जाहिरात
मराठी बातम्या / मनी / नोकऱ्यांबाबत अपडेट देणाऱ्या कंपनीवरच 'नोकरकपाती'चं संकट, 960 कर्मचारी होणार बेरोजगार

नोकऱ्यांबाबत अपडेट देणाऱ्या कंपनीवरच 'नोकरकपाती'चं संकट, 960 कर्मचारी होणार बेरोजगार

नोकऱ्यांबाबत अपडेट देणाऱ्या कंपनीवरच 'नोकरकपाती'चं संकट, 960 कर्मचारी होणार बेरोजगार

मायक्रोसॉफ्ट कॉर्प. (Microsoft Corp’s)ची प्रोफेशनल नेटवर्किंग साइट असणाऱ्या लिंक्डइन (LinkedIn) ने त्यांच्या 960 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 जुलै : मायक्रोसॉफ्ट कॉर्प. (Microsoft Corp’s)ची प्रोफेशनल नेटवर्किंग साइट असणाऱ्या लिंक्डइन (LinkedIn) ने त्यांच्या 960 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने मंगळवारी अशी माहिती दिली की, कंपनीरडून जगभरातील त्यांच्या 6 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्यात येणार आहे. कंपनीने अशी माहिती दिली आहे की, जगभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे रिक्रूटमेंट प्रोडक्ट्सची मागणी कमी झाली आहे. एखाद्या कंपनीस योग्य उमेदवाराची आणि एखाद्या व्यक्तीस त्याच्या क्षमतेनुसार नोकरी संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी LinkedIn या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. कंपनीचे असे म्हणणे आहे की सेल्स आणि हायरिंग डिव्हिजनमधील कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. (हे वाचा- चीनला झटका! ‘या’ भारतीय इंडस्ट्रीने रद्द केल्या ऑर्डर्स,होणार कोट्यवधींचं नुकसान ) कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. लिंक्डइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी Ryan Roslansky यांनी अशी माहिती दिली आहे की, कामावरून कमी करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना 10 आठवड्यांचा पगार देण्यात येईल. त्याचप्रमाणे अमेरिकेत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना या वर्षाअखेर पर्यंत आरोग्य विम्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कंपनीकडून असे आश्वासन देण्यात आले आहे की, भविष्यात नवीन नोकऱ्यांची संधी निर्माण झाल्यास, या कर्मचाऱ्यांचा प्राथमिक स्तरावर विचार केला जाईल. (हे वाचा- पैसे सुरक्षित ठेवायचे आहेत तर ऐका SBI चा हा सल्ला, अन्यथा होईल खाते रिकामे ) रॉसलान्सकी यांनी पुढे अशी माहिती दिली की, आम्ही केवळे एवढीच नोकरकपात करत आहोत. या कर्मचाऱ्यांना अद्याप सांगण्यात आले नाही आहे, मात्र त्यांना कंपनीकडून जारी करण्यात आलेले फोन्स, लॅपटॉप आणि नवीन खरेदी केलेली उपकरणं स्वत:कडे ठेवण्याची परवानगी देण्यात येईल. जेणेकरून करिअरमध्ये बदल करताना त्यांना वर्क फ्रॉम होम करतेवेळी मदत होईल. लॉकडाऊनमुळे लिंक्डइनच्या व्यवसायावर मोठा परिणाम त्यांनी अशी माहिती दिली की, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात लिंक्डइनचा खूप कमी वापर करण्यात आला. ज्यामुळे कंपनीचा खूप व्यवहार प्रभावित झाला आहे. त्यामुळे कंपनी या काळात नवीन नोकरी देऊ शकत नाही आहे आणि परिणीमी नोकरकपात करत आहेत. त्यामुळे लिंक्डइनच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. ज्या कंपन्यांवर या  कपातीमुळे परिणाम होणार आहे,त्यांना या आठवड्यात सूचित करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात