नवी दिल्ली, 05 एप्रिल: सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत आणि ऑनलाइन खरेदीचं प्रमाण भारतात खूप वाढलं आहे. कोरोनामुळे घराबाहेर पडता येत नसल्याने तर ऑनलाइन खरेदीला प्रचंड वाव मिळाला आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या सारख्या ई-कॉमर्स वेबसाइट्स अनेक शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित करतात. तसंच फेस्टिव्हल सरकारी बँकाही करतात. भारतीय स्टेट बँकेने (State Bank of India) 4 ते 7 एप्रिलदरम्यान योनो शॉपिंग कार्निव्हल (YONO shopping carnival) आयोजित केला आहे. यामध्ये ग्राहकांना योनो प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून खरेदी केल्यास सूट आणि कॅशबॅक अशा दोन्ही सवलती मिळणार आहेत.
बँकेच्या या ऑफरला योनो सुपर सेव्हिंग डेज (YONO Super Saving Days) हे नाव देण्यात आलं आहे. भारतीय स्टेट बँकेने (SBI) सांगितलं की मार्च, 2021 मध्ये आयोजित केलेल्या शॉपिंग कार्निव्हलच्या दुसऱ्या भागाला ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला त्यामुळेच एप्रिल महिन्यात तिसरा कार्निव्हल घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(हे वाचा-Gold Price Today: 11000 रुपयांनी स्वस्त झाली सोनेखरेदी, वाचा घसरणीनंतरचा भाव)
मार्चच्या कार्निव्हलमध्ये वाढली ट्रान्झॅक्शन्स
4 मार्च ते 7 मार्च 2021 योनो कार्निव्हल झाला होता आणि त्यात व्यवहरांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळेच या महिन्यात पुन्हा कार्निव्हल आयोजित करण्याचं बँकेनी ठरवलं. यूपीआय पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना बँक वेगळ्या ऑफर्स देतं. जर तुम्ही योनो एसबीआय अपवरून यूपीआय (UPI) पर्यायाच्या माध्यमातून तर तुम्हाला यूपीआय करो रिवॉर्ड जीतो या योजनेअंतर्गत कॅशबॅक मिळते.
50 टक्के सूट
या सेलमध्ये ग्राहक काही निवडक सेवांच्या खरेदीवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकतात. अमेझॉन, अपोलो 24 x7, इझीमायट्रिप, ओयो आणि @होम सारख्या मोठ्या कंपन्यांशी बँकेने करार केला असून त्यांच्या सेवा घेताना ग्राहकांना 50 टक्के सूट मिळू शकते.
(हे वाचा-या सरकारी बँकेचं डेबिट कार्ड वापरत असाल तर करा हे काम, महत्त्वाची सेवा होईल बंद)
कोणत्या कॅटेगरीमध्ये मिळेल सूट
आरोग्य, हॉटेल बुकिंग, फ्लाइट बुकिंग अशा सुविधांवर ही सूट उपलब्ध आहे. अमेझॉनवर विशेष कॅटेगरीतून तुम्ही खरेदी केलीत तर 10 अधिक कॅशबॅक तुम्हाला मिळू शकते.
देशातील 3.6 कोटी ग्राहक योनो कार्निव्हलचा फायदा घेऊ शकतात. https://sbiyono.sbi/index.html या लिंकवरून हे अप डाउनलोड करता येईल. या कार्निव्हलमध्ये हजारो वस्तु ऑनलाइन उपलब्ध आहेत त्यामुळे तुमच्या रोजच्या वापरातील वस्तुंपासून मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वस्तुही इथं उपलब्ध आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: SBI, Sbi account, Sbi ATM, SBI bank