नवी दिल्ली, 22 जुलै : आयटी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टेलीकॉम डिपार्टमेंट (Telecom department) ने आयटी आणि आटीईएस इंडस्ट्रीला यावर्षी डिसेंबरपर्यंत घरातून काम अर्थात वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा दिली आहे. सरकारने (Government of India) ने कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना जुलैपर्यंत घरून काम करण्याची परवानगी दिली होती. त्यामध्ये आता डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दूरसंचार विभागाने मंगळवारी रात्री ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. DoT ने अशी माहिती दिली आहे की, सध्या 85 टक्के आयटी कर्मचारी घरूनच काम करत आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण काम असणारे कर्मचारीच ऑफिसमध्ये येत आहेत.
कोरोना व्हायरस बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने ही सूट 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आयटी इंडस्ट्रीमध्ये आनंद व्यक्त केला जात आहेत.
वाचा-नोकऱ्यांचे अपडेट देणाऱ्या कंपनीवर 'नोकरकपाती'चं संकट,960 कर्मचारी होणार बेरोजगार
देशातील दिग्गज कंपनी विप्रोचे चेअरमन रिशद प्रेमजी यांनी असे ट्वीट केले आहे की, 'सरकारच्या उत्तर सहकार्यासाठी धन्यवाद. पहिल्या दिवसापासूनच सरकारने कामाच्या नवीन पद्धती वापरल्या आहेत. यामुळे जगभरात आमचा रिस्पॉन्सिव्हनेस वाढण्यास खूप मदत होईल.'
DoT has further extended the relaxations in the Terms and Conditions for Other Service Providers (OSPs) upto 31st December 2020 to facilitate work from home in view of the on going concern due to #COVID19.
— DoT India (@DoT_India) July 21, 2020
वाचा-पैसे सुरक्षित ठेवायचे आहेत तर ऐका SBI चा हा सल्ला, अन्यथा होईल खाते रिकामे
एप्रिलमध्ये 90 टक्के कर्मचाऱ्यांनी केले घरून काम
नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज (NASSCOM) मध्ये एप्रिलमध्ये जारी केलेल्या आकड्यानुसार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, विप्रो लिमिटेड आणि इंफोसिस लिमिटेड याप्रमाणेच काही महत्त्वाच्या आयटी कंपन्यानी त्यांच्या 90 टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याती सुविधा दिली होती. नॅसकॉमचे अध्यक्ष देबजानी घोष यांनी डिओटी आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांचे आभार मानले आहेत.
वाचा-1,41,66,26,55,00,000! Amazon संस्थापकांच्या संपत्तीचा आकडा मोजताना होईल दमछाक
भविष्यात देखील लागू होऊ शकते हे मॉडेल
त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, यामुळे कर्मचाऱ्याची सुरक्षितता निश्चित होईल आणि टियर टू-थ्री शहरात सेक्टरची प्रतीभा वाढेल. घरातून काम करण्याची पद्धती कोरोना पँडेमिक संपल्यावर देखील सुरु राहण्याची शक्यता आहे कारण अनेक कंपन्या याकडे प्रभावी मॉडेल म्हणून पाहत आहेत. या मॉडेलमुळे ऑफिससाठी कमी जागेची आवश्यकता आहे.
संपादन- जान्हवी भाटकर