SBI ने सुरू केली खास सेवा! ATM मधून कितीही वेळा पैसे काढले तरी नाही द्यावं लागणार शुल्क

SBI ने सुरू केली खास सेवा! ATM मधून कितीही वेळा पैसे काढले तरी नाही द्यावं लागणार शुल्क

स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक (SBI) एटीएममधून कार्ड न वापरता योनो (YONO) सुविधेच्या माध्यमातून विनाशुल्क पैसे काढू शकतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जुलै : बँकेतून पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर आजही सर्वाधिक प्रमाणात होतो. मात्र अद्याप अनेक ग्राहकांना हे माहित नाही आहे की, एटीएममधून पैसे काढण्यासाठीची (ATM Transactions) संख्या  मर्यादित करण्यात आली आहे. जर ग्राहकांनी निश्चित मर्यादेपेक्षा अधिक वेळा पैसे काढले तर त्यांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना या शुल्कापासून वाचण्यासाठी एक पर्याय सूचवला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक (SBI) एटीएममधून कार्ड न वापरता योनो (YONO) सुविधेच्या माध्यमातून देखील पैसे काढू शकतात. याकरता एटीएम व्यवहाराचे कोणतेही शुल्क त्यांना द्यावे लागणार नाही.

YONO अ‍ॅपमधून कसे काढाल पैसे?

-SBI योनो अ‍ॅपमधून पैसे काढण्यासाठी सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये योनो अ‍ॅप डाऊनलोड करून घ्या

-किंवा तुम्ही https://www.sbiyono.sbi/ याठिकाणी जाऊनही लॉग इन करू शकता.

-त्यानंतर नेटबँकिंग युजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल. अ‍ॅक्टिव्ह युजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर पुन्हा एकदा लॉग इनवर क्लिक करा

(हे वाचा-IT क्षेत्रात काम करण्याऱ्यांसाठी मोठी बातमी! 'या' तारखेपर्यंत Work From Home)

-यानंतर तुम्हाला एसबीआय योनो डॅशबोर्ड दिसेल, याठिकाणी तुम्हाला तुमच्या खात्याची सर्व माहिती मिळेल. आता कार्डशिवाय पैसे काढण्यासाठी खाली असणाऱ्या 'माय रिवॉर्ड्स' सेक्शनमध्ये स्क्रोल करा. याठिकाणी YONO Pay, YONO Cash, Bill Pay, Products, Shop, Book & Order यांसारखे पर्याय दिसतील.

- या पर्यायांपैकी  YONO Cash वर क्लिक करा

- याठिकाणी तुम्हाला रोजच्या व्यवहारांची माहिती मिळेल. तुम्ही एका ट्रान्झाक्शनमध्ये 500 ते 10000 रुपयांची रक्कम काढू शकता. योनो वेबसाइटच्या माध्यमातून एसबीआय एटीएममधून तुम्ही जास्तीत जास्त 20000 हजार रुपये काढू शकता.

(हे वाचा-नोकऱ्यांचे अपडेट देणाऱ्या कंपनीवर 'नोकरकपाती'चं संकट,960 कर्मचारी होणार बेरोजगार)

-रिक्वेस्ट योनो कॅशवर क्लिक केल्यानंतर तुमच्या बचत खात्यातील शिल्लक रक्कम तुम्हाला दिसेल. त्याखाली असणाऱ्या टॅबमध्ये तुम्हाला atm मधून जी रक्कम काढायची आहे ती टाका त्यानंतर 'NEXT'वर क्लिक करा

-त्यानंतर 6 अंकांचा योनो कॅश पिन टाकावा लागेल आणि योनो वेबसाइटच्या माध्यमातून पैसे काढण्याची प्रक्रिया सुरू करता येईल

-कार्ड न वापरता तसंच किंवा योनो App शिवाय देखील हा व्यवहार करता येईल. या व्यवहारासाठी 6 अंकांचा योनो कॅश पिन टाकावा लागेल आणि योनो वेबसाइटच्या माध्यमातून पैसे काढण्याची प्रक्रिया सुरू करता येईल

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 22, 2020, 12:25 PM IST

ताज्या बातम्या