जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: सोन्यामध्ये मोठी घसरण होऊन देखील दर 50 हजारांपेक्षा जास्त, चांदीही उतरली

Gold Price Today: सोन्यामध्ये मोठी घसरण होऊन देखील दर 50 हजारांपेक्षा जास्त, चांदीही उतरली

Gold Price Today: सोन्यामध्ये मोठी घसरण होऊन देखील दर 50 हजारांपेक्षा जास्त, चांदीही उतरली

Gold Silver Price, 7 January 2021: देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती आज कमी झाल्या आहेत. तर चांदीचे दरही किरकोळ कमी झाले आहेत. पण आजच्या घसरणीनंतर बुधवारी 70 हजारांवर गेलेले दर 70 हजारांपेक्षा कमी झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 07 जानेवारी: देशांतर्गत बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. असे असले तरीही सोन्याचे दर अद्याप 50 हजारांवरच आहेत. चांदीचे दर देखील गुरुवारी उतरले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात 07 जानेवारी 2021 रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) प्रति तोळा 714 रुपयांनी कमी झाले आहेत. गुरुवारी चांदीच्या दरात (Silver Price Today) आज 386 रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. याआधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 51,049 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत होते. तर चांदीचे दर 70,094 रुपये प्रति किग्रा होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर स्थीर आहेत. गुरुवारी काय आहेत सोन्याचे भाव? (Gold Price on 07th January 2021) दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोनं प्रति तोळा 714 रुपयांनी दराने कमी झालं आहे. असे असले तरी दर 50 हजारांपेक्षा कमी झाले नाही आहेत. या घसरणीनतंर 99.9  शुद्धतेच्या सोन्याची किंमत 50,335 रुपये प्रति तोळा झाली आहे. याआधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 51,049 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,916 डॉलर प्रति औंस आहेत. (हे वाचा- ग्राहकांना या बँकांकडून मोठं गिफ्ट! FD सोबत तुम्हाला मिळेल हेल्थ कव्हर ) गुरुवारी काय आहेत चांदीचे भाव (Silver Price on 07th January 2021) सोन्याप्रमाणेच चांदीमध्ये देखील गुरुवारी घसरण झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी चांदीच्या दरांत घसरण झाली आहे. 386 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. यानंतर चांदीचे दर प्रति किलो 69,708 रुपये झाले आहेत. याआधीच्या सत्रात चांदीचे भाव 70,094 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात  (International Market) चांदीचे भाव  27.07 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते. (हे वाचा- Petrol Diesel Price: कोलमडतंय सामान्यांचं बजेट, सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या दरात का कमी झाले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनिअर अनालिस्ट तपन पटेल (कमोडिटीज) यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत. त्याचप्रमाणे चांदीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात स्थीर राहुनही देशांतर्गत बाजारात त्यामध्ये घसरण झाली आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात