म्हटलं आहे.
ठेवींवर अधिक व्याजदर : केवळ कर्जदारांसाठीच नाही तर ठेवीदारांसाठीही बँकेनं प्लॅटीनम टर्म डिपॉझिटस (Platinum Term Deposits) ही आकर्षक ऑफर दाखल केली आहे. बँकेनं काही ठराविक ठेवींवर अधिक व्याजदराची ऑफर दिली आहे. 75 दिवस, 75 आठवडे आणि 75 महिने मुदतीच्या ठेवीवर जास्तीच्या 0.15 टक्के अधिक व्याज दर जाहीर केला आहे. 15 ऑगस्ट पासून 14 सप्टेंबरपर्यंतच ही ऑफर लागू आहे. 2 कोटी आणि त्यापेक्षा कमी रकमेच्या नवीन ठेवीकरता किंवा रिन्यू करण्यात येणाऱ्या ठेवींसाठी ही ऑफर देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instant loans, SBI, Sbi home loan, State bank of india