मुंबई, 14 जून : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या एसबीआयने (State Bank Of India) मुदत ठेवींवरील (Fixed Deposit) व्याजदरात 50 ते 75 बेस पॉईंट्सची वाढ केली आहे. ही वाढ बल्क टर्म डिपॉझिटसाठी आहे, तर रिटेल टर्म डिपॉझिटसाठी व्याजदर (SBI FD Interest rates) 15-20 बेसिस पॉइंट्सने वाढवण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने नुकतीच रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. अशा परिस्थितीत बँका केवळ कर्जासाठी व्याजदरच वाढवत नाहीत, तर तुमच्या जमा झालेल्या भांडवलावर अधिक परतावाही देत आहेत. SBI च्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, आता 2 कोटींपेक्षा कमी किरकोळ मुदत ठेवींसाठी किमान व्याज दर 2.90 टक्के आणि कमाल व्याज दर 5.50 टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांना व्याजदरामध्ये 50 बेसिस पॉइंट्सचा अतिरिक्त लाभ मिळेल. त्यांच्यासाठी किमान व्याज दर 3.40 टक्के आणि कमाल व्याज दर 6.30 टक्के आहे. टीव्ही 9 हिंदीने याबाबत वृत्त प्रसारित केलं आहे. देशातील महागाई आणखी वाढणार नाही, SBI च्या रिपोर्टमध्ये दावा; रेपो दर आणखी वाढण्याची शक्यता SBI च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 2 कोटींपेक्षा कमी किरकोळ देशांतर्गत मुदत ठेवींवर आजपासून व्याजदरात बदल करण्यात आला आहे. 7-45 दिवसांसाठी 2.90 टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे. 46-179 दिवसांसाठी 3.90 टक्के, 180-210 दिवसांसाठी 4.40 टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे. 211 दिवस ते 1 वर्षांसाठी व्याजदर 20 बेसिस अंकांनी 4.60 टक्के करण्यात आला आहे. 1-2 वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 20 बेसिस पाँईंट्सने 5.30 टक्के आणि 2-3 वर्षांच्या मुदत ठेवींसाठी 15 बेसिस पॉईंट्सनी 5.35 टक्के करण्यात आला आहे. 3-5 वर्षांसाठी 5.45 टक्के आणि 5-10 वर्षांसाठी 5.50 टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे. आता ई-वॉलेटच्या मदतीने ATM मधून काढा पैसे, डेबिट-क्रेडिट कार्डची गरज नाही बल्क डिपॉझिटसाठी व्याजदर 75 पॉईंट्सने वाढले 2 कोटींवरील देशांतर्गत बल्क टर्म डिपॉझिटसाठी व्याजदर 75 बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढवण्यात आला आहे. SBI च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 7-45 दिवसांच्या बल्क टर्म डिपॉझिट्सवरील व्याजदर 50 बेस पॉइंट्सने वाढवून 3.50 टक्के करण्यात आला आहे. 46-179 दिवसांसाठी 50 पॉईंट्सने , 180-210 दिवसांसाठी 75 पॉईंट्सने 4.25 टक्के, 1 वर्षासाठी 75 bps ने वाढून 211 दिवसांवरून 4.50 टक्के, 1-2 वर्षांसाठी दर 75 bps ने वाढवून 4.75 टक्के केले आहे. 2-3 वर्षांसाठी 4.25 टक्के, 3-5 वर्षांसाठी 4.50 टक्के आणि 5-10 वर्षांसाठी 4.50 टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 50 bps चा लाभ आता बल्क टर्म डिपॉझिटसाठी किमान व्याज दर 3.50 टक्के आणि कमाल व्याज दर 4.75 टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांना व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सचा अतिरिक्त लाभ मिळेल. त्यांच्यासाठी किमान व्याजदर 4 टक्के आणि कमाल व्याजदर 5.25 टक्के झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.