Home /News /money /

Gold Price Today: आतापर्यंत 11000 रुपयांनी स्वस्त झाली सोनेखरेदी, वाचा घसरणीनंतर आजचा भाव

Gold Price Today: आतापर्यंत 11000 रुपयांनी स्वस्त झाली सोनेखरेदी, वाचा घसरणीनंतर आजचा भाव

Gold Price Today: सोन्याचांदीच्या दरात आज देखील घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान आज देखील सोन्याचा दर सर्वोच्च स्तरावरून 11000 रुपयांनी कमी आहे. एमसीएक्सवर सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी घसरून 45,355 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 05 एप्रिल: आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे आणि चांदीचे भाव उतरल्यानंतर (Gold Price Today)भारतातही सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांकडे स्वस्तात सोनेखरेदीची सुवर्णसंधी आहे.  एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange MCX) सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी घसरून 45,355 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे. तर चांदीचा भाव (Silver Price Today) 65,070 रुपये प्रति किलो आहे. दरम्यान सध्याचे सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरावरील किंमतीपेक्षा 11000 रुपयांनी कमी आहेत. ऑगस्टमध्ये भारतात सोन्याचे भाव 56,200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. ऑगस्ट 2020 पासून आतापर्यंत सोन्याच्या दरात 11000 रुपयांची घसरण झाली आहे. दरम्यान यावर्षी गेल्या तीन महिन्यात सोन्याचे दर 5000 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव (Gold Price in International Market) आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव आज कमी झाले आहेत. अमेरिकेत सोन्याचे दर 4.04 डॉलरच्या घसरणीनंतर 1,724.95 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. चांदीचे भाव 0.09 डॉलरच्या घसरणीनंतर 24.89 डॉलरच्या स्तरावर आहेत. काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव आज देशातील राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव  48460 रुपये आहे. याशिवाय मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 44920 रुपये आहे. तर चेन्नई आणि कोलकातामध्ये या शुद्धतेच्या सोन्याचा दर अनुक्रमे 46680 रुपये आणि 47480 रुपये प्रति तोळा आहे. (हे वाचा-ATM मधून कॅश काढताना फाटलेल्या नोटा आल्यास काय कराल;जाणून घ्या महत्त्वाची माहिती) काय आहे तज्ज्ञांचं मत? भारतात लग्नसराईच्या काळात सोन्याचांदीच्या दागिन्यांची खरेदी वाढल्यामुळे सोन्याचांदीच्या किंमतीना समर्थन मिळेल. त्यामुळे जर सध्याच्या सोन्याच्या किंमतीमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुमच्या फायद्याचं ठरेल. आता गुंतवणूक केल्यास तुम्हाला दीर्घकालीन फायदा मिळेल. कारण तज्ज्ञांच्या मते भविष्यात सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. असा अंदाज आहे की सोन्याचे दर यावर्षी 63,000 रुपये प्रति तोळावर पोहचू शकतात. जर असे झाले तर गुंतवणुकदारांना मोठा फायदा होईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold bond

    पुढील बातम्या