Ration Card आहे महत्त्वाचा दस्तावेज, वाचा कशाप्रकारे बनवाल नवीन कार्ड?

महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी रेशन कार्ड (Ration Card) एक आहे. यामधय्ये तुमच्या कुटुंबाची माहिती असते. अनेक कुटुंबीयांना रेशन मिळवण्यासाठी हे कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे.

महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी रेशन कार्ड (Ration Card) एक आहे. यामधय्ये तुमच्या कुटुंबाची माहिती असते. अनेक कुटुंबीयांना रेशन मिळवण्यासाठी हे कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 22 जुलै: महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी रेशन कार्ड (Ration Card) एक आहे. यामधय्ये तुमच्या कुटुंबाची माहिती असते. अनेक कुटुंबीयांना रेशन मिळवण्यासाठी हे कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. रेशन कार्ड दोन पद्धतीची असतात. तुम्ही अद्याप रेशन कार्ड बनवलं नसेल आणि भविष्यात हा दस्तावेज बनवायचा असेल तर त्याआधी जाणून घ्या कशाप्रकारे हे काम पूर्ण करता येईल? कशाप्रकारे कराल अर्ज? 1. रेशन कार्डासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या रेशन कार्ड कार्यालयात जाऊ शकता. त्याठिकाणी तुम्हाला याकरता फॉर्म भरता येईल. शिवाय अन्न पुरवठा व ग्राहक विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करू शकता. 2. महाराष्ट्राच्या  अन्न पुरवठा व ग्राहक विभागाच्या अधिकृत बसाइटवरून अर्ज डाउनलोड करता येईल. 3. रेशन कार्ड दोन प्रकारची असतात. एक दारिद्र्य रेषेखालील आणि दुसरं दारिद्र्य रेषेवरील. तुम्ही ज्या श्रेणीमध्ये येता त्याआधारे रेशन कार्ड बनवा.  https://nfsa.gov.in/portal/apply_ration_card या वेबसाइटवर जाऊन तुम्ही रेशन कार्ड बनवू शकता. हे वाचा-EPFO Update: कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा लाभ, वाचा काय आहे ही महत्त्वाची योजना 4. रेशन कार्डासाठीच्या फॉर्मवर आवश्यक माहिती भरा, याठिाकणी चुकीची माहिती भरू नका. त्यानंतर आवश्यक कागदपत्र फॉर्मला जोडा 5.त्यानंतर आवश्यक अर्ज शुल्क निवडा. जर तुम्ही बीपीएल/ एएई कार्डसाठी अर्ज केला आहे तर तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र देखील द्यावं लागेल 6. हा अर्ज जवळच्या कार्यालयात जमा करा आणि पंधरा दिवसात तुम्हाला रेशन कार्ड मिळून जाईल 7. भारताचे नागरिक रेशन कार्ड बनवू शकतात. 8. ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, कर्मचारी ओळख पत्र, वोटर आयडी कार्ड इ. कागदपत्रंच्या मदतीने तुम्ही रेशन कार्ड बनवू शकता हे वाचा-तिरुपती बालाजी मंदिरास व्यावसायिकाची खास भेट,1 कोटींची सोन्याची तलवार केली अर्पण वन नेशन, वन रेशन कार्ड योजना लागू वारंवार स्थलांतर करणारे मजूर, तसंच हातावर पोट असलेल्या नागरिकांची सोय लक्षात घेऊन वन नेशन, वन रेशन कार्ड (One Nation One Ration Card) ही योजना केंद्र सरकारने सुरू केली. डिसेंबर 2020पर्यंत ही योजना 32 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात आली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: