नवी दिल्ली, 10 जुलै: तुम्ही जर एसबीआयचे (SBI) चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्राच्या एका महत्त्वाच्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ बँक ग्राहकांना मिळवता येतो. मोदी सरकारची (Modi Government) अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे जन धन खातं (PM Jan Dhan Yojana). तुमचं देखील जन धन खातं SBI मध्ये असेल आणि तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) RuPay डेबिट कार्डचा वापर करत असाल तर तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती (Accidental Cover Benefit) विमा मिळेल.
योजनेसाठी कोण पात्र?
जन धन खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड अंतर्गत मिळणाऱ्या अपघातील विम्याचा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा युजरने दुर्घटनेच्या 90 दिवसांच्या कालावधीमध्ये त्याने बँकेअंतर्गत किंवा इंटर बँक दोन्ही चॅनेलवर आर्थिक किंवा गैरआर्थिक व्यवहार केला आहे. हा व्यवहार यशस्वी असणंही आवश्यक आहे. ही अट पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्र जमा केल्यावर विम्याच्या रकमेसाठी क्लेम करता येईल. या योजनेमध्ये भारताबाहेर झालेला अपघात देखील कव्हर होतो.
हे वाचा-Cairn Energy: या देशात भारतीय मालमत्ता जप्त? मोदी सरकारनं दिलं हे स्पष्टीकरण
खातं ट्रान्सफर करण्याचाही पर्याय
तुम्ही तुमचं बेसिक सेव्हिंग अकाउंट (Savings Account) देखील जन धन खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकता. ज्यांच्याकडे Jan Dhan Account आहे त्यांना RuPay PMJDY कार्ड देण्यात येते. तुम्ही SBI मध्ये 28 ऑगस्ट 2018 पूर्वी जन धन खाते उघडले असेल तर तुम्हाला जारी करण्यात आलेल्या RuPay PMJDY कार्डवर 1 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळेल तर 28 ऑगस्ट 2018 नंतर जारी करण्यात आलेल्या रुपे कार्डावर 2 लाखांपर्यंतचा अॅक्सीडेंट कव्हर बेनिफिट मिळेल.
विम्याची रक्कम मिळवण्यासाठी कागदपत्रं असणं आवश्यक
-इन्शुरन्स क्लेम फॉर्म
-मृत्यूच्या प्रमाणपत्राची मूळ कॉपी
-अपघाताचा तपशील देणारा प्राथमिक किंवा पोलिसांचा अहवाल, त्याची मूळ किंवा प्रमाणित कॉपी
-मृत्यू इतर कोणत्याही कारणामुळे झाल्यास रासायनिक विश्लेषण किंवा एफएसएल अहवालासह पोस्ट मॉर्टम अहवालाची मूळ किंवा प्रमाणित प्रत
-कार्डधारक आणि नॉमिनीच्या आधार कार्डाची मूळ कॉपी
हे वाचा-SBI Alert: 10-11 तारखेला कोट्यवधी ग्राहकांना मिळणार नाहीत महत्त्वाच्या सेवा
2014 मध्ये सुरू झाली होती योजना
पंतप्रधान जन धन योजना (PM Jan Dhan Scheme) 2014 मध्ये सुरू झाली होती. पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत अनेक गरजू लोकांनी खाती उघडली आहेत. आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्यांना आर्थिक सेवा, बचत खातं, क्रेडिट, विमा, पेन्शन यांसारख्या सेवांचा लाभ घेता यावा याकरता ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत कोणतीही व्यक्ती केवायसी प्रक्रिया पूर्ण करून ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन जन धन खातं उघडू शकतात. तुमच्या बचत खात्याचं रुपांतर देखील तुम्ही जन धन खात्यामध्ये करू शकता. यामध्ये बँकेकडून ग्राहकांना रुपे कार्ड दिलं जातं. हे डेबिट कार्ड अपघाती मृत्यू विमा, खरेदी संरक्षण कवच यासह अनेक फायद्यांसाठी वापरता येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pradhan mantri jan dhan yojana, SBI, Sbi account, SBI bank, SBI Bank News