• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • SBI Alert: 10-11 तारखेला कोट्यवधी ग्राहकांना मिळणार नाहीत महत्त्वाच्या सेवा, हे आहे कारण

SBI Alert: 10-11 तारखेला कोट्यवधी ग्राहकांना मिळणार नाहीत महत्त्वाच्या सेवा, हे आहे कारण

एसबीआयने (State Bank of India) ट्वीट करत ग्राहकांना अशी माहिती दिली आहे मेंटेनन्स करता बँकेच्या काही सेवा 10 आणि 11 तारखेला प्रभावित होणार आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 09 जुलै: तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक इंडियाचे (State Bank of India) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेच्या काही महत्त्वाच्या सेवा 10 आणि 11 तारखेला प्रभावित होणार आहेत. एसबीआयने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. अशावेळी तुम्हाला काही महत्त्वाचे व्यवहार करायचे असतील तर लवकरात लवकर हे व्यवहार पूर्ण करा. एसबीआयने (SBI) ट्वीट करत ग्राहकांना अशी माहिती दिली आहे मेंटेनन्स (Maintenance Activity) करता बँकेच्या काही सेवा 10 आणि 11 तारखेला प्रभावित होणार आहेत. 10 जुलै रात्री 10.45 वाजल्यापासून 11 जुलै रात्री 12.15 वाजेपर्यंत उपलब्ध असणार नाहीत. या दरम्यान इंटरनेट बँकिंग (Internet Banking), योनो (YONO), यूपीआय (UPI) आणि योनो लाइट (YONO Lite) या सेवा काम करणार नाहीत. आणखी एका ट्वीटमध्ये एसबीआयने ग्राहकांना असं आवाहन केलं आहे की, त्यांनी इंटरनेट बँकिंग संदर्भातील पासवर्ड वेळोवेळी बदलणं आवश्यक आहे. ऑनलाइन पासवर्ड बदलणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही सायबर फ्रॉडपासून वाचू शकता. हे वाचा-मोदी सरकारचा मोठा निर्णय, या महत्त्वाच्या बँकेतील संपूर्ण भागीदारी विकणार SBI च्या 44 कोटी ग्राहकांवर चिनी हॅकर्सची नजर चिनी हॅकर्स (Chinese Hackers) स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एसबीआयच्या ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी हे हॅकर्स अनेक प्रकारच्या स्कॅमचा (Scams) वापर करत आहेत. हे हॅकर्स ग्राहकांना लक्ष्य करण्यासाठी त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज (Whatsapp Message) किंवा एसएमएस (SMS) पाठवत आहेत. हे वाचा-Amazonवर या तारखेपासून स्वस्तात करा Shopping,स्मार्टफोनसह हजारो प्रोडक्ट्सवर सूट व्हॉट्सअ‍ॅप मेसेज किंवा एसएमएस पाठवून एसबीआय ग्राहकांना केवायसी अपडेट (KYC Update) करण्याबाबत सांगितले जात आहे. यासाठी या मेसेजेसमध्ये एक वेबसाईट लिंकही (Link) हॅकर्सकडून दिली जात आहे. ही वेबसाईट एसबीआयच्या वेबसाईटशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे ग्राहक फसले जात आहेत.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: