Home /News /money /

आता ई-वॉलेटच्या मदतीने ATM मधून काढा पैसे, डेबिट-क्रेडिट कार्डची गरज नाही

आता ई-वॉलेटच्या मदतीने ATM मधून काढा पैसे, डेबिट-क्रेडिट कार्डची गरज नाही

पेमेंट सोल्युशन्स प्रदाता Omnicard ने सांगितले की त्यांनी ई-वॉलेटद्वारे कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा सुरू केली आहे.

  मुंबई, 14 जून : तुम्हाला रोख (Cash) रक्कम हवी असेल तर तुम्ही एटीएममधून (ATM) डेबिट किंवा एटीएम कार्डद्वारे (Debit-Credit Card) पैसे काढू शकता. अनेक वेळा कार्ड घरी विसरल्यास आपली अडचण होते. अलीकडच्या काळात, UPI द्वारे डिजिटल आणि ऑनलाइन व्यवहार (Online Transaction) देशात खूप लोकप्रिय होत आहेत. मात्र, आज अनेकांचा रोख व्यवहारांवर अधिक विश्वास आहे. अशा लोकांना लक्षात घेऊन खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. आता कोणीही ई-वॉलेटद्वारे एटीएममधून पैसे काढू शकतो. पेमेंट सोल्यूशन प्रोव्हायडर OmniCard ने ई-वॉलेटद्वारे कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा सुरू केली आहे. ई-वॉलेटद्वारे आता तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता पेमेंट सोल्युशन्स प्रदाता Omnicard ने सांगितले की त्यांनी ई-वॉलेटद्वारे कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा सुरू केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून परवाना मिळवणारे ते पहिले PPI (प्रीपेड इन्स्ट्रुमेंट) बनले आहे. हे ग्राहकांना रुपे कार्डद्वारे एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देत आहे. Petrol Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरात वाढ, पेट्रोल-डिझेल खरेदीसाठी किती पैसे खर्च करावे लागणार?

  रुपे कार्ड किंवा UPI शी लिंक केलेले डिजिटल वॉलेट

  Omnicard सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पांडे म्हणाले की, ते वापरकर्त्यांना पर्यायी प्लॅटफॉर्म देत आहेत. यामध्ये ते आपली बँक खाती सुरक्षित ठेवू शकतात. यासोबतच वापरकर्ते रुपे कार्ड किंवा UPI शी लिंक केलेले डिजिटल वॉलेट वापरू शकतात. Omnicard हे मोबाइल अॅपसह RuPay सुविधांनी सज्ज प्रीपेड कार्ड आहे.

  PM Kisan योजनेचे पुढचे पैसे हवे असतील तर आधी 'हे' काम करुन घ्या; लवकरच येणार पुढचा हप्ता एटीएम फसवणुकीची कोणतीही घटना घडणार नाही Omnicard ग्राहक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही ATM मधून पैसे काढू शकतील, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. कार्ड चोरी किंवा कार्ड क्लोन होण्यासारख्या फसवणुकीचा धोकाही राहणार नाही. याशिवाय कार्ड हरवले तरी ई-वॉलेटमधून पैसे काढता येतात.
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: ATM, Money

  पुढील बातम्या