मराठी बातम्या /बातम्या /मनी /कशाप्रकारे सुरक्षित ठेवाल ATM आणि पिन? SBI ने कोट्यवधी ग्राहकांना दिली महत्त्वाची माहिती

कशाप्रकारे सुरक्षित ठेवाल ATM आणि पिन? SBI ने कोट्यवधी ग्राहकांना दिली महत्त्वाची माहिती

सध्या फसवणुकींचे वाढणारे प्रमाण लक्षात घेता स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना पैसे सुरक्षित ठेवण्याच्या काही पद्धती सुचवल्या आहेत.

सध्या फसवणुकींचे वाढणारे प्रमाण लक्षात घेता स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना पैसे सुरक्षित ठेवण्याच्या काही पद्धती सुचवल्या आहेत.

सध्या फसवणुकींचे वाढणारे प्रमाण लक्षात घेता स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना पैसे सुरक्षित ठेवण्याच्या काही पद्धती सुचवल्या आहेत.

नवी दिल्ली, 08 जानेवारी: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) त्यांच्या ग्राहकांसाठी बँकिंग फ्रॉडपासून वाचण्यासाठी अलर्ट जारी करत असते. बँकेने ग्राहकांना अशी सूचना दिली आहे की एटीएमच्या माध्यमातून कोणताही व्यवहार करताना पूर्णपणे गोपनीयता बाळगणे गरजेचे आहे. जेणेकरून फसवणूक टाळली जाऊ शकते. एटीएमधून (ATM) पैसे काढणे जरी सोपे असले तरी सध्या यासंदर्भातील अनेक फसवणुकींची प्रकरणं समोर येत आहेत. अशावेळी डेबिट कार्ड किंवा एटीएम कार्डचा सुरक्षित वापर करणे आणि एटीएम ट्रान्झॅक्शन करताना सावधानी बाळगणे आवश्यक आहे. स्टेट बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी याबाबात काही टिप्स जारी केल्या आहेत.

एसबीआयने बँकेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून महत्त्वाची माहिती दिली आहे-

-एटीएम-डेबिट कार्ड संदर्भातील फसवणुकीपासून वाचण्यासाठी पूर्णपणे गोपनीयता वापरुन ATM व्यवहार करायला हवे

-एटीएम किंवा POS मशिनवर एटीएम कार्डचा वापर करताना कीपॅड तुमच्या हाताने कव्हर करा

-तुमचा पिन आणि कार्ड डिटेल्स कुणाबरोबरही शेअर करू नका

(हे वाचा-या बँकेने वाढवले बचत खात्यावर मिळणारे व्याज, याठिकाणी ऑनलाइन कसं उघडाल खातं?)

-तुमच्या कार्डावर कधीही तुमचा पिन लिहू नका. ज्या फोन कॉल्स किंवा मेसेजवर तुमचे कार्ड डिटेल्स किंवा पिन विचारतील त्यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर देऊ नका

-तुमचा सध्याचा मोबाइल क्रमांक बँकेमध्ये रजिस्टर आहे हे सुनिश्चित करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्यवहारांचे अलर्ट मिळतील

-एटीएम/डेबिट कार्ड हरवल्यानंतर किंवा चोरीस गेल्यास त्वरित बँकेला याची माहिती द्या. जर एखादा अनधिकृत व्यवहार तुमच्या निदर्शनास आला तरी देखील रिपोर्ट करा

(हे वाचा-Gold Price Today: सोन्यामध्ये मोठी घसरण होऊन देखील दर 50 हजारांपेक्षा जास्त)

-व्यवहारासंदर्भात मेसेजवर येणारे अलर्ट आणि बँक स्टेटमेंट वारंवार तपासा

-तुमच्या वाढदिवसाची तारीख, फोन क्रमांक किंवा खाते क्रमांक PIN म्हणून वापरू नका

-ट्रान्झॅक्शन केलेली पावती डिस्पोज करा किंवा सुरक्षित ठेवा

-ट्रान्झॅक्शन सुरू करण्यापूर्वी एटीएममध्ये एखादा स्पाय कॅमेरा नाही ना याची खात्री करून घ्या

First published:

Tags: SBI, Sbi account, Sbi ATM