Home /News /money /

या सरकारी बँकेचं डेबिट कार्ड वापरत असाल तर पूर्ण करा हे काम, अन्यथा काहीच दिवसात बंद होईल महत्त्वाची सेवा

या सरकारी बँकेचं डेबिट कार्ड वापरत असाल तर पूर्ण करा हे काम, अन्यथा काहीच दिवसात बंद होईल महत्त्वाची सेवा

कॉन्टॅक्टलेस डेबिट, क्रेडीट कार्ड म्हणजे काय? ‘रूपे’द्वारे (Rupay)जारी करण्यात आलेल्या डेबिट, क्रेडीट कार्डद्वारे विशिष्ट मर्यादेपर्यंत कार्ड स्वाईप न करता, पिन क्रमांक न टाकता, पेमेंट करता येते. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (National Common Mobility Card)म्हणूनही याचा उपयोग करता येतो. मेट्रोच्या स्मार्ट कार्डप्रमाणे याचा वापर करून ग्राहक प्रवासही करू शकतात. आता देशातील सर्व बँका रूपेची नवीन डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करतील त्यामध्ये नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (National Common Mobility Card) हे फिचर अंतर्भूत असेल. इतर कोणत्याही वॉलेट सारखे हे काम करेल.

बँक ऑफ इंडिया (Bank of India) च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या बँकेचं डेबिट कार्ड तुम्ही वापरत असाल Card Shield Application अपडेट करणं अनिवार्य असेल.

  नवी दिल्ली, 04 मार्च: जर तुम्ही बँक ऑफ इंडिया (Bank of India) चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या बँकेचे डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की 21 एप्रिलपासून BOI चे कार्ड शिल्ड अॅप्लिकेशन (Card Shield Application) डेबिट कार्डसाठी काम नाही करणार. त्यामुळे याआधीच तुम्ही App अपडेट करणं आवश्यक आहे.  21 एप्रिलपासून Card Shield App उपलब्ध होणार नाही. बँकेने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. BOI ने काय केले ट्वीट? बँकेच्या मते, बँक ग्राहकांना डेबिट कार्डवर मॉनिटिअरिंग आणि कंट्रोलची सुविधा मिळते. बँकेने आता ही सुविधा BOI मोबाइल अॅप आणि इंटरनेट बँकिंगसह इंटिग्रेट केली आहे. त्यामुळे ग्राहकांनी आता मोबाइल अॅपचा वापर करावा. बँकेने ट्वीट करत असे लिहिले आहे की, 'डेबिट कार्डसाठी कार्ड शील्ड अॅप्लिकेशनच्या समाप्तीची सूचना. मोबाइल बँकिंग अॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक: प्लेस्टोर: http://bit.ly/BO Appstore: http://bit.ly/BOIMB काय आहे BOI कार्ड शिल्डचा फायदा? कार्ड शिल्डद्वारे, युजर्स त्यांच्या कार्डवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहेत. यामुळे युजर्सना डेबिट कार्ड कधी, कुठे, कसे आणि किती वापरावे हे त्यांना समजते. जर एखाद्या ग्राहकांचे कार्ड हरवले तर या बँकेच्या अ‍ॅपच्या सहाय्याने कार्ड बंद केले जाऊ शकते. ऑनलाइन व्यवहारांबाबत ग्राहकांना सूचना मिळतील. या कार्डाची मर्यादा देखील निश्चित केली जाऊ शकते. कार्ड शिल्ड अंतर्गत Transactions Near You ची सुविधा देखील मिळेल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Bank, Money

  पुढील बातम्या