जाहिरात
मराठी बातम्या / मनी / या बँकेने वाढवले बचत खात्यावर मिळणारे व्याज, वाचा याठिकाणी ऑनलाइन कसं उघडाल खातं?

या बँकेने वाढवले बचत खात्यावर मिळणारे व्याज, वाचा याठिकाणी ऑनलाइन कसं उघडाल खातं?

या बँकेने वाढवले बचत खात्यावर मिळणारे व्याज, वाचा याठिकाणी ऑनलाइन कसं उघडाल खातं?

खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या IDFC First बँकेने नवीन वर्षात ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. बँकेने बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजामध्ये वाढ केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 07 जानेवारी: खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या IDFC First बँकेने नवीन वर्षात ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. बँकेने बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजामध्ये एका टक्क्याने वाढ केली आहे. सुरुवातीला तुमच्या खात्यामध्ये 1 लाखापर्यंतची रक्कम असेल तर 6 टक्के दराने व्याज  मिळत असे आता 1 जानेवारी 2021 पासून हा दर 7 टक्के करण्यात आला आहे. आयडीएफसी देत आहे दुप्पट व्याज याआधी ज्या ग्राहकांच्या बचत खात्यामध्ये 1 लाख रुपयांपेक्षा जास्त बॅलन्स आहे त्यांना 7 टक्के दराने व्याज मिळत असे. सध्या सरकारी बँकांमध्ये मिळणाऱ्या व्याजाचा तुलनेत आयडीएफसी बँकेत दुप्पट व्याज मिळते आहे. SBI, HDFC, ICICI आणि PNB यासारख्या मोठ्या सरकारी आणि खाजगी बँका बचत खात्यावर 3 ते 4 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. आयडीएफसी फर्स्ट बँक ग्राहकांना बचत खात्यावर 7 टक्के दराने व्याज देते आहे. कसे उघडाल ऑनलाइन बँक खाते? -या बँकेत खाते उघडण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइट https://www.idfcfirstbank.com/ वर जावे लागेल. - यानंतर तुम्हाला Saving Accounts- up to 7% p.a. या पर्यायावर क्लिक करावे लागेल -याठिकाणी ओपन झालेल्या पेजमध्ये तुम्हाला तुमचं नाव, मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी प्रविष्ट करावा लागेल, त्यानंतर Start Now वर क्लिक करा. (हे वाचा- PhonePe ने सुद्धा सुरू केली विमा योजना; 149 रुपयांपासूनचे प्लॅन्स ) -आता नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला आधार क्रमांक टाकून व्हेरिफिकेशन करावे लागेल. -याठिकाणी देण्यात आलेल्या अॅप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला आवश्यक सर्व माहिती भरावी लागेल. -यानंतर फॉर्म प्रीव्ह्यूचा पर्याय आहे. -तुम्ही खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता, जर झिरो बॅलन्सचा पर्याय निवडला असेल, तर कोणतीही रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. (हे वाचा- Petrol Diesel Price: कोलमडतंय सामान्यांचं बजेट, सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या दरात ) खातं उघडण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक? या बँकेत खातं उघडण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, 2 पासपोर्ट साइझ फोटो आणि बर्थ सर्टिफिकेट द्यावं लागेल. ही कागदपत्र देऊन अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बचत खाते उघडू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात